लगीनसराईत नववधूच्या सौंदर्याची चमक!

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर


आली लगीनसराई...लग्नसमारंभ म्हणजे केवळ एक विधी नव्हे, तर तो आनंदाचा, उत्साहाचा आणि सोहळ्याचा उत्सव असतो. सध्या सर्वत्र लग्नसराईची लगबग सुरू झाली आहे. घराघरांत मंगलमय वातावरण, खरेदीची धावपळ आणि तयारीचे जोरदार नियोजन सुरू आहे. या सर्व धावपळीमध्ये, ज्या व्यक्तीकडे सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात, ती म्हणजे 'वधू'... प्रत्येक वधूला तिच्या आयुष्यातील या सर्वात महत्त्वाच्या दिवशी सर्वात सुंदर दिसायचे असते. वधूच्या चेहऱ्यावर असलेले नैसर्गिक तेज, तिची शांत आणि आनंदी मुद्रा, हेच तिच्या सौंदर्याचे खरे गमक असते; परंतु, लग्नाच्या तयारीतील ताण, अपुरी झोप आणि धावपळीमुळे अनेकदा त्वचेवर निस्तेजपणा येतो. म्हणूनच, लग्नाच्या दिवसापर्यंत वधूने आपल्या चेहऱ्याची आणि त्वचेची खास काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मेकअप आणि ड्रेससोबतच त्वचेचे नैसर्गिक तेज हा वधूसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. हा नैसर्गिक ग्लो कसा टिकवायचा, कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि कोणत्या खास ब्युटी टिप्स फॉलो करायच्या, याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.


१. तयारी कधीपासून सुरू करावी?
त्वचेला नैसर्गिक चमक आणण्यासाठी कमीत कमी २ ते ३ महिने आधीपासून स्किन केअर सुरू करणे योग्य ठरते. हे केल्याने त्वचा हळूहळू तजेलदार, मऊ आणि चमकदार होते.
२. दैनंदिन त्वचा काळजीची दिनचर्या


सकाळची काळजी


क्लेंझर : आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार सौम्य फेसवॉश वापरा.


टोनर : रोमछिद्र बंद होण्यासाठी आणि त्वचा टाईट ठेवण्यासाठी.


मॉइश्चरायझर : त्वचेला हायड्रेशन देण्यासाठी हलका क्रीम वापरा.


सनस्क्रीन : किमान एसपीएफ ३० असलेली सनस्क्रीन रोज वापरणे अत्यावश्यक आहे.


रात्रीची काळजी


चेहरा सौम्य क्लेंझरने धुवा.


सीरम : व्हिटॅमिन सी किंवा हायलुरोनिक अॅसिड असलेला सीरम वापरल्यास त्वचेला चमक येते.


नाईट क्रीम : त्वचेची दुरुस्ती रात्री होते म्हणून हलका नाईट क्रीम लावणं गरजेचं आहे.


 



 

३. आठवड्याची काळजी


स्क्रबिंग : आठवड्यातून दोनदा हलक्या स्क्रबने चेहरा स्वच्छ करा.


फेसपॅक : घरगुती फेसपॅक जसे की बेसन, हळद, दही, गुलाबपाणी यांचा वापर करा.


स्टीमिंग : त्वचेतील धूळ व तेल काढण्यासाठी २ दिवसाआड किंवा आठवड्यातून एकदा स्टीम घ्या.


४. आहार आणि पाणी


त्वचेचे तेज बाहेरून नव्हे, तर आतून येते.


दररोज ८–१० ग्लास पाणी प्या.


आहारात फळे, भाज्या, सुकामेवा आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.


जंक फूड, साखर आणि तळलेले पदार्थ टाळा.


व्हिटॅमिन इ, सी आणि ओमेगा-३ असलेले अन्न (जसे की बदाम, अक्रोड, संत्री) उपयुक्त ठरते.


५. घरगुती उपाय


हळद + बेसन + दही पॅक : त्वचेला नैसर्गिक चमक देतो.


अलोव्हेरा जेल : त्वचा मऊ व हायड्रेटेड ठेवते


काकडी व गुलाबपाणी : थंडावा आणि ताजेपणा देते.


मध व लिंबाचा रस : डेड स्किन काढतो आणि ब्राइटनेस वाढवतो.


६. इतर महत्त्वाच्या गोष्टी


फेशियल : लग्नापूर्वी कमीतकमी ३–४ फेशियल सेशन्स घ्या, दर १५ दिवसांनी एक.


बॉडी केअर : बॉडी पॉलिशिंग, स्क्रब, स्पा यांचा समावेश करा.


झोप : ७-८ तास झोप घ्या. झोपेअभावी त्वचा थकलेली दिसते.


स्ट्रेस कमी ठेवा : ध्यान, योग, आणि सकारात्मक विचार ठेवा.


७. लग्नाच्या आठवड्यात विशेष काळजी


नवीन प्रॉडक्ट्स वापरणे टाळा.


हलका मेकअप आणि नियमित मॉइश्चरायझिंग करा.


पुरेसं पाणी प्या आणि जास्त तळकट पदार्थ टाळा.

Comments
Add Comment

Luck : चंगळता !

आमचे एक स्नेही आहेत. अगदी खेड्यात बालपण गेलेले असताना स्वकर्तृत्वाने शिक्षण घेतले, शिष्यवृत्त्यांवर शिकून

Lazy Pallu : उन्हाळ्यात वाढली ‘लेझी पल्लू’ची क्रेझ

एकेकाळी साडीचा पदर अगदी चापून-चोपून, नीट प्लेट्स घालून पिनअप करणं हीच एलिगंट फॅशन मानली जायची. पण बदलत्या

Kajuli biswas : संघर्ष आणि नि:स्वार्थ सेवेची कहाणी : काजुली विश्वास

पश्चिम बंगालच्या काजुली विश्वास यांनी गरिबी, उपासमार, बेघरपणा आणि आपल्याच लोकांची उपेक्षा सहन केली, पण या

Abhilasha Barak : मेजर अभिलाषा बराक यांना 'मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार

भारतीय लष्करातील धडाडीच्या महिला अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांनी आपल्या कर्तृत्वाने जागतिक पातळीवर देशाचे नाव

Children's drama : बालनाट्यांचे दिवस!

उन्हाळा आला, की आंबे, फणस, करवंदे, जांभळे, जाम या फळांची हटकून आठवण होते. फणसेची साटे, आंबापोळी, फणसपोळी, वाळवणं,

कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक