भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिला कसोटी सामना, भारत गोलंदाजी करणार

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आज कोलकात्यातील ईडन गार्डन्समध्ये सुरुवात झाली. सकाळी झालेल्या नाणेफेकीत आफ्रिकी कर्णधार टेंबा बावुमाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामना सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरू झाला. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनल्सवर आणि लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टारवर सुरू आहे. तसेच डीडी फ्री डिशवरही हा सामना विनामूल्य पाहता येईल.


कोलकात्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३ कसोटी सामने खेळले गेले असून भारताने २ वेळा विजय मिळवला आहे, तर एक सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे.


भारताचे ईडन गार्डन्सवरील प्रदर्शनही प्रभावी आहे. येथे भारताने आतापर्यंत ४२ कसोटी सामने खेळले असून १३ वेळा विजय मिळवला आहे तर ९ सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. भारतीय संघाने ईडन गार्डन्सवरील २० कसोटी सामने अनिर्णित राखले आहेत.



आजच्या कोलकाता कसोटीकरिता दोन्ही संघांचे अंतिम अकरा खेळाडू


भारताचे अकरा खेळाडू : यशस्वी जायसवाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


दक्षिण आफ्रिकेचे अकरा खेळाडू : एडन मार्करम, रयान रिकेलटन, व्हीयान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोरजी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन (यष्टिरक्षक), सायमन हार्मर, मार्को जानसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज.


भारतातले दक्षिण आफ्रिका - भारत कसोटी सामने कायमच क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरले आहेत. युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची ही उत्तम संधी आहे. कोलकात्याची खेळपट्टी फलंदाजांना साथ देत असली तरी स्पिनर्स (फिरकीपटू) आणि पेसर्स (वेगवान गोलंदाज) दोघांनाही इथे महत्त्वाची भूमिका बजावता येणार आहे.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना