TMKOC फेम भव्य गांधीने बबितासोबतच्या साखरपुड्याच्या अफवेवर सोडलं मौन

मुंबई : ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता भव्य गांधी, म्हणजेच सगळ्यांचा लाडका टप्पू, चर्चेत आला आहे. त्याचं मुनमुन दत्ता म्हणजेच बबिताजी सोबत नाव जोडण्यात आलं आहे. दोघांच्या साखरपुड्याच्या अफवांनी सोशल मीडियावर खळबळ उडवली होती. मात्र अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत भव्यने या चर्चांवर अखेर मौन सोडलं आहे.


भव्यने सांगितलं की, “वडोदरा येथे मी आणि मुनमुन साखरपुडा करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. ही पूर्णपणे अफवा होती. या बातमीमुळे माझ्या घरच्यांनाही अनेक फोन येऊ लागले. आई तर खूपच संतापली होती. ती लोकांना समजावत होती की असं काहीच घडलेलं नाही, तुम्ही काहीही बोलत आहात.”


या मुलाखतीत भव्यने मालिकेतील आपल्या सहकलाकारांचं कौतुकही केलं. दिशा वकानीबद्दल बोलताना तो म्हणाला, “ती खूपच छान व्यक्ती होती आणि सगळ्यांना हसवायची.” जेव्हा त्याला विचारण्यात आलं की त्याला पुन्हा शोमध्ये परत यायचं आहे का, तेव्हा तो हसत म्हणाला, “हो, नक्कीच. जर मी परत आलो, तर तो माझ्यासाठी खूप खास क्षण असेल.” त्याने पुढे सांगितलं की, “असित मोदी सर हे पहिले होते ज्यांनी माझ्यातील कलाकार ओळखला आणि मला इतकी मोठी संधी दिली.”


भव्यने २०१७ मध्ये ही मालिका सोडून चित्रपटसृष्टीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांनीही कौतुक केलं. अजून तो बॉलिवूडमध्ये दिसला नसला तरी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मध्ये त्याच्या पुनरागमनाच्या चर्चांना जोर चढला आहे. निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी चाहत्यांना टप्पूला पुन्हा पाहण्याची इच्छा आहे.

Comments
Add Comment

आजीच्या साडीतून बनवलेला कॉश्च्यूम घालून रोहित राऊतने गायले 'रोअर ऑफ सह्याद्री'

मुंबई : सध्या सोशल मीडियावर i-popstar या शोची जोरदार चर्चा सुरू आहे. अ‍ॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर स्ट्रीम होणारा हा शो १८

नेटकरी मलायकावर भडकले! आधीच झाली ट्रोल, त्यात प्रतिक्रिया पण 'बोल्ड'; बघा Video

मुंबई: यो यो हनी सिंगचे 'चिलगम' हे नवीन गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात हनी सिंगसोबत मलायका

जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा- 'ताठ कणा'

मुंबई: 'माणसाला धैर्य त्याच्याच ताठ कण्यामुळे मिळते', हे वि.वा. शिरवाडकरांचे वाक्य डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत

मराठी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी, प्रभावी आणि दर्जेदार अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारा सचित पाटील

‘१२० बहादूर’चा जबरदस्त ट्रेलर

सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या ‘१२० बहादूर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरच्या

शो मस्ट गो ऑन...

टर्निंग पॉइंट - युवराज अवसरमल दाक्षिणात्य मातृभाषा असून देखील मराठी मनोरंजन क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे