मोहित सोमण: शेअर बाजारात आज 'चतुरस्त्र' वाढ झाली आहे. सेन्सेक्स तब्बल ५९५.१९ अंकाने उसळत ८४४६५.५१ पातळीवर व निफ्टी ५० हा १८०.८५ अंकाने उसळत २५८७५.८० पातळीवर स्थिरावला आहे. बिहारमध्ये एनडीए जिंकत असल्याच्या एक्सिट पोलमध्ये स्पष्ट करण्यात आले होते याखेरीज डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील टॅरिफ कमी करण्याच्या वक्तव्यामुळे व एकूणच आज सहाव्यांदा आयटी शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या रॅलीमुळे आज शेअर बाजारात मोठी वाढ झाली असून निफ्टीने तर २५८७० ची पातळीही ओलांडली आहे. याखेरीज मोठ्या प्रमाणात ब्लू चिप्स कंपनीच्या शेअर्ससह मिडकॅप शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे बाजारात आज मोठा आकडा साध्य करण्यासाठी मदत झाली आहे. आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकातील वाढीला फायनांशियल सर्विसेस व बँकिंग शेअरचे समर्थन मिळाल्याने बाजार अस्थिरतेतही टिकण्यास मदत झाली आहे.
अखेरच्या सत्रात व्यापक निर्देशांकातील निफ्टी १०० (०.६१%), निफ्टी २०० (०.६४%), मिडकॅप ५० (०.८३%), स्मॉलकॅप १०० (०.८२%) निर्देशांकात वाढ झाली आहे तर निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील सर्वाधिक वाढ ऑटो (१.२४%), आयटी (२.०४%), फार्मा (१.००%), मिडस्मॉल हेल्थकेअर (१.०८%) निर्देशांकात झाली आहे. रिअल्टी (०.४९%), मेटल (०.१६%) या दोन निर्देशांकात मात्र घसरण आज झाली आहे.
सतत ' हिरव्या' रंगावार मार्गक्रमण करणारा अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) आठवड्यात पहिल्यांदाच ३.०.४% पातळीवर पोहोचल्या बाजारात आजच्या अस्थिरता खूप कमी पातळीवर सुरू राहिली आज दुपारी इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान बाजार ७०० अंकांचीही पातळी गाठण्यास यशस्वी ठरला आहे. डोनाल्ड ट्रम्प भारतीय निर्यातीवर कर ५०% हून कमी करू शकतात या बातमीमुळे आज गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक राखल्याचे दिसून आले आहे.
आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ गिफ्ट निफ्टीसह (०.५३%), कोसपी (१.०६%), हेंगसेंग (०.८६%), स्ट्रेट टाईम्स (०.५८%), तैवान वेटेड (०.५८%) निर्देशांकात झाली आहे. तर अमेरिकन बाजारातील सुरुवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.२६%), एस अँड पी ५०० (०.१८%) बाजारात वाढ झाली असून नासडाक (०.१५%) बाजारात घसरण सुरू आहे.
आज जागतिक बाजारपेठेतील डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने आणखी रूपयांच्या घसरणीमुळे अतिरिक्त परदेशी गुंतवणूक राखण्यास बाजाराला अपयश आले. रूपया डॉलरच्या तुलनेत १६ पैशाने घसरला होता. डॉलरच्या निर्देशांकात (DXY) वाढ झाल्याने रूपयात मोठी घसरण झाली असून कमोडिटी बाबतीत विशेषतः सोन्याच्या बाबतीत आज मात्र स्थिरतेमुळे घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही आज घसरण झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ किर्लोस्कर ऑईल (११.९८%), बीएलएस इंटरनॅशनल (९.१४%), तेजस नेटवर्क (८.४२%), सायरमा एसजीएस टेक्नॉलॉजी (७.४४%), अपार इंडस्ट्रीज (५.२६%), सोनाटा सॉफ्टवेअर (५.६५%), अदानी एंटरप्राईजेस (४.९७%), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (४.९७%), बीएसई (४.९७%) समभागात झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण हिंदुस्थान कॉपर (५.५६%), पीआय इंडस्ट्रीज (५.२३%), एथर एनर्जी (४.७४%), टोरंट पॉवर (३.२९%), प्रेस्टिज इस्टेट (३.२६%), पीव्हीआर आयनॉक्स (२.५३%), गोदावरी पॉवर (२.४७%), वरूण बेवरेज (२.४०%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'अमेरिकन सरकारच्या शटडाऊनच्या अपेक्षित निराकरणाबद्दल आशावाद आणि अमेरिकन कामगार बाजार थंडावण्याच्या चिन्हे असताना फेडच्या लवकर कपातीच्या वाढत्या अपेक्षांमुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये पुन्हा जोखीम घेण्याची क्षमता वाढली. उदयोन्मुख बाजारपेठांनी चांगली कामगिरी केली, जी जागतिक भावनांमधील सुधारणा दर्शवते. भारतीय निर्देशांकांनी या ताकदीचे प्रतिबिंब दाखवले, विशेषतः ऑटो, आयटी आणि फार्मा क्षेत्रात लार्ज-कॅप शेअर्सने आघाडी घेतली. सीपीआय आणि डब्ल्यूपीआय चलनवाढ कमी करणे, मजबूत जीडीपी आउटलुक आणि निरोगी एच2 कमाईच्या अपेक्षांसह - देशांतर्गत मॅक्रो फंडामेंटल्स सकारात्मक बाजार गतीला आधार देत आहेत.'
आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'निफ्टी निर्देशांकाने आपला वरचा ट्रेंड सुरू ठेवला आहे आणि गॅप-अप ओपनिंगनंतर तो मजबूत दिसत आहे. दैनिक चार्टवर, घसरत्या चॅनेल ब्रेकआउटच्या पुनर्चाचणीनंतर निर्देशांकाने उच्चांक गाठला आहे. याशिवाय, निर्देशांक २१ ईएमए (Exponential Moving Average EMA)च्या वर गेला आहे, जो सध्याच्या वरच्या ट्रेंडची पुष्टी करतो. अल्पावधीत भावना सकारात्मक राहू शकते, निर्देशांक २६००० पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. खालच्या टोकावर, तात्काळ आधार २५७०० पातळीवर ठेवला आहे.'
आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सुस्त सत्रात रुपया ०.०६ रुपयांनी कमकुवत होऊन ८८.६२ वर व्यवहार करत होता, व्यापारी प्रमुख आर्थिक संकेतांची वाट पाहत असल्याने तो एका मर्यादित मर्यादेत राहिला. डॉलर निर्देशांक ९९.६० डॉलरच्या जवळ मोठ्या प्रमाणात बाजूला राहिला, ज्यामुळे मर्यादित दिशात्मक हालचाल दिसून येत आहे. बाजारातील सहभागी आता या आठवड्यातील यूएस सीपीआय डेटाकडे लक्ष देत आहेत, जो डॉलरच्या मार्गासाठी नवीन ट्रिगर प्रदान करेल आणि त्या बदल्यात रुपयाच्या हालचालींवर परिणाम करेल अशी अपेक्षा आहे. सध्या, रुपया श्रेणीबद्ध राहण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये ८८.४०-८८.८५ दरम्यान ट्रेडिंग बँड अपेक्षित आहे.'
आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक नागराज शेट्टी म्हणाले आहेत की,'बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात निफ्टीने आपली वरची गती कायम ठेवली आणि निफ्टीने दिवसभर १८० अंकांनी वाढ नोंदवली. सत्राच्या सुरुवातीपासून ते मध्यापर्यंत १३९ अंकांच्या वरच्या पातळीसह उघडल्यानंतर, निफ्टी सत्राच्या सुरुवातीच्या ते मध्यापर्यंत आणखी वर गेला. शेवटी एकत्रीकरण दिसून आले आणि निफ्टी अखेर उच्चांकाच्या जवळ बंद झाला. सुरुवातीचा वरचा थर अजूनही अपूर्ण आहे.दैनिक चार्टवर किरकोळ वरच्या आणि खालच्या छायासह एक वाजवी बुल कॅन्डल तयार झाली. तांत्रिकदृष्ट्या, ही बाजाराची कृती अपट्रेंड चालू ठेवण्याच्या पॅटर्नचे संकेत देते. जर सध्याचा ओपनिंग अप गॅप पुढील २-३ सत्रांसाठी खुला राहिला, तर तो अंतर बुलिश रनअवे गॅप म्हणून विचारात घेतला जाऊ शकतो, जो सामान्यतः ट्रेंडच्या मध्यभागी तयार होतो.निफ्टीचा अंतर्निहित अल्पकालीन ट्रेंड सकारात्मक राहतो. पुढील काही सत्रांसाठी २६१००-२६२०० पातळींभोवती पुढील वरची लक्ष्ये पाहिली जातील. तात्काळ आधार २५७०० पातळीवर ठेवण्यात आला आहे.'
आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक दिलीप परमार म्हणाले आहेत की,'बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात निफ्टीने आपली वरची गती कायम ठेवली आणि निफ्टीने दिवसभर १८० अंकांनी वाढ नोंदवली. सत्राच्या सुरुवातीपासून ते मध्यापर्यंत १३९ अंकांच्या वरच्या पातळीसह उघडल्यानंतर, निफ्टी सत्राच्या सुरुवातीच्या ते मध्यापर्यंत आणखी वर गेला. शेवटी एकत्रीकरण दिसून आले आणि निफ्टी अखेर उच्चांकाच्या जवळ बंद झाला. सुरुवातीचा वरचा थर अजूनही अपूर्ण आहे.दैनिक चार्टवर किरकोळ वरच्या आणि खालच्या छायासह एक वाजवी बुल कॅन्डल तयार झाली. तांत्रिकदृष्ट्या, ही बाजाराची कृती अपट्रेंड चालू ठेवण्याच्या पॅटर्नचे संकेत देते. जर सध्याचा ओपनिंग अप गॅप पुढील २-३ सत्रांसाठी खुला राहिला, तर तो अंतर बुलिश रनअवे गॅप म्हणून विचारात घेतला जाऊ शकतो, जो सामान्यतः ट्रेंडच्या मध्यभागी तयार होतो.निफ्टीचा अंतर्निहित अल्पकालीन ट्रेंड सकारात्मक राहतो. पुढील काही सत्रांसाठी २६१००-२६२०० पातळींभोवती पुढील वरची लक्ष्ये पाहिली जातील. तात्काळ आधार २५७०० पातळीवर ठेवण्यात आला आहे.'