६५ व्या वर्षी 'आयर्नमॅन'चा बहुमान! गोवा येथे झालेल्या ७०.३ आयर्नमॅन स्पर्धेत आष्टा येथील डॉ. अरुण सरडे यांची विक्रमी कामगिरी

दोडामार्ग : जिद्द, मेहनत आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या बळावर कोणतीही गोष्ट अशक्य नसते, हे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील डॉ. अरुण सरडे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. गोव्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या ७०.३ गोवा आयर्नमॅन स्पर्धेत वयाच्या ६५ व्या वर्षी डॉ. सरडे यांनी आष्टा नगरीतील पहिले 'आयर्नमॅन' होण्याचा ऐतिहासिक बहुमान पटकावला आहे. या अत्यंत खडतर मानल्या जाणाऱ्या स्पर्धेत स्पर्धकांना सलग ८.३० तासांच्या निर्धारित वेळेत तीन टप्पे पूर्ण करायचे होते.



१.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग,​२१.१ किमी धावणे हे ​तिन्ही टप्पे डॉ. सरडे यांनी केवळ ७ तास ४९ मिनिटे या विक्रमी वेळेत पूर्ण करून आपली शारीरिक क्षमता आणि मानसिक कणखरता सिद्ध केली. ​डॉ. सरडे यांच्या या कामगिरीमुळे सांगली जिल्हा सह आष्टा शहराची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांनी ६०-६५ वयोगटात जागतिक स्तरावर ५वा क्रमांक पटकावला, तर याच वयोगटातील भारतीय स्पर्धकांमध्ये दुसरा क्रमांक मिळवून देशाचे प्रतिनिधित्व केले.



​डॉ. अरुण सरडे यांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशामुळे त्यांचे आष्टा शहरातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन होत आहे. त्यांची ही कामगिरी युवा पिढीला आरोग्य, फिटनेस आणि वेळेचे व्यवस्थापन याबद्दल प्रेरणा देणारी ठरली आहे

Comments
Add Comment

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे