दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्तानला धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक

इस्लामाबाद : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने देशभरात खळबळ माजली आहे. केंद्रातील तपास यंत्रणा या घटनेचा तपास करत असून स्फोटामागील सूत्रधार कोण हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र या घटनेनंतर पाकिस्तानमध्येही हालचाल सुरू झाली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी सोमवारी रात्री तातडीची बैठक बोलावून सैन्याला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्लीतील घटनेनंतर पुन्हा एकदा भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ सारखी कारवाई होण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे.


दिल्लीतील स्फोटानंतर पाकिस्तानने देशातील सुरक्षाव्यवस्था कडक केली आहे. सर्व विमानतळांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सीमावर्ती भागातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानी उच्च अधिकारी या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.


पाकिस्तानच्या वायुदलाने एअर डिफेन्स प्रणाली सक्रिय केली असून, महत्वाच्या ठिकाणांहून तातडीने विमान उड्डाणासाठी तयारी ठेवली आहे. ११ आणि १२ नोव्हेंबरसाठी एअर मॅन नोटीस (NOTAM) जारी करण्यात आली आहे, ज्यामुळे सीमावर्ती भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताकडून संभाव्य लष्करी कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाकिस्तान सैन्याला सदैव तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


भारताच्या स्फोटाशी संबंधित तपासाचा अँगल पाकिस्तानकडे वळण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे. कारण भारतात घडणाऱ्या बहुतांश दहशतवादी हल्ल्यांचे धागेदोरे पाकिस्तानशी जोडले जातात. दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला असण्याच्या शक्यतेवर तपास सुरू आहे. याआधी पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता, त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई केली होती. त्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचा समावेश होता. त्या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. भारताने त्या वेळीच पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला होता की, भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल.

Comments
Add Comment

Colombia Earthquake : कोलंबियाला भूकंपाचा भीषण धक्का! ७.४ रिश्टरचा शक्तिशाली भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

बोगोटा : कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या

Russian cosmonaut : रशियन अंतराळवीरांकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या विशेष शुभेच्छा

नवी दिल्ली : भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील रशियन

Japan warn US : अमेरिकन प्रचारात ॲनिमे व गेम्सचा वापर, जपानने अमेरिकेला सुनावले

टोकियो : जागतिक मुत्सद्देगिरीत एक अत्यंत अनोखा वाद समोर आला आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या जपानी संस्कृतीची ओळख

Iran-US tensions : जमिनीवरील हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याचा इराणचा इशारा, ट्रम्प यांच्या माघारीच्या प्रयत्नांना खीळ  

इराण आणि अमेरिका यांच्यातील भू-राजकीय तणाव दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. अमेरिकेचे लष्कर इराणी भूमीवर

Mumbai Terror Attack : २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल अजीजचा संशयास्पद मृत्यू; मशिदीच्या गेटवर अचानक कोसळला, विषप्रयोगाची शक्यता?

- इस्लामाबादमध्ये अनोळखी ठिकाणी जेवण केल्यानंतर काही वेळातच मृत्यू इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी

Russia-India Trade : भारतासाठी रशियाची मोठी योजना; हिंद महासागरापर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याचा विचार

मुंबई : भारत आणि रशियामधील व्यापार संबंध आणखी मजबूत करण्यासाठी रशिया नव्या पर्यायी मार्गाचा विचार करत आहे.