Rajpal Yadav's Brother Statement: अभिनेता राजपाल यादवच्या भावाने केले मोठे खुलासे; काय म्हणाले श्रीपाल यादव?

मुंबई: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव नऊ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक वाद प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. ५ फेब्रुवारी रोजी त्याने न्यायालयाच्या आदेशानुसार आत्मसमर्पण केले. त्यानंतर समाज माध्यम आणि माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू झाली की, राजपाल यादवनं म्हटले होते, "ना माझ्याकडे पैसे आहेत आणि ना माझे मित्र आहेत." यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत चेहरे त्याच्या मदतीसाठी पुढे आले आणि फिल्म असोसिएशन FWICEनेही फिल्म इंडस्ट्रीला राजपाल यादवला मदत करण्याचे आवाहन केले. राजपाल यादवचे मोठे भाऊ श्रीपाल यादव यांनी एका वृत्तनाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.



राजपाल यादवच्या भावाने केले मोठे खुलासे


राजपाल यादव जेलमध्ये जाताना रडत होता आणि म्हणत होता की त्याचे कोणी मित्र नाहीत आणि त्याच्याकडे पैसे नाहीत. या गोष्टीवर बोलताना श्रीपाल यादव म्हटले की, "आमच्या अनुभवावरून आम्ही सांगू शकतो की या गोष्टी खऱ्या वाटत नाहीत. तो माझा धाकटा भाऊ आहे. आम्ही एकत्र शिकलो, एकाच खोलीत राहिलो, एकाच बिछान्यावर झोपलो आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की कितीही मोठी अडचण आली तरी तो कोणासमोर गयावया करणार नाही किंवा रडणार नाही आणि अशा प्रकारच्या गोष्टी तर नक्कीच बोलणार नाही. जाण्यापूर्वी त्याने मला फोन करून सांगितले होते. दादा, 'कोणतीही चिंता करू नको' त्यानं आम्हाला खात्री दिली की पैसे कर्ज म्हणून घेतले नव्हते, तर गुंतवणूक म्हणून दिले गेले होते. त्याने काही कागदपत्रांवर सही केली होती, ज्याबाबत आम्हाला सांगण्यात आले होते की ती कागदपत्रे गुंतवणुकीशी संबंधित आहेत. नंतर जेव्हा चित्रपट पुढे जाऊ शकला नाही, तेव्हा त्या कागदपत्रांच्या आधारे त्याला कर्ज म्हणून दाखवण्यात आले आणि परतफेडीची मागणी सुरू झाली. आम्ही चित्रपटाच्या क्रेडिट्समध्ये संबंधित व्यक्तीचे नाव निर्माता म्हणूनही पाहिलंय. सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये जे बोलले जात आहे की तो रडत होता किंवा म्हणत होते की त्याचे कोणी नाही- आम्ही मानू शकत नाही की, त्यानं असे काही म्हटले असेल."



जेलमध्ये जाताना राजपाल भावाला काय सांगितलं?


जेलमध्ये जाताना राजपालनं सांगितलं की, "न्यायालयीन प्रक्रियेनुसार त्याला एक दिवसासाठी जावे लागेल आणि पुढे कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील. त्याने आम्हाला पूर्ण विश्वास दिला की, दादा, कोणतीही गोष्ट चिंता करण्यासारखी नाही. आम्ही सिद्ध करू की पैसे गुंतवणुकीसाठी होते, कर्ज घेतलेले नव्हते. आम्हाला चित्रपटसृष्टीबद्दल फार माहिती नाही, पण आम्हाला सांगण्यात आले की चित्रपटांमध्ये अनेक जण गुंतवणूक करतात आणि ही एक सामान्य प्रक्रिया आहे."



'आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय की...'


माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे की, तो उद्या बाहेर येईल. आमच्या मुलीचे लग्न आहे आणि त्याची पूर्ण तयारी सुरू आहे. कोणीतरी पत्रकार आला आणि म्हणाला की घरात नैराश्य पसरलंय. अरे जिथे ५०-५० कामगार काम करत आहेत आणि आम्ही सर्व त्यात गुंतलोय. दुपारची वेळ होती, काम करणारे लोक जेवत असतील आणि घरी कोणी दिसलं नसेल तर त्याने फोटो काढून टाकला असेल की इथे नैराश्य पसरलंय वगैरे. कोणत्याही प्रकारे नैराश्य पसरलेले नाही. आम्ही पूर्ण धैर्याने काम करत आहोत आणि आम्हाला ठाऊक आहे की, तो उद्या बाहेर येईल आणि आम्ही लग्नसोहळा जल्लोषात साजरा करू. लग्न होणारच, कोणतीही अडचण नाही. त्यामुळे लग्नात त्याची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय की तो लवकर बाहेर येवो.


१९ फेब्रुवारीला राजपाल यादवच्या पुतणीचे लग्न आहे आणि कुटुंबाला पूर्ण आशा आहे की तो लग्नसमारंभात नक्की सहभागी होतील. तसेच चित्रपटसृष्टीनेही राजपाल यादवला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Comments
Add Comment

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या

Rakshabandhan : रक्षाबंधनाचं आयकॉनिक गाणं ‘फुलों का तारों का’ खरं तर राखीसाठी बनलंच नव्हतं! जाणून घ्या खास किस्सा

मुंबई : रक्षाबंधन म्हटलं की भावाबहीणीच्या नात्याची आठवण करून देणारं एक गाणं हमखास कानावर पडतं. ‘फुलों का तारों

Bandhu Marathi Film : ‘बंधू’ चित्रपटातून अभिनेता रजत बेदीची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; म्हणाला, "कथानकाने माझं लक्ष्य वेधलं"

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रजत बेदी (Rajat Bedi) आता 'बंधू' या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीचा विस्तार आणखी

Toxic Movie : रिव्ह्यू देणं पडलं महाग! 'टॉक्सिक'वर नकारात्मक बोलणाऱ्या युट्यूबरची अडचण वाढली; निर्मात्यांच्या एका निर्णयाने सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई :  कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित

Amaal Mallik : अमाल मलिकचा चित्रपट संगीताला तात्पुरता विराम; म्हणाला, ‘आता माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार’

मुंबई : संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सध्यापुरता चित्रपटांसाठी नवीन संगीत देण्यापासून दूर राहण्याचा निर्णय