आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली 'सोलर शाळा'


गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य आणि ‘रोझी ब्लू फाउंडेशन’च्या संचालक श्लोका अंबानी यांच्या सामाजिक सहकार्यातून नक्षलग्रस्त आणि दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या सौर ऊर्जीकरणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.


मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोझी ब्लू फाऊंडेशन आणि त्यांच्या स्वयंसेवा प्लॅटफॉर्म ‘कनेक्ट फॉर’च्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचे विशेष कौतुक केले. ’कनेक्ट फॉर’च्या संस्थापक श्लोका अंबानी आणि सह-संस्थापक मानिती शाह यांनी गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले होते.


अंबानी उद्योग समूहातील सदस्य श्लोका अंबानी यांनी नीती आयोगाने ‘आकांक्षित जिल्हा’ म्हणून घोषित केलेल्या गडचिरोलीमध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी घेतलेला पुढाकार अत्यंत प्रशंसनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


धानोरा तालुक्यातील १० शाळांसाठी सोलर प्रकल्पास मंजुरी


मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी 31 ऑक्टोबर 2025 रोजी ‘सोलर शाळा प्रकल्पा’अंतर्गत रोझी ब्लू फाऊंडेशनला काम करण्यास मंजुरी दिली.


पहिल्या टप्प्यात फाऊंडेशनने धानोरा तालुक्यातील दहा जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर ऊर्जेवर आधारित युनिट्स उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा, मुसक्या, सालेभट्टी, रांगी, निमगाव, दुडमला, मुरूमगाव, बन्धोना, तसेच जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा आणि मोहली या शाळांचा समावेश आहे.


या प्रकल्पामुळे शाळांमधील अध्यापन व डिजिटल शैक्षणिक उपक्रमांना वीज पुरवठ्यावरील अवलंबन कमी होऊन अखंड सुविधा मिळेल व या शाळांमधील सुमारे 1,470 विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होईल. ‘सोलर शाळा प्रकल्प’ गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण प्रणालीसाठी टिकाऊ, स्वच्छ आणि विश्वसनीय ऊर्जा पुरविणारा नवा आदर्श ठरत आहे.


Comments
Add Comment

इंदुरीकर महाराज सोशल मीडियावरील टीकेने व्यथित, कीर्तन बंद करण्याचा दिला इशारा!

मुंबई : वारकरी संप्रदायातील समाजप्रबोधनकार आणि कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार

जमीन घोटाळा चौकशीसाठी अजित पवारांचा राजीनामा घ्या; अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना जमीन घोटाळ्याची चौकशी नीट होऊ शकेल का? असा सवाल करून मुख्यमंत्री

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! "कोणी 'माईचा लाल' आला तरी...योजनेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांना एकनाथ शिंदेंचा सडेतोड इशारा

मुंबई : राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) महिला

शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा टळली, मिळाली थेट पुढील वर्षाची 'डेट'

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावरच 'अपात्रते'वर फैसला होण्याची शक्यता नवी दिल्ली

भुसावळ-महानगरी एक्सप्रेसमध्ये पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआयचे संदेश

महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी

Amravati News : थरकाप उडवणारा व्हिडिओ! लग्नसोहळ्यात स्टेजवर नवरदेवावर चाकूने सपासप वार; नवरी जागीच बेशुद्ध

अमरावती : लग्न समारंभ म्हटला की, आनंद, जल्लोष आणि आयुष्यभराच्या नव्या सुरुवातीचे वातावरण असते. मात्र, अमरावती (Amravati