दिल्ली स्फोटातील ‘त्या’ आय २० कारने कुठून कसा केला प्रवास?

या घटनाक्रमात ही गाडी ठरतेय महत्वाचा फॅक्टर


नवी दिल्ली :  देशाची राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा एक दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता आहे. या घटनाक्रमात एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे हा स्फोट ज्या गाडीत झाला ती i20 गाडी! दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी देखील आपल्या तपासाची दिशा या गाडीच्या भोवतीच ठेवली होती. या i20 गाडीचा तपास करताना त्यांच्या हाती अनेक महत्वाचे धागेदोरे सापडले आहेत.


दिल्ली कार स्फोटातील i20 ही हरियाणा पासिंगची गाडी असून तिचा नंबर HR26CE7674 असा आहे. तिचे उत्पादन २०१३ मध्ये झाले होते. ही गाडी २०१४ मध्ये सलमान नावाच्या व्यक्तीवर रजिस्टर झाली होती. तो या गाडीचा दुसरा मालक आहे. नोंदणी कागदावरून सलमान हा गुरूग्रामचा रहिवासी असल्याचं कळंतय.


ज्यावेळी पोलिसांनी सलामनला दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणी ताब्यात घेतलं त्यावेळी त्यानं ही गाडी ओखला येथील देवेंद्र नामक व्यक्तीला विकल्याचं सांगितलं. देवेंद्रनं देखील ही गाडी अंबाला येथील एका व्यक्तीला विकली. त्या व्यक्तीनं ही गाडी नंतर जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथल्या आमिर याला विकल्याचं तपासात आढळून आलं आहे. आमिरकडं ही i20 गाडी आल्यानंतर ती गाडी डॉक्टर उमर मोहम्मद याच्याकडं आली. तो फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठात काम करत होता. ज्यावेळी i20 कारमध्ये ब्लास्ट झाला त्यावेळी गाडी डॉक्टर उमर मोहम्मदच चालवत असल्याचा संशय आहे. तपास यंत्रणा ही आत्मघातकी हल्ला असू शकतो का या अनुषंगानं देखील तपास करत आहेत. दिल्ली स्फोटातील ही i20 जरी अनेक माणसांकडे फिरली असली तरी त्याचा कागदोपत्री मालक एकच आहे. तो व्यक्ती म्हणजे सलमान! जरी ही गाडी अनेक राज्य फिरली असली तरी त्याचा मालक एकच राहिला.


ज्यांना गुन्हा करायचा आहे ते कागदपत्र क्लिअर नसलेली गाडी शोधत असतात. त्यामुळं गुन्हेगारांचा माग काढणं कठीण होतं. जुन्या गाड्यांचे व्यवहार करणाऱ्या व्यक्ती पैसे वाचवण्यासाठी ही कट प्रॅक्टिस अवलंबतात. मात्र त्यामुळं जर अशी गाडी एखाद्या गुन्ह्यात वापरली गेली तर तपास यंत्रणा थेट त्या गाडीच्या मूळ मालकापर्यंत पोहोचतात.



i20 चा त्या दिवशीचा प्रवास कसा होता?



  1. तपासात ही आय २० गाडी नेताजी सुभाष मार्गावरील सिग्लनवर पोहचण्यापूर्वी कुठं कुठं गेली होती हे उघड झालं आहे. आतापर्यंतच्या तपासात असं दिसून आलं आहे की या i20 गाडीनं फरीदाबादपासून आपला प्रवास सुरू केला होता. त्यानंतर ही गाडी बद्रापूर बॉर्डर क्रॉस करून राजधानी दिल्लीत दाखल झाली. त्यानंतर ही गाडी सरई काले खान, आयटीओ इंटरसेक्शन असा प्रवास करत लाल किल्ल्याजवळील पार्किंग लॉटमध्ये पोहचली. हा पार्किंग लॉट लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात आहे.

  2.  पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून तपासासाठी अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. स्फोट झालेली पांढऱ्या रंगाची i20 कार स्फोटापूर्वी तीन तासांहून अधिक काळ सुनहरी मशिदीजवळच्या पार्किंग लॉटमध्ये उभी असल्याचे फुटेजमध्ये दिसले आहे. दुपारी३.१९ वाजल्यापासून संध्याकाळी ६.४८ वाजेपर्यंत ही कार तिथे होती.

  3. कार पार्किंगमधून बाहेर पडून ट्रॅफिक सिग्नलजवळ येताच, संध्याकाळी ६.५२ वाजता त्यामध्ये हा भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरातील लोकांनी सुरक्षिततेसाठी धावपळ केल्याचे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे
    लोट उठल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.

Comments
Add Comment

Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली.

Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपातीची टांगती तलवार; १४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये मक्तेदारी निर्माण करणारी कंपनी ॲमेझॉन (Amazon)

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

Ahmedabad Toodler Death : डोशाच विषारी पीठ की जाणीवपूर्व केलेला विषप्रयोग ? पोलिसांचा संशय बळावला

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा येथे झालेल्या दुहेरी मृत्यूने सर्वाना धक्का बसला आहे. एकाच

Subansiri News : महागड्या विजेचा फटका: आसाम आणि मेघालयचा सुबनसिरी प्रकल्पातील अतिरिक्त वीज घेण्यास नकार

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी जलविद्युत योजना असलेल्या २००० मेगावॅट क्षमतेच्या 'लोअर सुबनसिरी' (Subansiri Lower HEP)

Gujrat News : रात्री डोसा खाल्ला अन् होत्याच नव्हतं झालं...हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त!

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने