मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर अर्थात व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. मागील दहा दिवसांपासून धर्मेंद्र मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पण त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा नाही. ही माहिती मिळाल्यामुळे चाहते धर्मेंद्र यांची तब्येत सुधारावी यासाठी प्रार्थना करू लागले आहेत.
धर्मेंद्र ८९ वर्षांचे आहेत. मागील काही महिन्यांपासून ते अधूनमधून वेगवेगळ्या कारणाने आजारी पडत होते. अमेरिकेत जाऊन उपचार घेतले तरी त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नाही. आता मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण प्रकृतीत अपेक्षित सुधारणा नाही. प्रकृती खालवली आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. यामुळे धर्मेंद्र यांचे चाहते आणि नातलग चिंतेत आहेत.