प्रतिनिधी: यामाहा मोटर्स इंडियाने आपला विस्तार मुख्य शहरांसह इतर टियर २,३ शहरात करण्यासाठी आपली कंबर कसली आहे. त्यामुळे ईव्ही बाजारात आपले स्थान निर्माण करण्यासाठी कंपनीने आपल्या नवीन AEROX-E व ECO6 या दोन नव्या दुचाकी ईव्हीची घोषणा केली आहे. कंपनीने वाहन उद्योगात शाश्वतता टिकवण्यासाठी हे धोरणात्मक पाऊल उचलल्याचे लाँच दरम्यान स्पष्ट केले आहे. या नव्या लाँचसह FZ श्रेणीतील आणखी एक FZ RAVE या दुचाकीची घोषणा केली. कंपनीच्या मते त्यामुळे FZ गाड्यांचा पोर्टफोलिओ मजबूत होईल. याखेरीज 'आयवायएमचा भारतातील इलेक्ट्रिक वेईकल बाजारपेठेतील प्रवेश अधिक शाश्वत भविष्याच्या दिशेने त्यांच्या प्रवासामधील महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ईव्ही श्रेणीमधील या प्रवेशासह पर्यावरणीय स्थिरता राखण्याप्रती, तसेच यामाहाला परिभाषित करणारा तोच उत्साह व कार्यक्षमता देण्याप्रती ब्रँडची कटिबद्धता दृढ झाली आहे' असे कंपनीने लाँच दरम्यान स्पष्ट केले आहे.
या घोषणेबाबत मत व्यक्त करत यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे अध्यक्ष इतारू ओतानी म्हणाले आहेत की,' भारत यामाहाच्या जागतिक विकास धोरणासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. आम्ही या बाजारपेठेतील प्रीमियम व इलेक्ट्रिक गतीशीलता विभागांमध्ये मोठी क्षमता पाहतो. XSR ब्रँड, आमचे नवीन ईव्ही मॉडेल्स आणि FZ-Rave चे लाँच आमची उपस्थिती दृढ करण्यामधील आणि भारतातील सर्वसमावेशक गतीशीलता क्षेत्राशी संलग्न होण्यामधील निर्णायक पाऊल आहे. या लाँचेससह आम्ही कार्यक्षमता, डिझाइन व तंत्रज्ञानाचा शोध घेत असलेल्या राइडर्ससोबत आमचे संबंध दृढ करत आहोत, तसेच शाश्वत परिवहनाप्रती देशाच्या परिवर्तनाला प्रतिसाद देखील देत आहोत. आम्ही भारतात विविध ग्राहकांसाठी डिझाइन केलेल्या उत्पादनांच्या माध्यमातून मूल्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्याला भारताच्या 'विकसित भारत' दृष्टिकोनाचे पाठबळ आहे आणि यामाहाच्या जागतिक एन्व्हायरोन्मेंट प्लॅन २०५० द्वारे मार्गदर्शित आहे.'
XSE155 उत्पादनबात अधिक वैशिष्ट्ये -
१) XSR155 XSR सिरीजमधील पुढले मॉडेल आहे. सुरूवातीची ऑफर म्हणून किंमत १४९९० रूपये (एक्स शोरूम) किंमत आहे.
२) एलईडी लाईट, टीअरड्रॉप फ्युएल टॅकसह १७ इंच व्हील्स मोटरसायकल
३) XSR 155 -१५५ CC लिक्वीड कूल, ४ -व्हॉल्व्ह इंजिनच्या शक्तीसह व्हेरिएबल व्हॉल्व्ह अँक्च्युएशन (व्हीव्हीए) आहे, जे १३.५ केडब्ल्यू शक्ती आणि १४.२ एनएम टॉर्कसह
AEROX E मोटारसायकलची वैशिष्ट्ये -
१) ९.४ किलोवॅट (पीक पॉवर), ४८ एनएम टॉर्क इलेक्ट्रिक मोटर आणि ड्युअल डिटेचेबल ३ किलोवॅट तास बॅटरीद्वारे समर्थित तसेच AEROX-E युक्त पॉवर
२) AEROX E प्रमाणित रेंज १०६ किलोमीटर
३) हार्ट-शेकिंग स्पीडस्टर डिझाइनसह ट्विन एलईडी क्लास डी हेडलाइट्स, एलईडी फ्लॅशर्स, 3D-इफेक्ट एलईडी टेललाइट आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह मोठी रंगीत TFT स्क्रीन. Y-कनेक्ट मोबाइल अँप, कनेक्टिव्हिटी मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले (MID)
४) AEROX-E मधील एर्गोनॉमिक्समध्ये बदल
५) या वेईकलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह यामाहाची सिग्नेचर डिझाइन आणि रोमांचक कार्यक्षमतेचे संयोजन आहे असे कंपनीने म्हटले.
६) स्मार्ट की सिस्टम आणि सोईस्कररित्या स्थित एक्स्टर्नल चार्जिंग पोर्टसह AEROX-E Performance EV मध्ये यामाहाची डिझाइन शैली व कार्यक्षमतेसह अत्याधुनिक इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा समावेश
पोर्टी, स्मार्ट आणि स्ट्रीट-रेडी: नवीन यामाहा FZ-RAVE
१) यामाहा FZ-RAVE भारतातील १५०सीसीची क्षमता
२) FZ-RAVE मध्ये फुल-एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्पसह एकीकृत पोझिशन लाइट,शिल्पाकृती फ्यूएल टँक, कॉस्मेटिक एअर व्हेण्ट्स आणि सुसंगत एक्झॉस्टचा समावेश
३) सिंगल-पीस सीट आणि आकर्षक टेल लॅम्प आहे, जे वेईकलला आकर्षक व स्पोर्टी लुक देतात,
४) नवीन FZ-RAVE ची किंमत ११७२१८ रूपये (एक्स-शोरूम)
५) मोटारसायकल रंग व ग्राफिक्स बाबतीत मॅट टायटन व मेटलिक ब्लॅक या दोन रंगात उपलब्ध
६) FZ-RAVE मध्ये १४९सीसी सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन,९.१ केडब्ल्यू शक्तीसह
७) इंजिन इंटिग्रेटेड अँक्सेलरेशन, ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह
८) सिंगल-चॅनेल एबीएस आणि फ्रण्ट व रिअर डिस्क ब्रेक्स सुरक्षितता वाढवतात असा दावा कंपनीने केला आहे. (ज्यामुळे अचानक थांबल्यास किंवा आव्हानात्मक रस्त्यांवर सुरक्षिततेची खात्री मिळते)
९) १३-लिटर फ्यूएल टँक आणि १३६ किलो Kerb वजनासह उपलब्ध
आयवायएमचा भारतातील इलेक्ट्रिक वेईकल बाजारपेठेतील प्रवेश अधिक शाश्वत भविष्याच्या दिशेने त्यांच्या प्रवासामधील महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ईव्ही श्रेणीमधील या प्रवेशासह पर्यावरणीय स्थिरता राखण्याप्रती, तसेच यामाहाला परिभाषित करणारा तोच उत्साह व कार्यक्षमता देण्याप्रती ब्रँडची कटिबद्धता दृढ झाली आहे असे कंपनीने आपल्या निवेदनात अंतिमतः म्हटले आहे.