मोहित सोमण:नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) विभागाने स्कीम ऑफ अरेजमेंट अंतर्गत Allcargo Logistic Limited कंपनीच्या डिमर्जरला मान्यता दिल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे आता ही कंपनी Allcargo Global Limited कंपनीत सामील झाली आहे. तसेच Allcargo Gati Limited कंपनीच्या मर्जरला नियामकांनी मान्यता दिल्याचे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही कंपनी आता Allcargo Logistic कंपनीचा भाग असणार आहे. डिमर्जर झालेली कंपनी आंतरराष्ट्रीय साखळी पुरवठा (Supply Chain), लॉजिस्टिक्स व्यवसायाशी संबंधित आहे. कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये या योजनेमुळे कॉर्पोरेट रचनेचे सरलीकरण होईल आणि कायदेशीर संस्थांची संख्या कमी होईल. आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी व्यवसाय हा रिझल्टिंग कंपनीकडून केला जाईल, जो प्रत्यक्षपणे भागधारकांच्या मालकीचा असेल. एकत्रीकरण १,२ नुसार एक्सप्रेस लॉजिस्टिक्स आणि कॉन्ट्रॅक्ट लॉजिस्टिक्स व्यवसाय हस्तांतरण कंपनी २ कडून केला जाईल, जो प्रत्यक्षपणे भागधारकांच्या मालकीचा असेल' असे म्हटले आहे. एनसीएलटीने दिलेल्या ऑर्डरप्रमाणे कंपनीच्या भागभांडवलधारकांना उद्देशून म्हटले आहे.
एनसीएलटी कंपनी कायदा, २०१३ च्या कलम २३० ते २३२ च्या तरतुदींनुसार ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड (ऑलकार्गो किंवा ट्रान्सफरी कंपनी किंवा डिमर्ज्ड कंपनी) आणि ऑलकार्गो सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड (एएससीपीएल),डिमर्ज्ड कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी, गती एक्सप्रेस अँड सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड (ट्रान्सफर जीईएससीपीएल),ऑलकार्गो गती लिमिटेड (ट्रान्सफरी कंपनी) आणि ऑलकार्गो ग्लोबल लिमिटेड (पूर्वी ऑलकार्गो वर्ल्डवाइड लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी आणि मूळतः ऑलकार्गो ईसीयू लिमिटेड म्हणून समाविष्ट केलेली रिझल्टिंग कंपनी किंवा एजीएल) डिमर्ज्ड कंपनी आणि त्यांच्या संबंधित भागधारकांची योजना पूर्ण मालकीची उपकंपनी यांच्या संयुक्त व्यवस्थेच्या योजनेला (Scheme of Arrangement) या न्यायाधिकरणाची मंजुरी मिळविण्यासाठी ही संयुक्त कंपनी याचिका दाखल करण्यात येत आहे.' असे एनसीएलटीकडून जाहीर झालेल्या निकालात म्हटले आहे.
ऑलकार्गो लॉजिस्टिक्स प्रामुख्याने या लॉजिस्टिक्स व्यवसायाशी संबंधित असून सीएफएस, ग्राऊंड एक्स्प्रेस, सीएफएस आयसीडी अशा विविध सेवा कंपनी पुरवते. कंपनीच्या डिमर्जर व मर्जर प्रकियेत कंपनीच्या भागभांडवल धारकांना त्यांच्या दर्शनी मूल्यांच्या तुलनेत इक्विटी शेअरचे वाटप कंपनी करणार आहे. सत्र सुरूवातीला आज मात्र ऑलकार्गो लॉजिस्टिक्सने शेअर महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे जो ५२ आठवड्यांचा नीचांकी पातळीवर(All time Low) पोहोचला होता. ही घसरण बाजारात खराब कामगिरी करणाऱ्या स्मॉलकॅप ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस कंपनीसाठी एक मोठी घसरण मानली जाते. गेल्या दोन दिवसांत या शेअरमध्ये घसरण झाली ज्यामुळे या कालावधीत पेनी स्टॉक गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. उपलब्ध माहितीनुसार,ती थेट ६६.५५% घट झाली आहे. स्टॉकची इंट्राडे अस्थिरता ६.५३% वर नोंदवली गेली असून ही शेअरमधील अस्थिरतेची पुष्टी करते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. टेक्निकलली ऑलकार्गो सध्या त्याच्या ५-दिवस, २०-दिवस, ५०-दिवस, १००-दिवस आणि २००-दिवसांच्या डीएमए (गेली मूव्हिंग अँव्हरेज) सरासरीपेक्षा कमी पातळीवर व्यवहार करत आहे. दुपारी १२.४६ वाजता कंपनीचा शेअर ६४.७२% घसरत ११.१५ रूपयांवर व्यवहार करत आहे.