क्रिकेटच्या वादातून गोळीबारात तरुणाचा मृत्यू

जळगाव : शहरातील कांचन नगरातील विलास चौकात क्रिकेटच्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर असं मृत तरुणाचं नाव असून तर या घटनेत अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. गोळीबार करणारा आकाश सपकाळे हा पसार झाला आहे.


जळगाव शहरात रविवारी दुपारी क्रिकेटच्या वादातून तांबापुरा परिसरात झालेल्या दगडफेकीची घटनेचा तणाव निवळत नाही तोच रात्री कांचन नगरातील विलास चौकात जुन्या वादातून गोळीबार झाला. यामुळे किरकोळ वादातून जिल्ह्यात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे.


कांचननगर भागात दोन युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. हद्दपार आकाश सपकाळे उर्फ डोया आणि सागर सपकाळे यांच्यामध्ये जुना वाद आहे.


रविवारी परिसरात संध्याकाळपासून धुसफूस सुरू होती. रात्री हा वाद वाढत जाऊन आकाश याने सागरच्या घरासमोर येऊन गोळीबार केला. यात सागर सपकाळे यांचे भाचे गणेश सोनवणे यांच्या हाताला तर तुषार रामचंद्र सोनवणे यांच्या कानाला व आकाश बाविस्कर यांच्या छातीत गोळी लागली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी आकाश बाविस्कर याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात गारठा वाढला, काही भागांत पावसाची शक्यता!

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'दितवाह' चक्रीवादळाचा परिणाम देशभर जाणवू लागला असून, अनेक राज्यांमध्ये

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक; २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी

मुंबई : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत असून, मतदानासाठी

मुलगा व्हावा म्हणून छळ; पैशांच्या मागणीला कंटाळून २५ वर्षीय गर्भवतीची आत्महत्या

नांदेड : मुलाच्या हव्यासापोटी आणि पैशांच्या सततच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या २५ वर्षीय गर्भवती विवाहितेने

राज्यात तीन दिवसांसाठी ड्राय-डे

नवी दिल्ली : राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आजपासून तीन दिवसांसाठी ड्राय डे असणार आहे.

मतदानाच्या तोंडावर २० जिल्ह्यांत तारखांमध्ये बदल

नगर परिषदांसाठी २ ऐवजी २० डिसेंबरला मतदान राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय बारामती, मंगळवेढ्यासह अनेक नगर

पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांची धावपळ, कॉल करणारा जेरबंद

पुणे : कोरेगाव पार्कमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर शुक्रवारी