उद्या आणि परवा मुंबईत पाणीबाणी!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची १२०० मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, १२०० मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि ८०० मिलिमीटर व्यासाच्या विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील ३०० मिलिमीटर, ६०० मिलिमीटर व ९०० मिलिमीटर व्यासाच्या एकूण पाच झडपा बदण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. हे काम शुक्रवार, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून शनिवारी १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत (एकूण २२ तास) सुरू राहणार आहे. त्यामुळे या २२ तासांच्या कालावधीत महानगरपालिकेच्या एन, एल, एम पश्चिम आणि एफ उत्तर विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.


मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणारी जुनी आणि नवीन तानसा जलवाहिनी तसेच विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील एकूण पाच झडपा (चार बटरफ्लाय झडप आणि १ स्लुईस झडप) बदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम शुक्रवार १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून शनिवार, दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे पूर्व उपनगरांतील घाटकोपर (एन), कुर्ला (एल), चेंबूर (एम पश्चिम) आणि वडाळा, शीव आणि माटुंगा (एफ उत्तर) या चार प्रशासकीय विभागात काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तरी संबंधित परिसरातील नागरिकांनी उपरोक्त कालावधीसाठी पाण्याचा आवश्यक साठा करावा. पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.



घाटकोपर एन विभाग


(दि. १५ नोव्हेंबर, पहाटे ३.४५ मिनिटांपासून सकाळी ८ वाजेपर्यंत) राजावाडी पूर्वेकडील संपूर्ण परिसर, चित्तरंजन नगरसह विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, ओ. एन. जी. सी. वसाहत, रेल्वे कर्मचारी वसाहत, आर. एन. गांधी मार्ग.



कुर्ला एल विभाग


(दि. १४ नोव्हेंबर, सकाळी १० वाजेपासून दि. १५ नोव्हेंबर, सकाळी ८ वाजेपर्यंत)
न्यू टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, नेहरू नगर, मदर डेअरी रस्ता, शिवसृष्टी रस्ता, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदिर मार्ग, एस. जी. बर्वे मार्ग कुर्ला पूर्व, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलिस वसाहत, कसाई वाडा, चुनाभट्टी, राहुल नगर, एवरार्ड नगर, कुरेशी नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अली दादा इस्टेट, राजीव गांधी नगर, स्वदेशी जेवण चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडाकोळ प्रेम नगर, हिल रोड, मुक्तादेवी मार्ग, ताडवाडी, समर्थ नगर.



चेंबूर एम पश्चिम विभाग


(दि. १४ नोव्हेंबर, सकाळी १० वाजेपासून दि. १५ नोव्हेंबर, सकाळी ८ वाजेपर्यंत) : टिळक नगर, टिळक नगर स्थानक रस्ता, पेस्टम सागर रस्ता क्रमांक १ ते ६, ठक्कर बाप्पा वसाहत पाडा क्रमांक १ ते ४, शास्त्री नगर, वत्सलाताई नाईक नगर, सहकार नगर, शेल कॉलनी, इंदिरा नगर, एस. जी. बर्वे मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम बाजूकडील सेवा मार्ग (प्रगती सोसायटी), गोदरेज वसाहत, यशवंत नगर, सम्राट अशोक नगर, राजा मिलिंद नगर, आदर्श नगर, भक्ती पार्क, अजमेरा वसाहत, एम. एम. आर. डी. ए. एस. आर. ए. वसाहत.



शीव, माटुंगा, वडाळा, दादर पूर्व एफ उत्तर विभाग


(दि. १५ नोव्हेंबर, पहाटे ३.४५ मिनिटांपासून सकाळी ८ वाजेपर्यंत) शीव (सायन) पश्चिम आणि पूर्व, दादर पूर्व, माटुंगा पूर्व, वडाळा, चुनाभट्टीचा काही भाग, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, अल्मेडा कंपाउंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, सोडा विल्डिंग्ज (नवीन कफ परेड), शीव कोळीवाडा-सरदार नगर, संजय नगरचा काही भाग, गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, कोरबा मिठागर, वडाळा, भीमवाडी येथील प्रवेशद्वार क्रमांक
४ आणि ५.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या