नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) स्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला असून, अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. आरोपींच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचा खरा प्लॅन दिल्लीतील लाल किल्ला स्फोटापेक्षा कितीतरी पट अधिक खतरनाक होता. या दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य अयोध्या आणि वाराणसीतील राम मंदिर होते. त्यांना जास्तीत जास्त लोकांना नुकसान पोहोचवायचे होते, ज्यासाठी त्यांनी या दोन्ही धार्मिक स्थळांचे मॉड्यूल तयार केले होते. दिल्लीतील स्फोट हा घाईत झाल्याचे पुढे आले आहे. लाल किल्ला स्फोटात काही डॉक्टरांचा सहभाग असल्याचे उघड झाल्यामुळे 'व्हाईट कॉलर टेरर'ची चर्चा सुरू झाली. उमर मोहम्मद हाच गाडी चालवत होता आणि अटक केलेल्या इतर दहशतवाद्यांच्या चौकशीतूनच हा मोठा कट समोर आला. अटक करण्यात आलेली संशयित शाहीन हिने अयोध्येत स्लीपर मॉड्यूल सक्रिय केल्याची माहिती तपासात स्पष्ट झाली आहे. स्फोटात वापरलेले साहित्य बांगलादेश आणि नेपाळच्या मार्गे भारतात आणले गेले होते. सुदैवाने, हल्ला करण्यापूर्वीच सुरक्षा यंत्रणांना या कटाची कल्पना आली आणि त्यांनी या दहशतवाद्यांना अटक करून त्यांची स्फोटके जप्त केली. या मोठ्या कटाचा वेळीच पर्दाफाश झाल्याने एक मोठी दुर्घटना टळली आहे.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून (Central Railway Line) प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनचा ...
३०० किलो स्फोटके जप्त करण्याचे मोठे आव्हान
दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी अधिक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. आतापर्यंतच्या तपासातून असे स्पष्ट झाले आहे की, स्फोटकांमध्ये कोणताही टायमर (Timer) नव्हता आणि हा स्फोट घाईघाईत करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी चौकशीदरम्यान सांगितले की, त्यांना स्फोट जास्तीत जास्त लोक असलेल्या गर्दीच्या ठिकाणी घडवायचा होता. मात्र, आता सुरक्षा एजन्सींसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे, त्यांना उर्वरित ३०० किलो अमोनियम नायट्रेट स्फोटके जप्त करायची आहेत. दहशतवाद्यांनी ही स्फोटके लपवून ठेवली आहेत. आतापर्यंत एजन्सीने २,९०० किलो स्फोटके जप्त केली असली तरी, उर्वरित साठा शोधण्यासाठी दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात आहे आणि अनेक ठिकाणी सतत छापेमारी सुरू आहे. स्फोटात वापरण्यात आलेली i२० कार नेमकी कुठे-कुठे गेली होती, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. गाडीत स्फोटके नेमकी कुठे भरण्यात आली, याचाही शोध सुरू आहे. सूत्रांनुसार, स्फोट होण्यापूर्वी ही गाडी लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये जवळपास तीन तास उभी होती. दहशतवाद्यांच्या हालचाली आणि कटाची साखळी जोडण्यासाठी तपास यंत्रणा या कारच्या प्रवासाचा आणि पार्किंगमधील वेळेचा सखोल अभ्यास करत आहेत.