Stock Market Opening Bell: आयटी शेअर पाचव्यांदा तेजीतच बाजारात वाढ कायम ट्रम्प यांच्या वक्तव्याचा सकारात्मक परिणाम परंतु.. वाचा 'आजची' टेक्निकल पोझिशन

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात चांगली वाढ झाली आहे. एकूणच शेअर बाजारातील उसळीला आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत कारणे जबाबदार आहेत. सेन्सेक्स ३५०.२९ अंकाने व निफ्टी १०० अंकाने उसळला आहे. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीतही सकारात्मक वाढ झाल्याने बाजाराने 'तेजी' असल्याचे अधोरेखित केले. याशिवाय आज सलग पाचव्यांदा आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याने बाजारातील गुंतवणूकीतील भावना जागतिक पातळीवरील शेअर बाजाराप्रमाणे एआय व आयटी शेअर्समध्ये उसळल्या आहेत. किंबहुना त्यामुळेच आजही बाजाराला सपोर्ट लेवल मिळण्यास आयटी शेअरने मदत केली. याशिवाय ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपसह मिडकॅप व स्मॉलकॅप वाढ कायम असल्याने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आज चांगले लक्ष बाजारात दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील ५०% टॅरिफ कमी करणार या विधानाने बाजारात आणखी औत्सुक्याचे वातावरण असून आंतरराष्ट्रीय बाजारातील तज्ञांच्या मते डिसेंबर महिन्यात फेड व्याजदरात ५० बेसिस पूर्णांकाने कपात होऊ शकते असे म्हटले जात आहे. काही अहवालातील माहितीनुसार, भारतीय बाजारातील रेपो दरातही कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे असे असताना वित्तीय व बँक शेअर्समध्येही तेजी कायम राहू शकते. अर्थात संमिश्र भावना तिमाही निकालांमुळे कायम असल्याने अस्थिरता कायम राहील.


आज सकाळच्या सत्रात निफ्टी व्यापक निर्देशांकातील निफ्टी १०० (०.४०%), निफ्टी २०० (०.४१%), निफ्टी ५०० (०.४१%), निफ्टी स्मॉलकॅप १०० (०.५५%), निफ्टी स्मॉलकॅप ५० (०.६२%) निर्देशांकात वाढ झाली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ तेल व गॅस (१.१८%), आयटी (१.१०%), रिअल्टी (०.५२%) समभागात झाली आहे तर घसरण केवळ एफएमसीजी (०.१८%) निर्देशांकात झाली आहे.


आज सकाळच्या सत्रात आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.३०%) सह सर्वाधिक वाढ हेंगसेंग (०.७०%), तैवान वेटेड (०.८५%), जकार्ता कंपोझिट (०.६८%) निर्देशांकात झाली आहे. तर सर्वाधिक घसरण सेट कंपोझिट (०.५१%), शांघाई कंपोझिट (०.२४%) निर्देशांकात झाली आहे.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ किर्लोस्कर ऑईल (११.९१%), सायरमा एसजीएस टेक्नॉलॉजी (७.२६%), बीएसई (६.०१%), टीआरआयएल (४.५९%),अपार इंडस्ट्रीज (४.४४%), आयएफसीआय (४.४२%), सोनाटा सॉफ्टवेअर (३.४७%) समभागात झाली आहे.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण हिंदुस्थान कॉपर (३.८४%), थरमॅक्स (३.४७%), सुंदरम फायनान्स (३.४५%), गोदरेज इंडस्ट्रीज (२.४९%), एथर एनर्जी (२.२७%), क्राफ्ट्समन ऑटो (२.२२%) केपीआर मिल्स (२.२०%), पीआय इंडस्ट्रीज (१.७९%), होम फर्स्ट फायनान्स (१.७५%) निर्देशांकात झाली आहे.


आजच्या बाजार पूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,' भारत-अमेरिका व्यापार करार लवकरच अंतिम होणार असल्याच्या बातम्या आणि बिहारमध्ये एनडीएला निर्णायक विजय मिळण्याची शक्यता असलेल्या एक्झिट पोलमुळे भावना चांगल्या दिशेने वळल्या आहेत. यामुळे बाजारातील तेजी वाढेल परंतु निर्णायक ब्रेकआउट आणि सतत तेजीसाठी पुरेसे नाही. सध्याच्या ट्रेंडनुसार, एफआयआय पुन्हा उच्च पातळीवर विक्री करण्याची शक्यता आहे. जोपर्यंत एआय व्यापार चालू राहतो तोपर्यंत एफआयआयच्या पैशात सतत उलटफेर होण्याची शक्यता कमी दिसते.मूलभूत दृष्टिकोनातून, आशावादाला जागा आहे कारण जीडीपी वाढ मजबूत आहे आणि आर्थिक वर्ष २७ साठी कमाईची वाढ उज्ज्वल दिसते. वित्तीय, उपभोग आणि संरक्षण समभागांमध्ये तेजीच्या पुढील टप्प्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे.'


आजच्या बाजारातील सुरूवातीच्या निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,' दिवसाच्या सुरुवातीला काही अनिश्चित क्षण असूनही, त्यानंतर वाढलेली चढउतार आणि २५६५० पातळीच्या पुढे बंद झाल्यामुळे निफ्टी काल आपण ठरवलेल्या २५८५०-९८० पातळीच्या उद्दिष्टांसाठी मार्गावर आहे. दरम्यान, २५७२६ पातळीच्या आसपास काही अशांततेची अपेक्षा आहे. त्यावर तरंगण्यास असमर्थता किंवा २५६३० पातळीच्या पुढे थेट घसरण दिवसाच्या वाढीच्या आशा नाकारू शकते. खोलात पाहिल्यास त्या आधारे अनुक्रमे २५२०० आणि २५०८८ पातळीवर ते आहेत.

Comments
Add Comment

Groww Share Lisiting: ओरक्ला, लेन्सकार्ट यांच्या निराशाजनक आयपीओनंतर 'ग्रो' कंपनीचे दमदार लिस्टिंग थेट १४% प्रिमियमसह बाजारात सूचीबद्ध

मोहित सोमण:६६३२ कोटी रूपये बूक व्हॅल्यु असलेला आयपीओ आज अखेर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध

Tata Motors Demerger: टाटा मोटर्स कर्मशिअल व्हेईकल कंपनी शेअर बाजारात २८% अधिक प्रिमियम दरात सूचीबद्ध

मोहित सोमण: १ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या टाटा मोटर्सच्या चर्चित डिमर्जर टाटा मोटर्स कर्मशिअल व्हेईकल

Top Stocks Picks for Today: मोतीलाल ओसवालकडून फंडामेंटल व टेक्निकल अहवालाद्वारे 'पुढील' ५ शेअर खरेदीचा गुंतवणूकदारांना सल्ला

प्रतिनिधी:आज मोतीलाल ओसवालने फंडामेंटल व टेक्निकल पोझिशनआधारे आपल्या अहवालातून काही शेअर खरेदी करण्याचा सल्ला

राज्यात पाऊस आणि थंडीचं दुहेरी संकट; हवामान खात्याकडून १२ आणि १३ नोव्हेंबरला अलर्ट

 मुंबई : नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने धडक दिल्यानंतर आता वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय. देशभरात काही

धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारली, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी

दिल्ली स्फोटातील ‘त्या’ आय २० कारने कुठून कसा केला प्रवास?

या घटनाक्रमात ही गाडी ठरतेय महत्वाचा फॅक्टर नवी दिल्ली :  देशाची राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ सोमवारी,