बिहारमध्ये कोण मारणार बाजी ? एनडीए जिंकणार की महागठबंधनची सत्ता येणार ?


पाटणा : बिहारच्या विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. मतमोजणी शुक्रवार १४ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीए आणि महागठबंधन यांच्यापैकी कोण बाजी मारणार याविषयी जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक आहे. विधानसभेच्या २४३ जागांसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान झाले. बिहारमध्ये ७४.२ दशलक्ष नोंदणीकृत मतदार आहेत. यात ३९.२ दशलक्ष पुरुष आणि ३५ दशलक्ष महिला आहेत. विधानसभेसाठी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात ६५.०८ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात ६८.७६ टक्के मतदान झाले.


विविध एक्झिट पोल्सनी राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) 'क्लीन स्वीप' करणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सर्व प्रमुख एक्झिट पोल्सनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल, असे भाकीत केले आहे. पीपल्स इनसाइट (People's Insight), पीपल्स पल्स (People's Pulse), मॅट्रिझ (Matrize), दैनिक भास्कर (Dainik Bhaskar), पीएमआरक्यू (PMRQ) आणि जेव्हीसी पोल्स (JVC's Polls) या सहा एक्झिट पोल्सनी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज दिला आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील 'महागठबंधन'ला मात्र मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोल्सनुसार, 'महागठबंधन' ७० ते १०२ जागांच्या दरम्यान अडकण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय जनता दलाने एकट्याने ७५ जागा जिंकल्या होत्या आणि त्यांचे आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते. त्या तुलनेत यंदा 'महागठबंधन'ची पीछेहाट होण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांची जनसुराज पार्टी यंदाच्या निवडणुकीत विशेष प्रभाव पाडणार नाही असे चित्र आहे.



विविध एक्झिट पोल्सनुसार एनडीएला मिळणाऱ्या जागांचा अंदाज :




  • पीपल्स इनसाइट (People's Insight): १३३-१४८ जागा




  • पीपल्स पल्स (People's Pulse): १३३-१५९ जागा




  • मॅट्रिझ (Matrize): १४७-१६७ जागा




  • दैनिक भास्कर (Dainik Bhaskar): १४५-१६० जागा




  • जेव्हीसी पोल्स (JVC's Polls): १३५-१५० जागा




 

एक्झिट पोलचा तपशील (Seats)











































एक्झिट पोल



NDA



महागठबंधन 



जनसुराज 



इतर 



पीपल्स इनसाइट



१३३-१४८



८७-१०२



०-२



३-६



मॅट्रिझ



१४७-१६७



७०-८०



०-२



२-८



दैनिक भास्कर



१४५-१६०



७३-९१



०-०



५-१०



पीपल्स पल्स



१३३-१५९



७५-१०१



०-५



२-८



Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

Stock Market Opening Bell: ख्रिसमोत्तर सत्रात बाजारात घसरण सेन्सेक्स १८३.६६ व निफ्टी ४७.७० अंकाने घसरला

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. प्रामुख्याने शेअर बाजारात नवा ट्रिगर

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

मविआ घटक पक्षांना जास्त जागांची अपेक्षा भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची

प्रकाश आंबेडकरांच्या तंबीनंतर काँग्रेस ताळ्यावर !

मुंबई : मी ज्या दिवशी तोंड उघडेन, त्यादिवशी काँग्रेसला महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात फटका बसेल, अशी तंबी प्रकाश

भाजप मुंबईत ३० टक्के नवे चेहरे देणार ?

मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर ‘एबी’ फॉर्मचे वाटप होणार मुंबई : राजकारणात प्रयोगशील पक्ष अशी ओळख असलेली