नवी मुंबई : मुंबईजवळच्या नवी मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाची मुंबईत पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळत आहे. कौटुंबिक छळाला कंटाळून नवी मुंबईतील एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या महिलेच्या आत्महत्येमागे तिच्या सासरच्या मंडळींचा अमानुष छळ कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे, या महिलेला तिचे सासरकडील कुटुंबीय तिच्या माहेरच्या लोकांकडून आर्थिक मागणी करण्याची जबरदस्ती करत होते. जेव्हा ही मागणी महिलेकडून पूर्ण होऊ शकली नाही, तेव्हा तिच्या सासरकडील मंडळींनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. या सततच्या छळाला आणि दबावाला कंटाळून अखेर त्या महिलेने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेत महिलेला छळणाऱ्या सासू, सासरे, नवरा आणि नणंदेचा समावेश असल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे. कौटुंबिक छळामुळे एका महिलेने आपले जीवन संपवल्याने नवी मुंबई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नवी दिल्ली : भारताची राजधानी दिल्ली सोमवारी संध्याकाळी स्फोटाने हादरल्यानंतर आता या भीषण घटनेमागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी ...
गरोदर असताना गरम तेलाने भाजले, पोटात मारली लाथ अन्...
मेहक शेख असे पीडित महिलेचे नाव असून, अवघ्या काही वर्षांपूर्वी २० सप्टेंबर २०१९ रोजी तिचा इम्रान शेख याच्यासोबत विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसांनंतरच मेहकचा सासरकडील मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला. तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, छळाचे स्वरूप अत्यंत क्रूर आणि अमानुष होते. मेहक पाच महिन्यांची गरोदर असतानाही, तिच्या सासरच्या लोकांनी तिला गरम तेलाने भाजले आणि पोटात लाथा मारून अमानुष अत्याचार केला. सप्टेंबर २०२३ मध्ये तिचा पती इम्रान याने तिला भिंतीवर ढकलले, ज्यामुळे तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. वारंवार छळ सहन करूनही मेहक कुटुंबियांच्या दबावामुळे पतीशी एकनिष्ठ राहिली. मात्र, तिच्या मृत्यूच्या काही महिने आधी पती इम्रान आणि त्याच्या बहिणींनी आर्थिक मागणीवरून तिला त्रास देणे सुरू केले. "माहेरकडून पैसे घेऊन ये, नाहीतर तुझ्या मुलीला विकू!" अशा गंभीर आणि क्रूर धमक्या देऊन तिच्यावर माहेरच्यांकडून पैसे आणण्यासाठी दबाव आणला गेला. या असह्य जाचाला कंटाळून अखेर ७ नोव्हेंबर रोजी मेहकने गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी मेहकने एक व्हिडिओ बनवून आपल्या कुटुंबियांना पाठवला होता. या व्हिडिओमध्ये तिने सासरच्या अमानुष जाचाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. मेहकच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीनुसार मेहकच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला असून, या घटनेनंतर तळोजा परिसरात खळबळ उडाली आहे.