मोहित सोमण:आज शेअर बाजारात वाढ होण्यासाठी अनेक कारणे वर्तवली जात आहे. भारतीय अस्थिरतेच्या गर्तेतून आता तेजीकडे मार्गक्रमण असताना शेअर बाजारात काही आव्हाने देखील कायम आहेत. अर्थात बाजारात 'टेलवाईंड' बघता शेअर बाजारात आव्हानांचा सामना करण्यासाठी दैनंदिन घडामोडींचा मोठा सहभाग असतो. शेअर बाजार बिहार निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आज स्वाभाविकपणे सावधगिरी बाळगली गेली असल्याने सुरुवातीच्या कलात बाजारात घसरण झाली मात्र एनडीएला बहुमताकडे वाटचाल चालू झाल्याने बाजारात आश्वासकता कायम राहिली आहे. त्यामुळे आज बाजारात सामान्यपणे तेजीचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे आज घसरणीची शक्यता अखेरच्या सत्रात का कमी आहे? अथवा बाजार 'हिरव्या' रंगात का बंद होईल? गुंतवणूकदारांसाठी कुठली रणनीती महत्वाची? गुंतवणूकदारांच्या मनात काय आव्हाने आहेत? बाजारात आज वाढ का अपेक्षित आहे? या सगळ्यांची महत्वाची कारणे आपलं जाणून घेऊयात पुढीलप्रमाणे -
१) बाजारातील मजबूत फंडामेंटल- बाजारातील मजबूत फंडांमेंटल बाजारात महत्वाची भूमिका बजावू शकतात. प्रामुख्याने टेक्निकल व फंडांमेंटल दर्जात्मकता आज टिकून राहण्याची शक्यता कायम आहे. प्रामुख्याने जागतिक बाजारातील सकारात्मकता भारतीय बाजारातील तेजीत परावर्तित होऊ शकते. तसेच युएस बाजारातील फेड दरकपात तसेच कमोडिटी बाजारातील तेजी, चलनी बाजारातील घसरणाऱ्या डॉलरच्या तुलनेत वधारणारा रूपया, तंत्रज्ञान प्रणित कंपन्यांची चलती, युएसमधील संपलेले शटडाऊन, युएसकडून टॅरिफ कपातीची शक्यता व भारतीय बाजारातील तिमाहीतील आश्वासक निकाल, आज बड्या कंपन्याचे अपेक्षित मजबूत निकाल, भारतीय बाजारातील रेपो दर कपातीची शक्यता व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी वाढवलेली खरेदी या कारणांचा संगम आज झाल्यास वावगे ठरणार नाही. तर दुसरीकडे मात्र बाजारातील बिहार निवडणूकीमुळे चढ उतार कायम असली तरी निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक मजबूत स्थितीत ट्रेंड करत आहे.
२) बिहार निवडणूक- बिहार निवडणूकीतील निकालांच्या आधारावर गुंतवणूकदारांनी सुरुवातील सावध प्रतिक्रिया दिली. त्यामुळे बाजार लाल रंगात सुरु झाला. तत्पूर्वी बाजारात मध्यरात्री गिफ्ट निफ्टीत घसरण झाली असली तरी बाजार सुरु होण्याच्या काही काळ आधी गिफ्ट निफ्टीने रिकव्हरी सुरू केली होती. तोच पँटर्न आज शेअर बाजारात कायम राहू शकतो. दुसरीकडे एनडीए स्पष्ट बहुमताकडे जाण्यच्या स्थितीत पोहोचल्याने बाजारात मोठी रॅली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिहारमध्ये एनडीए जिंकल्यास भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारचे स्थान अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे किंबहुना, गुंतवणूकदारांना स्थिर सरकारसह स्थिर आर्थिक धोरणे राहण्यास मदत होऊ शकेल अशी गुंतवणूकदारांची भूमिका आहे. तत्पूर्वी मात्र भारतात इंट्राडे गुंतवणूकदारांकडून शॉर्ट सेलिंग सुरु असल्याने अंतिमतः निकालाची अंतिम आकडेवारी व आजची एफआयआय व घरगुती गुंतवणूकदारांकडून वाढलेली खरेदी निर्देशांकात परावर्तित होईल.
३) तेजीत असलेले तिमाही निकाल- गेल्या दोन दिवसात संमिश्र कल आले असले तरी एकूण निकाल पाहता कंपन्यांच्या नफ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. विशेषतः व्यवसायात टॉपलाइनमध्ये वाढ झाली असली तरी अस्थिरतेचा फटका बसल्याने खर्चात वाढ झाली आहे. ही प्रमुख चिंता असली तरी 'ग्रोथ' कायम असल्याने बाजारात चढता कल कायम राहू शकतो.
४) बँकेत अपेक्षित तेजीची रिकव्हरी- बँक निर्देशांकात विविध पँटर्न पहायला मिळत असलेले तरी गेले काही घसरणीत असलेला बँक निर्देशांकात सुधारणा अपेक्षित आहे. तज्ञांच्या मते, बाजारात कंसोलिडेशनची फेज संपुष्टात येऊन बाजारात येत्या काही दिवसांत रॅलीची अपेक्षा आहे. विशेषतः बँक निर्देशांकात आज पीएसयु बँक निर्देशांकात झालेली वाढ व मध्यम आकाराच्या बँकात वाढ झाली आहे. खाजगी बँकेत आज घसरण झाली असली तरी या बँकेच्या कामगिरीत सकारात्मकता कायम आहे. बँक निफ्टीत वाढ अपेक्षित असून एकूणच बँकेच्या निर्देशांकात सकारात्मकता कायम आहे. कालपासून बँक निफ्टी ०.१६% कोसळला असला तरी गेल्या आठवड्यात बँक निफ्टीने १.५४% वाढ नोंदवली आहे. तर एक महिन्याच्या कालावधीत ३.०८% वाढ नोंदवली आहे.
५) अपेक्षित खरेदीत वाढ - मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांकडून आज शेअर बाजारात वाढ अपेक्षित आहे. शासनाने निर्यातीला प्रामुख्याने प्रोत्साहन देत हजारो कोटींची योजना जाहीर केल्याने व जीएसटी कपातीमुळे आगामी निर्यातीसह व्यापारात वाढ अपेक्षित आहे. या कारणामुळे मोठ्या प्रमाणात शेअर पोर्टफोलिओ गुंतवणूकीत वाढ होऊ शकते. म्युच्युअल फंड देखील कंझमशन, फार्मा, टेक्साटाईल, मेटल या शेअर्समध्ये आपली गुंतवणूक वाढवत आहेत. तसेच बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक वाढवली असून आगामी काळातही गुंतवणूकीत वाढ होऊ शकते. काल प्रोविजनल आकडेवारीनुसार परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ८६२ कोटींची निव्वळ खरेदी केली. तोच पँटर्न आजही कायम राहू शकतो.
६) निफ्टीतील तेजी अथवा रिकव्हरी- निफ्टी सकाळी २५७६७ पातळीवर उघडला होता तर २५८७९.१५ उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. तज्ञांच्या मते, निफ्टीला आज २५९४० च्या आसपास रिकव्हर होऊ शकतो. दुपारी १२ नंतर पुन्हा निफ्टीने आपला वेग वाढवल्याने बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावना उत्तेजीत झाल्या आहेत. असे असले तरी आयटी सेल ऑफचा धोका कायम आहे. मात्र आज या धोक्याला बँक निर्देशांक न्यूट्रल करणार का हे अखेरच्या सत्रात कळेल.
दरम्यान बाजार तज्ज्ञ काय सांगतात?
बाजारपूर्व स्थितीवर एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक देवार्ष वकील म्हणाले आहेत की,' फेडच्या दर कपातीच्या अनिश्चिततेमुळे वॉल स्ट्रीटमध्ये मोठी विक्री, बिहार निवडणुकीचे निकाल लक्ष केंद्रीत केले गेले आहे.वॉल स्ट्रीट गुरुवारी मोठ्या प्रमाणात घसरणीसह बंद झाला, एनव्हीडिया आणि इतर एआय हेवीवेट्स मध्ये मोठी घसरण झाली, कारण गुंतवणूकदारांनी महागाईच्या चिंता आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या आरोग्याबद्दल केंद्रीय बँकांमध्ये मतभेद यांच्यामुळे व्याजदर कपातीची अपेक्षा कमी केली.अमेरिकेच्या तीनही प्रमुख स्टॉक निर्देशांकांनी एका महिन्याहून अधिक काळातील सर्वात मोठी दैनिक टक्केवारी घसरण नोंदवली.नॅस्डॅक २.३% घसरून २२८७० पातळीवर, एस अँड पी ५०० १.७% घसरून ६,७३७ पातळीवर आणि डाऊ ७९७ किंवा १.७% घसरून ४७४५७ पातळीवर आला.
गुंतवणूकदारांना चिंताग्रस्त करणाऱ्या आणि आर्थिक डेटाचा प्रवाह विस्कळीत करणाऱ्या ४३ दिवसांच्या विक्रमी बंदनंतर अमेरिकन सरकार पुन्हा उघडले.अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ चाललेल्या सरकारी शटडाऊननंतर अमेरिकेचे प्रमुख आर्थिक निर्देशक जाहीर होतील की नाही याबद्दल अनिश्चितता असल्याचेही वॉल स्ट्रीटवरील कमकुवतपणाचे प्रतिबिंब असू शकते. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, शटडाऊनमुळे ऑक्टोबरमधील नोकऱ्या आणि ग्राहक किंमत महागाई अहवाल "कदाचित कधीच जाहीर होणार नाहीत'
अलिकडच्या काळात फेडरल रिझर्व्ह धोरणकर्त्यां च्या वाढत्या संख्येने व्याजदर कपातीबाबत संकोच व्यक्त केला आहे, ज्यामुळे डिसेंबरमध्ये कर्ज घेण्याच्या खर्चात घट होण्याची वित्तीय बाजार-आधारित शक्यता जवळपास बरोबरीच्या जवळ आली आहे.अलीकडेच बोलणाऱ्या फेड अधिकाऱ्यांनी या वर्षी अमेरिकेच्या व्याजदर कपातीनंतर महागाईबद्दल चिंता आणि कामगार बाजारपेठेत सापेक्ष स्थिरतेची चिन्हे उद्धृत केली. शुक्रवारी आशियाई शेअर्समध्ये जागतिक विक्री झाली कारण फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांच्या आक्रमक टिप्पण्यांनी पुढील महिन्यात अमेरिकेच्या दर कपातीची आशा धुळीस मिळवली.
कच्च्या तेलाच्या किमती २.७१% वाढून प्रति बॅरल $६०.२८ वर पोहोचल्या, याला अमेरिकेच्या इन्व्हेंटरीजमध्ये घट आणि ओपेक+ नसलेल्या उत्पादकांमध्ये चालू उत्पादन निर्बंधामुळे पाठिंबा मिळाला. जागतिक जोखीम आणि दीर्घकालीन मागणी प्रश्न असूनही जवळच्या काळात पुरवठ्यात घट होण्याच्या अंदाजामुळे किमती वाढल्या आहेत.ऑक्टोबरमध्ये भारतातील किरकोळ चलनवाढ ०.२५% या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरली, जी आरबीआयच्या २-६% लक्ष्य श्रेणीपेक्षा सलग तिसऱ्या महिन्यात कमी होती. चलनवाढ कमी झाल्यामुळे व्याजदर कपातीच्या आशा आणि देशांतर्गत लवचिकतेला पाठिंबा मिळाला, ज्यामुळे जागतिक अस्थिरता असूनही एकूण बाजार स्थिरतेला मदत झाली.निफ्टी २६१०० पातळीवर तात्काळ प्रतिकार आणि २५७१५ पातळीच्या जवळ आधारासह सतत वाढीच्या ट्रेंडमध्ये आहे.बिहार निवडणुकीच्या निकालांपूर्वी बाजारातील भावना सावध आहे, अस्थिरता वाढली आहे. कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजार आज मंदावण्याची शक्यता आहे.
मात्र मध्य सत्राच्या कामगिरीवर काय तज्ज्ञ म्हणाले?
ज्येष्ठ बाजार बाजार विश्लेषक अजित भिडे- 'आज बिहार विधान सभा निकाल हे एनडीएच्या बाजुने निश्चित पणे दिसत आहेत.आज निफ्टी २५९४० वरून मेजर सपोर्ट लेवल लाच आहे. आज आठवड्याचा शेवटचा दिवस आहे.अमेरिकेतील सरकारचा शटडाउन संपला आहे. पण कालची डाऊजोन्सची घसरगुंडीचा परीणाम भारतीय बाजारात दिसत आहेत. आज बिहारचे निकाल सरकार विरूद्ध असते तर आपला बाजार खूपच खाली गेला असता.आज बिहार निकालामुळे आपला वाजार खूप स्टेबल आहे.पण आंतरराष्ट्रीय बाजारात आपले जीडीआर एडीआर यांचा परीणाम आपल्या कंपनीवर पडतोच. ओवरऑल आज ३.३० वाजेपर्यंत बाजार स्टेबल राहील हे महत्वपूर्ण आहे. ७०-८० कमी जास्त निफ्टी म्हणजे स्टेबल. निफ्टी पुढील आठवडयात नवीन उच्चांकांवर असेल.२६००० पार करून २९००० पातळीकडे वाटचाल करेल.पण आज आपल्या बाजाराला बिहारच्या निकालाने वाचवले हे नक्की. खूप मोठ्या घसरणीपासून वाचवले. हे निकाल राष्ट्रीय पातळीवर दूरगामी परीणाम आहेत.म्हणूनच शेअर बाजाराचा फक्त आजचा विचार न करता पुढील वाटचालीत बिहार ने एनडीएला वाचवले हेच खरे..कारण बचेंगे तो और भी लढेंगे अशी स्थिती आहेच.'
निफ्टी पोझिशनवर काय म्हणाले होते तज्ज्ञ?
जिओजित इन्व्हेसमेंटचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले होते की,'निफ्टी २५९८० पातळीच्या वर काही काळासाठी पोहोचल्यानंतर खाली आला, ज्यामुळे कालच्या सावधगिरीच्या संकेताची पुष्टी झाली. २६१३०-२६५५० पातळीच्या वरच्या ट्रेंडमधील विस्तार अजूनही जिवंत आहे, कारण ऑसिलेटरने अद्याप ट्रेंड उलटण्याचे संकेत दिलेले नाहीत. तथापि, नकारात्मक बाजू २५७८९ पातळीच्या दिशेने वर खेचली जाऊ शकते.'त्यामुळेच आज शेअर बाजारात तेजीच्या भावना बळकावल्या आहेत. अर्थात धोके व आव्हाने कायम असली तरी ही तेजी आव्हानांना न्यूट्रल करणार का? हे अखेरच्या सत्रात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.