Gold Silver Rate: मंगळवारी सोन्याचांदीच्या किंमतीत 'कहर' दोन्ही कमोडिटीत तुफान वाढ जाणून घ्या आजचे दर 'विश्लेषणासहित'

मोहित सोमण: जागतिक पातळीवरील अस्थिरता कायम राहण्याचे सत्र सुरू असतानाच आज सोन्याचांदीने आज तर 'कहर' केला आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या भाकीतावर आधारित स्पॉट बेटिंगमध्ये वाढ झाल्याने सोन्याची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे .आज 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दर थेट २०२ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दर १८५ रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १५१ रूपयांनी वाढला आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२५८४ रूपये, २२ कॅरेटसाठी ११५३५ रूपये, १८ कॅरेटसाठी ९४३८ रूपयावर पोहोचला आहे.


२४ कॅरेटचा प्रति तोळा दर २०२० रूपयांनी, २२ कॅरेटसाठी १८५० रूपये, १८ कॅरेटसाठी १५१० रूपयांनी वाढला आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२५८४० रूपये, २२ कॅरेटसाठी ११५३५० रूपये, १८ कॅरेटसाठी ९४३८० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) निर्देशांक ०.७६% उसळला असून दरपातळी १२४९१४ रूपयावर पोहोचली आहे. तसेच संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति सरासरी ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२५८४ रूपये,२२ कॅरेटसाठी ११७००, १८ कॅरेटसाठी ९७५० रूपये आहे.


जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.६५% वाढ झाली असून जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात ०.६६% वाढ संध्याकाळपर्यंत झाली आहे त्यामुळे प्रति डॉलर दरपातळी ४१४२.२२ औंसवर गेली आहे. युएस बाजारातील तज्ञांच्या मते सलग तिसऱ्यांदा डिसेंबर महिन्यात फेड दरात कपात होऊ शकते मात्र अद्याप त्यावर कुठलाही ठोस निर्णय अथवा नवे वक्तव्य अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्याकडून आलेले नाही. तसेच युएस शटडाऊन समाप्त होत असल्याचे संकेत मिळाल्यावरसुद्धा चीन व युएस यांच्यातील करारावर तोडगा न निघाल्याने एकमत झालेले नाही परिणामी गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता कायम आहे.


माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात, डिसेंबर डिलिव्हरीसाठी कॉमेक्स सोन्याचा वायदा १८.७५ डॉलर्स किंवा ०.४५% वाढून ४१४०.७५ डॉलर्स प्रति औंस झाला तर चांदीचा वायदा ०.०८ टक्क्यांनी वाढून ५०.३५ डॉलर्स प्रति औंस झाला आहे.


कमोडिटी बाजारातील तज्ञांच्या मते अमेरिकेत वाढत्या आर्थिक अनिश्चिततेमुळे फेडरल रिझर्व्हकडून लवकरच दर कपातीची अपेक्षा वाढल्याने सोन्याचा भाव ४१३० डॉलर्स प्रति औंसच्यावर गेला आणि तीन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. दरम्यान, वाढती बेरोजगारी आणि मंदावलेली महागाई रोखण्यासाठी यूएस फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर स्टीफन मिरन यांनी अलीकडेच ५० बेसिस पूर्णांकाने दर कपातीचे संकेत दिले आहेत. परंतु अद्याप यावर काहीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याच्या गुंतवणूकीत आणखी वाढ होत आहे.


आजच्या सोन्याच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सोन्याचा भाव ८५० रुपयांनी वाढून १,२४,८०० रुपयांवर पोहोचला, जो ०.७०% वाढला. डॉलर निर्देशांकातील कमकुवतपणा आणि अमेरिकन सरकारच्या संभाव्य पुनरुज्जीवनाबद्दलच्या आशावादामुळे हे शक्य झाले. या पुनरुज्जीवनामुळे महत्त्वाच्या आर्थिक डेटाचा प्रवाह पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे डिसेंबरच्या बैठकीत कमी दर राखण्यासाठी फेडरल रिझर्व्हचा दावा बळकट होऊ शकतो ज्यामुळे बुलियनमध्ये सकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. या आठवड्यात अमेरिका आणि भारत दोन्ही ठिकाणी सीपीआय डेटा जाहीर होणार असल्याने, अस्थिरता वाढण्याची अपेक्षा आहे. सोन्याचा व्यापार १२२५०० ते १२६००० रुपयांच्या विस्तृत श्रेणीत होण्याची शक्यता आहे.'


चांदीच्या दरातही तुफानी !


चांदीच्या दरातही आज तुफान वाढ झाल्याने दरपातळी नव्या उच्चांकावर पोहोचली आहे. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ३ रूपये, व प्रति किलो दरात ३००० रूपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे प्रति ग्रॅम दर १६० रूपये व प्रति किलो दर १६०००० रूपयांवर गेले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम दर १६०० रूपये व प्रति किलो दर १७०००० रूपयांवर गेले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.९५% इतकी मोठी वाढ झाली असून दरपातळी १५५१५६ रूपयांवर गेली आहे.


जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.०९% वाढ झाली आहे. अमेरिकेच्या व्याजदर कपातीच्या वाढत्या अपेक्षा आणि अमेरिकन आर्थिक परिस्थितीबद्दल सततची अनिश्चितता यामुळे चांदी गेल्या २ दिवसात ४.०४% ने वाढून १५३६९१ पातळीवर पोहोचली. खाजगी आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये अमेरिकेत १५३००० नोकऱ्या गेल्याने २२ वर्षातील रोजगारात सर्वाधिक घसरण झाली त्यामुळे डिसेंबरमध्ये २५ बीपीएस दर कपातीसाठी बाजारातील दावे वाढले असले तरी ज्याची शक्यता पूर्वीच्या ६२% वरून ७०% पर्यंत वाढली आहे असे तज्ञांनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त,अमेरिकेतील दीर्घकाळ चालणाऱ्या सरकारी बंदमुळे (Us Shutdown) प्रमुख आर्थिक डेटा विलंबित झाला आणि जागतिक शेअर बाजारांमध्ये विशेषतः अमेरिकन टेक स्टॉक्समध्ये जोखीम कमी झाली असून चांदीच्या गुंतवणूकीत वाढ झाली आहे. दरम्यान, लंडनच्या चांदीच्या बाजारपेठेतील तरलतेचे बंधन (Liquidity Limit) कमी झाल्यामुळे भावनांना पाठिंबा मिळाला कारण अमेरिका आणि चीनमधून मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने कमोडिटीतील साठा वाढला होता.

Comments
Add Comment

'नितीश' पर्व कायम? बिहारमध्ये NDA चा 'क्लीन स्वीप', एक्झिट पोल्सचा स्पष्ट अंदाज!

तेजस्वी यादवांच्या 'महागठबंधन'ला मोठा झटका; प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचा प्रभाव नगण्य पाटणा : संपूर्ण

प्रभाग आरक्षणात दिग्गजांचे प्रभाग गेले; मुंबईत रवीराजा, विशाखा राऊत, नील सोमय्या, सदा परब, आसिफ झकेरियांना यांना फटका

अनेकांचे प्रभाग कायम राखले मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २२७

मिरा-भाईंदर महापालिकेचे इलेक्शन गणित ठरले! ९५ पैकी ४८ जागांवर महिलांना संधी

ओबीसीच्या २५ जागा; 'या' प्रभागांत दोन महिला नगरसेविका निवडल्या जाणार भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी

नवी मुंबईच्या निवडणुकीसाठी 'सीट फिक्स'! १११ पैकी ५६ जागांवर महिलांचे वर्चस्व

SC साठी ५, ST साठी १ जागा महिलांसाठी राखीव; इच्छुकांचे धाबे दणाणले! नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या (NMMC) आगामी

ठाण्यात 'आरक्षण लॉटरी' फुटली! कोणाचा पत्ता कट, कोणाला संधी?

३३ प्रभागांत १३१ नगरसेवक निवडले जाणार! ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांना ज्या क्षणाची उत्सुकता

Gautami Patil : नृत्य नाही, आता शौर्य! गौतमी पाटीलचं 'नऊवारी' गाणं रेकॉर्ड ब्रेक, चाहत्यांकडून तुफान लाईक्स

मुंबई : आपल्या दमदार नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील