मोहित सोमण:आज अखेर सकारात्मक नकारात्मकतेवर भारी पडल्याने आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात वाढ झाली आहे. एनडीएचा दणदणीत विजय झाल्यासह भारतातील मजबूत फंडांमेंटल, रेपो दरातील कपातीची आश्वासकता, जागतिक अनुकल आर्थिक परिस्थिती, स्मॉलकॅप सह वित्तीय शेअर्समध्ये झालेली वाढ या बहुढंगी कारणांमुळे शेअर बाजारात किरकोळ वाढ झाली आहे. सेन्सेक्स ८४.११ अंकाने उसळत ८४५६२.७८ पातळीवर व निफ्टी ३०.९० अंकांने उसळत २५९१०.०५ पातळीवर स्थिरावला आहे. अखेर सेन्सेक्स व निफ्टीत वाढ होण्यास निफ्टी व्यापक निर्देशांकात स्मॉलकॅप १०० (०.३८%), स्मॉलकॅप १०० (०.३८%), फायनांशियल सर्विसेस (०.३५%), मिडकॅप सिलेक्ट (०.२८%) निर्देशांकात वाढ झाली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात अखेरच्या सत्रात हेल्थकेअर (०.४२%), एफएमसीजी (०.५७%), पीएसयु बँक (१.१७%) निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे आयटी 'सेल ऑफ' झाल्याने बाजारातील रॅली मर्यादित राहिली आहे.
जागतिक अस्थिरता कायम असताना बिहार विधानसभा निवडणुकीने शेअर बाजारात आज चार चांद लावले. त्यामुळेच बाहेरची अस्थिरता 'न्यूट्रल' करण्यात बँक निर्देशांकासह क्षेत्रीय निर्देशांकाने विशेष कामगिरी केली असल्याने निफ्टीला २५९१०.०५ पातळी गाठण्यात यश आले आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक घसरण आयटी (१.०३%), मेटल (०.८९%), ऑटो (०.५२%) निर्देशांकात झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ इपका लॅब्स (१३.६४%), टीआरआयएल (९.९९%), मुथुट फायनान्स (९.८०%), एचबीएल इंजिनिअरिंग (७.९३%), ज्यूब्लिंएट फूडस (७.२९%), गार्डन रीच (५.३६%), इंजिनियर्स इंडिया (५.१३%), गोदावरी पॉवर (५.११%), बजाज होल्डिंग्स (४.९९%) समभागात झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण प्रिमियर एनर्जीज (५.९६%), वालोर इस्टेट (५.२९%), सोनाटा सॉफ्टवेअर (३.९२%), जीएमडीसी (३.६२%), अपोलो टायर्स (३.३९%), सुप्रीम इंडस्ट्रीज (३.१९%), गोदरेज अँग्रोवेट (३.०२%), अकुम्स ड्रग्स (२.९९%), इंटलेक्ट डिझाईन (२.७४%), इन्फोसिस (२.५३%) निर्देशांकात झाली आहे.
आजच्या बाजारातील अखेरच्या सत्रावर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'भारतीय बाजारांचा सत्र घसरणीसह संपला, बेंचमार्क निफ्टी एका मर्यादित श्रेणीत व्यवहार करत होता. निर्देशांकाने दिवसभरात २५,८७९ पातळीचा उच्चांक आणि २५७४० पातळीचा नीचांक नोंदवला, जो दिवसभर मर्यादित दिशात्मक पूर्वाग्रह दर्शवितो. क्षेत्रनिहाय, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सीपीएसई, फार्मा, मीडिया आणि एफएमसीजी निर्देशांकांमध्ये ताकद दिसून आली, तर आयटी, धातू, ऑटो, उत्पादन आणि कमोडिटी निर्देशांकांमध्ये लक्षणीय कमकुवतपणा दिसून आला. सध्या सुरू असलेल्या बिहार निवडणुकीच्या निकालांनी एक घटक जोडला. डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, मुथूटफिन, बीडीएल, आयचरमोट, आयआयएफएल आणि व्होल्टासमध्ये ओपन इंटरेस्ट बिल्डअप दिसून आला, जो या काउंटरमध्ये सक्रिय सहभाग दर्शवितो. निफ्टी निर्देशांकासाठी, २५९०० आणि २६००० स्ट्राइकने सर्वोच्च कॉल ओआय ठेवला, तर २५७०० आणि २५८०० स्ट्राइकने सर्वोच्च पुट ओआय पाहिला, जो प्रमुख प्रतिकार (Main Resistance) दर्शवितो.'