धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारली, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात 31 ऑक्टोबरपासून दाखल असलेल्या धर्मेंद्र यांना आज सकाळी साडेसातच्या सुमारास डिस्चार्ज मिळाला आहे. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी नेण्यात आले.


बॉबी देओल स्वतः वडिलांना रुग्णवाहिकेतून घरी घेऊन गेले. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, आता धर्मेंद्र यांच्यावर घरातच पुढील उपचार सुरू राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास जाणवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. या काळात चाहत्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी सतत प्रार्थना केली. काल त्यांच्या निधनाची अफवा पसरल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ माजली होती, मात्र कुटुंबीयांनी ती माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले.

कुटुंबाकडून तब्येतीची माहिती


सनी देओल आणि बॉबी देओल यांची टीम तसेच हेमा मालिनी आणि ईशा देओल सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत वेळोवेळी माहिती देत आहेत.


या कलाकारांनी घेतली रुग्णालयात भेट


दरम्यान, धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, गोविंदा, अमिषा पटेल आणि त्यांचे माजी जावई भरत यांसारख्या अनेक कलाकारांनी रुग्णालयात भेट दिली होती. त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता स्पष्ट जाणवत होती.


लवकरच धर्मेंद्र यांचा इक्किस हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला होता, ज्यात अगस्त्य नंदा प्रमुख भूमिकेत आहे.

Comments
Add Comment

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत

‘दृश्यम ३’मधील कराराचा भंग केल्याप्रकरणी ‘धुरंधर’ अक्षय खन्नाला नोटीस

मुंबई : आगामी 'दृश्यम ३' या चित्रपटासाठी केलेल्या कराराचा भंग केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय खन्ना याला कायदेशीर

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला

अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

हैदराबाद : 'झुकेगा नही' म्हणणारा अभिनेता कायदेशीर पेचात अडकला आहे. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये 'पुष्पा २'च्या