पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतांची मोजणी सुरू झाली असून सुरुवातीच्या आकडेवारीनुसार एनडीएला आघाडी मिळत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये एनडीएच्या जागांवर उभ्या असलेल्या नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झाली आहे.
दरम्यान बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे. नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री असतील. नितीश कुमार यांना कमी लेखणाऱ्यांना आता त्यांची खरी किंमत कळली आहे, असे चौधरी यांनी म्हटले आहे. एनडीए जिंकल्यास नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का? हा प्रश्न सर्वांना पडला होता. अशोक चौधरी यांच्या या विधानामुळे आता सर्वांना उत्तर मिळाले आहे.
पाटणा : बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान झाले. आता मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेले कल बघता ...
बिहारमध्ये मतदान मोजणीला सुरुवात झाल्यावर नितीश कुमार यांचे पोस्टर्स लागले. या पोस्टर्समध्ये त्यांचे वर्णन वाघ म्हणून केले आहे. ज्यावर लिहिले होते, "वाघ अजूनही जिवंत आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्वांचे आभार..." त्यात आता आकडेवारी पुढे यायला सुरुवात झाल्यावर एनडीए समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. तर जेडीयूचे कार्यकर्ते नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.