Stock Market: तीन दिवसांच्या घसरणीनंतर परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरू, सेन्सेक्स निफ्टी वधारला खरा पण ही अस्थिरता महिनाभर राहणार?

मोहित सोमण:आशियाई शेअर बाजारातील सुरूवातीच्या तेजीमुळे आणि प्रामुख्याने घसरत चाललेली परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सकाळच्या सत्रात रोखली गेल्याने आज शेअर बाजारात वाढ झाली आहे. प्रामुख्याने घरगुती गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूकीत वाढ केली असताना एकूणच गुंतवणूक राखली गेल्याने ३ दिवसांच्या घसरणीनंतर बाजार पुन्हा सकाळच्या सत्रात तेजीत आला आहे. आशियाई बाजारातील सकारात्मक ट्रेंड आणि ब्लू-चिप शेअर्समधील खरेदीमुळे गेल्या तीन सत्रांमध्ये घसरण झाल्यानंतर सोमवारी इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने सुरुवातीच्या व्यापारात पुन्हा तेजीत सुरुवात केली.


असे असताना मात्र अस्थिरता (Volatility) कायम आहे. नवीन वक्तव्य व कमोडिटी बाजारातील हालचाली, युएस बाजारातील शटडाऊनचा परिणाम, नवा नसलेला ट्रिगर या बाजारातील चिंता अद्याप कायम आहेत. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात बाजारात वाढ होईल का याची शाश्वती अद्याप नाही. आगामी काळात युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात तिसऱ्यांदा कपात होईल अशी अटकळ होत असताना भारतीय बाजारातील अस्थिरता नियंत्रित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँके डिसेंबर महिन्यात रेपो दरात कपात करू शकते अशी चर्चा सुरू आहे. याचाच फायदा शेअर बाजारात बँक निर्देशांकात होत असून आगामी दिवसात या बँक, फायनांशियल सर्विसेस या शेअर्समध्ये होणारी हालचाल शेअर बाजारात निर्णायक ठरू शकते. मात्र इतर निर्देशांकातील गुंतवणूकदारांचे चलनवलन निर्देशांकात परावर्तित होऊ शकते.


एक्सचेंजच्या प्रोविजनल आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) शुक्रवारी ४५८१.३४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले असून देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ६६७४.७७ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी करून परदेशी गुंतवणूकदारांपेक्षा अधिक जास्त गुंतवणूक केली होती.जागतिक पातळीवरील घडामोडीचा परिणाम शेअर बाजारासह कमोडिटीतही स्पष्टपणे गेल्या आठवड्यात दिसून येत आहे. आज सकाळी जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.६४ टक्क्यांनी वाढून $६४.०४ प्रति बॅरल झाले होते.आज मात्र व्यापारी व तज्ञांच्या मते नवीन परदेशी निधीच्या आवकामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांना पाठिंबा मिळाला त्यामुळे घसरणीकडे वळलेल्या बाजाराला आज नवसंजीवनी मिळाली आहे. असे असताना शेअर बाजारातील युएस भारत करारावर पुढील महिन्यातील शेअर बाजाराची दिशा अवलंबून असू शकेल याचबरोबर चीन व युएस यांच्यातील करारावरही जागतिक बाजाराचे लक्ष्य केंद्रित असेल.


सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्स २६७.७४ अंकांनी किंवा ०.३२ टक्क्यांनी वाढून ८३४८४.०२ वर पोहोचला तर निफ्टी ८४.९० अंकांनी किंवा ०.३३ टक्क्यांनी वाढून २५५७७.२० वर पोहोचला होता.सकाळच्या सत्रात एशियन पेंट्स, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, लार्सन अँड टुब्रो, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, आयटीसी आणि भारती एअरटेल हे शेअर वधारले असून ट्रेंट लिमिटेड, पॉवर ग्रिड, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, अदानी पोर्ट्स आणि अल्ट्राटेक सिमेंट या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.


आजच्या बाजारातील सकाळच्या परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'या वर्षी जागतिक व्यापारात प्रमुख ट्रेंड एआय ट्रेड आहे, ज्यामुळे एआय स्टॉक मूल्यांकने वाढली आहेत, जरी अद्याप बबल टेरिटरीमध्ये नाही. अमेरिकेतील मजबूत कमाई वाढ ही या एआय ट्रेडला मूलभूत आधार आहे. चीन, दक्षिण कोरिया आणि तैवान सारख्या एआय विजेत्या मानल्या जाणाऱ्या देशांनाही या एआय रॅलीचा फायदा झाला आहे. आता, गेल्या आठवड्यात नॅस्डॅकमध्ये झालेल्या ३% घसरणीमुळे या एआय ट्रेडमध्ये घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. हा एक निरोगी ट्रेंड आहे. जर हा ट्रेंड उच्च अस्थिरतेशिवाय कायम राहिला तर त्यामुळे अमेरिकन बाजार निरोगी होईल, बबल तयार होण्यास आणि त्याचा अंतिम स्फोट होण्यास प्रतिबंध होईल. गुंतवणूकदारांनी हा ट्रेंड कसा चालतो यावर लक्ष ठेवले पाहिजे.


हा उदयोन्मुख ट्रेंड, तो कायम आहे, भारतीय बाजारपेठेसाठी विशेषतः अनुकूल असेल ज्यांनी एआय ट्रेडमध्ये भाग घेतला नाही. एफआयआय, विशेषतः हेज फंड, जे भारतात सातत्याने विक्री करत आहेत आणि एआय ट्रेड खेळण्यासाठी पैसे काढत आहेत, ते आता भारतासारख्या देशांमध्ये एआय-नॉन-एआय ट्रेडच्या बाजूने एआय ट्रेडला हळूहळू उलट करण्याची शक्यता आहे. सुदैवाने, भारतात सध्या होत असलेली आणि पुढे जाऊन ती गती मिळवण्याची अपेक्षा असलेली उत्पन्न वाढ ही तेजीसाठी मूलभूत आधार देऊ शकते. बँकिंग आणि वित्त, दूरसंचार, भांडवली वस्तू, संरक्षण आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीच्या नावांवर लक्ष ठेवा.'


Comments
Add Comment

Lenskart Share Listing: लेन्सकार्ट शेअरचे निराशाजनक लिस्टिंग ! 'होत्याचे नव्हते' झाले हाती आले धोपटणे?

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात लेन्सकार्ट लिमिटेड (Lenskart IPO Limited) हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी निराशेची ठरली आहे. कंपनीचा

Ola Electric Share Crash:ओला इलेक्ट्रिकवर गंभीर आरोपानंतर शेअर ३% पेक्षा अधिक पातळीवर कोसळला ओला इलेक्ट्रिककडूनही 'हे' आक्रमक प्रतिउत्तर

मोहित सोमण: ओला इलेक्ट्रिक लिमिटेड (Ola Electric Limited) शेअर आज मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. प्रामुख्याने एका कोरियन

Top Stocks Recommendations Today: चांगल्या रिटर्न्ससाठी मोतीलाल ओसवालकडून 'हे' २० शेअर खरेदी करण्याचा सल्ला वाचा लिस्ट 'थोडक्यात'

प्रतिनिधी: मोतीलाल ओसवालकडून शेअर खरेदीसाठी संबंधित शेअर्सला बाय कॉल देण्यात आलेला यादी पुढीलप्रमाणे - १)

Stock Market Opening Bell: शेअर बाजारात तेजीने सुरूवात मात्र 'या' कारणांमुळे अस्थिरता कायम सेन्सेक्स २५०.९९ व निफ्टी ७८.९० अंकांने वधारला

मोहित सोमण:आज जागतिक बाजारपेठेतील दबाव शेअर बाजारात असल्याचे गिफ्ट निफ्टीतील सुरूवातीच्या कलात स्पष्ट झाले

Gujarat News : गुजरात एटीएसची मोठी कारवाई! घातक विष 'रायसिन' तयार करणाऱ्या डॉक्टरसह तिघांना अटक

अहमदाबाद : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट उधळून लावत, चिनी एमबीबीएस

Sangli Bailgada Race : धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली! 'हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक फेल' जोडीने सांगलीत मारले मैदान; पुढच्यावर्षी विजेत्याला थेट BMW कार मिळणार

सांगली : सांगलीमध्ये चंद्रहार पाटील (Chandrahaar Patil) यांनी आयोजित केलेल्या 'श्रीनाथ केसरी' बैलगाडी शर्यतीचा अंतिम निकाल