लंडन मधील ऐतिहासिक "इंडिया हाऊस" महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार - मंत्री आशिष शेलार

मुंबई : लंडनमधील स्वातंत्र्य सैनिकांचे वास्तव्य असलेल्या "इंडिया हाऊस"ला महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास स्मारक म्हणून जतन करेल. या ‘इंडिया हाऊस’मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वास्तव्य होते, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली.


सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार हे नागपूरकराच्या रघूजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी इंडिया हाऊसला भेट दिली होती. त्यावेळी लंडनस्थीत भारतीयांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही ही मागणी केली होती. आज याबाबत मंत्रालय दालनात आमदार देवयानी फरांदे, सामान्य प्रशासन, सांस्कृतिक कार्य, पुरातत्व विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात आला.


या बैठकीत "मित्रा"च्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यात सामान्य प्रशासन विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग आणि वित्त विभागाचा सहभाग असेल. ही समिती ‘इंडिया हाऊस’ ताब्यात घेण्याबाबतचा सर्वंकष अहवाल तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादरीकरण मांडण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

फुलांची होळी उपक्रमातून महापौर रितू तावडे यांनी दिला पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश

मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक

दोन महिन्यांत राज्यातील सव्वा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

आरोग्य जागर : सिकलसेलपासून कर्करोगापर्यंतच्या मोहिमांना मोठे यश मुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ

राज्यातील अकुशल कामगारांच्या थकीत मजुरीचा प्रश्न सुटला

मनरेगा अंतर्गत १ हजार १६८ कोटींचा निधी मंजूर; होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा श्रमिकांना मोठा दिलासा मुंबई :

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना आणि मदतीसाठीचे हेल्पलाईन आणि व्हॉटसॲप क्रमांक

मुंबई : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या