पंढरपूरच्या विठुरायाला भरली हुडहुडी! होळीपर्यंत असतो विठुरायाच्या हा खास पोषक

पंढरपूर : सध्या राज्यभर थंडीचा कडाका वाढत चालला आहे. आणि तापमानाचा पारा गोठत चालला आहे त्यामुळे साक्षात विठुरायालाही या थंडीमुळे हुडहुडी भरली असून देवाला ऊब देण्यासाठी उबदार रजई, शाल आणि डोक्याला रेशमी मुंडासे बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

थंडीचा कडाका वाढत चालल्याने देवाला हे उबदार कपडे देण्यास सुरुवात होते. रात्री आरतीनंतर जेव्हा विठुराया निद्रेसाठी जातो तेव्हा त्याच्या अंगावरील पोशाख काढून देवाचे अंग पुसले जाते. डोक्यावरील मुकुट काढून, हात लांबीचे हे खास उबदार मुंडासे देवाच्या मस्तकावर वैशिष्ठयपूर्ण पद्धतीने बांधण्यात येते.



 

यानंतर देवाला थंडी वाजू नये म्हणून सुती उपरण्याची पानपट्टी देवाच्या कानाला बांधण्यात येते. देवाच्या उघड्या अंगावर पांढरा शुभ्र उबदार शेला डोक्यापासून पायापर्यंत टाकण्यात येतो. यावर पारंपरिक असलेली देवाची उबदार शाल अंगावर टाकून त्यावर खास काश्मिरी रजई घालण्यात येते . या कपड्यांमुळे देवाला नखशिखांत उबदारपणा जाणवेल याची खबरदारी घेतली जाते



यानंतर देवाला तुळशीहार घालून आरती करीत देवाला निद्रेसाठी सज्ज केले जाते. पहाटे काकड्याच्यावेळी देवाच्या अंगावरील ही काश्मिरी रजई फक्त काढून बाकीचे उबदार कपडे तसेच ठेवण्यात येतात . साधारणपणे प्रक्षाळपुजेच्या दुसऱ्या दिवसापासून देवाची हुडहुडी घालविण्यासाठी हा खास पद्धतीचा पोशाख देवाला घालण्यात येत असून साधारण होळीपर्यंत हे उबदार कपडे देवाला घालण्यात येतात

 



याच पद्धतीने रुक्मिणी मातेलाही उबदार काश्मिरी शाल परिधान करण्यात येते.
Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम