पनीर पकोडा पराठा!

मुलांना रोजच्या पराठ्यात नवा बदल हवा असतो आणि पनीरसारखी हेल्दी गोष्ट दिली, तर त्यांच्या वाढीला सर्वात चांगला फायदा होतो. पण पनीर दिसलं की अनेक मुलं तोंड वाकडं करतात. म्हणूनच पनीरला दिला आहे एक मजेशीर ट्विस्ट-पकोडा बनवून तो पराठ्यात लपवला! बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, चीजी-पनीरी चव, टिफिनमध्ये थंड झाला तरी तितकाच टेस्टी! प्रोटीन, कॅल्शियमने भरलेला हा पराठा मुलांची उंची, हाडांची ताकद आणि दैनंदिन ऊर्जा यासाठी खास उपयुक्त. खेळात, अभ्यासात किंवा इतर उपक्रमात दम न लागता मुलांनी धावावे, हसावे, खेळावे यासाठी...


(टिफिनसाठी परफेक्ट - बाहेर कुरकुरीत, आतून चीजी-पनीर!)


साहित्य :


सारणासाठी : पनीर १ कप
(क्युब्स/लहान चौकोनी तुकडे)
मीठ चवीनुसार,
लाल तिखट मिरची पावडर – अर्धा टीस्पून,
हळद – चिमूटभर
आमचूर/लिंबाचा रस –
अर्धा टीस्पून
शिमला मिरची /कॉर्न
चाट मसाला – पाव टीस्पून
बेसन – पाऊण कप
तांदळाचे पीठ – १ टेबलस्पून,
मीठ – चवीनुसार, थोडीशी हळद, पाणी
पराठ्यासाठी : गव्हाचे पीठ – २ कप
तूप/बटर – शेकायला
थोडे दूध – पीठ मऊ होण्यासाठी


कृती :
गव्हाचे पीठ + दूध + पाणी + मीठ घालून मऊ आणि लवचिक कणिक करा.
पनीर + मसाले + शिमला मिरची/कॉर्न एकत्र हलके मिक्स करा.
पनीरचे मसाले लावलेले तुकडे बेसन बॅटरमध्ये बुडवा.
तव्यावर हलके तूप/तेल घालून शॅलो फ्राय करा.


डीप फ्रायची गरज नाही –
पराठा बनवण्यासाठी पीठाची पोळी लाटून त्यात पनीर पकोडे ठेवा.
चारही बाजूंनी फोल्ड करून चौरस पाकीट बनवा.
हलक्या हाताने लाटून घ्या.
तव्यावर तूप/बटर घालून दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या.
सर्व्हिंग : केचप + दही मिंट डिप
मुलांच्या टिफिनमध्ये छोटी बाईट साइज पट्ट्या कापून द्या.


टिप्स :
मुलांना खायला सोपे जावे
म्हणून मिनी-पराठे करा.
चीज घातल्यास आणखी टेस्टी होईल.
हवे असल्यास बॅटरमध्ये थोडे
तिळ घालू शकता – चव व प्रोटीन
दोन्ही वाढतं.

Comments
Add Comment

Majhi Kanya Bhagyashree Yojana : ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचे फायदे ऐकूनही तुम्ही चकीत व्हाल

Majhi Kanya Bhagyashree Yojana : राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून

Ramai Awas Yojana : घर बांधायला पैसे नाहीत ? मग काळजी कशाला ? 'रमाई आवास' घरकुल योजना आहे ना !

Ramai Awas Yojana : राज्य सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘रमाई आवास (घरकुल) गृहनिर्माण योजना’ सुरू केली

Luck : चंगळता !

आमचे एक स्नेही आहेत. अगदी खेड्यात बालपण गेलेले असताना स्वकर्तृत्वाने शिक्षण घेतले, शिष्यवृत्त्यांवर शिकून

Lazy Pallu : उन्हाळ्यात वाढली ‘लेझी पल्लू’ची क्रेझ

एकेकाळी साडीचा पदर अगदी चापून-चोपून, नीट प्लेट्स घालून पिनअप करणं हीच एलिगंट फॅशन मानली जायची. पण बदलत्या

Kajuli biswas : संघर्ष आणि नि:स्वार्थ सेवेची कहाणी : काजुली विश्वास

पश्चिम बंगालच्या काजुली विश्वास यांनी गरिबी, उपासमार, बेघरपणा आणि आपल्याच लोकांची उपेक्षा सहन केली, पण या

Abhilasha Barak : मेजर अभिलाषा बराक यांना 'मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार

भारतीय लष्करातील धडाडीच्या महिला अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांनी आपल्या कर्तृत्वाने जागतिक पातळीवर देशाचे नाव