मुंबई लोकलमध्ये फुकट प्रवासाचा नवा फंडा; UTS अॅपचा गैरवापर करून रेल्वेला लावला जातोय गंडा?

मुंबई : मुंबई लोकल म्हणजे सामान्य प्रवाशांसाठी दररोजचा प्रवासाचा अविभाज्य भाग. मात्र काही हुशार प्रवाशांनी या लोकल प्रवासालाच ‘फुकटचा प्रवास’ बनवण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार अधिकृत रेल्वे अॅप ‘UTS’ चा वापर करून केला जात आहे.


2023 पासून सुरू झालेला हा “जुगाड” आता पश्चिम रेल्वेच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे. UTS अॅप हे रेल्वेचे अधिकृत ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म आहे, ज्यावरून प्रवासी सुलभतेने लोकल तिकिटे आणि पास खरेदी करू शकतात. पण काही प्रवाशांनी याच सुविधेचा गैरवापर करण्याचा मार्ग शोधला आहे.


हे प्रवासी UTS सीझन पासचे स्क्रीनशॉट घेतात आणि फोटो एडिटिंग अॅप्सच्या मदतीने त्यात तारीख बदलतात, अगदी बनावट QR कोडसुद्धा तयार करतात. बाहेरून पाहता हा पास खरा वाटतो, पण रेल्वेच्या प्रणालीवर स्कॅन केल्यानंतर तो फसवा असल्याचं उघड होतं.



जुलै 2025 मध्ये पहिला प्रकार उघडकीस


पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जुलै 2025 मध्ये पहिल्यांदा असा बनावट UTS पास सापडला होता. त्या नंतर नोव्हेंबरपर्यंत अशा घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली. विशेषतः एसी लोकलमध्ये प्रवासी हा ‘फेक पास जुगाड’ मोठ्या प्रमाणावर वापरत असल्याचे रेल्वे तपासात स्पष्ट झाले आहे.



नायगावमध्ये मंगळवारी उघड झालेला प्रकार


मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास विरार एसी लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला नायगाव स्थानकावर तिकीट तपासणीदरम्यान पकडण्यात आले. त्याने अधिकाऱ्यांना UTS अॅपवरील तिकीट दाखवले, जे खरे वाटत होते. पण टीसीला QR कोडमध्ये गडबड आढळली. तपासणी केल्यानंतर ते तिकीट रेल्वेच्या डेटाबेसमध्ये अस्तित्वातच नसल्याचे समोर आले. तपासात समजले की त्या प्रवाशाने जुन्या तिकीटाचा स्क्रीनशॉट घेऊन त्यावर तारीख एडिट केली होती. तत्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करून दंड वसूल करण्यात आला आणि वसई पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली.



रेल्वे प्रशासन अधिक सतर्क


पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांत अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. विशेषतः एसी लोकलमध्ये अशा प्रकारांनी महसूल गमावला जात असल्याने रेल्वे प्रशासनाने तपासणी आणखी कडक करण्याचे आदेश दिले आहेत. टीसींना QR कोड स्कॅनिंगसाठी अद्ययावत उपकरणे देण्यात येणार असून, संशयास्पद तिकिटांवर तात्काळ कारवाई केली जाईल.

Comments
Add Comment

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा

Devendra Fadnavis : गर्भवती मातांसाठी मोठी दिलासादायक बातमी; तीव्र रक्तक्षयावर उपचारांना मिळणार वेग

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Major decision by MHADA : उमरखाडीतील १,९२८ रहिवाशांना मिळणार ५०० चौरस फुटांची हक्काची घरे!

मुंबई : भायखळा येथील ऐतिहासिक आणि दाट वस्तीच्या उमरखाडी परिसराचा समूह पुनर्विकास करण्याचा अत्यंत महत्त्वाचा

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)