आजीच्या साडीतून बनवलेला कॉश्च्यूम घालून रोहित राऊतने गायले 'रोअर ऑफ सह्याद्री'

मुंबई : सध्या सोशल मीडियावर i-popstar या शोची जोरदार चर्चा सुरू आहे. अ‍ॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर स्ट्रीम होणारा हा शो १८ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. किंग, आस्था गिल, आदित्य रिखारी आणि परमिश वर्मा हे गायक या शोमध्ये परीक्षकांच्या भूमिकेत आहेत. या मंचावर मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती, भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये गाणी सादर करणारे स्पर्धक आपला वेगळा ठसा उमटवत आहेत.


या स्पर्धेत मराठमोळा गायक रोहित राऊत पुन्हा एकदा आपल्या दमदार परफॉर्मन्सने चर्चेत आला आहे. अलीकडेच त्याने i-popstar च्या मंचावर सादर केलेलं ‘रोअर ऑफ सह्याद्री’ हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेलं हे गाणं प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारलं आणि त्यावर कौतुकाचा वर्षाव केला.


 



 

या परफॉर्मन्सनंतर रोहितने सोशल मीडियावर काही खास पोस्ट शेअर केल्या. त्याने सांगितले की, या गाण्याच्या सादरीकरणासाठी त्याने एक खास इंडो-वेस्टर्न पोशाख परिधान केला होता. या पोशाखाचे वैशिष्ट्य म्हणजे तो त्याच्या आजीच्या साडीपासून, म्हणजेच पातळापासून बनवलेला होता.


आपल्या पोस्टमध्ये रोहितने लिहिलं, “माझ्या आजीच्या पातळापासून तयार केलेला हा कॉस्ट्यूम माझ्यासाठी खूप आठवणींचा आणि जिव्हाळ्याचा आहे. त्या उबेसह मी आपल्या महाराजांवरील हे गाणं सादर केलं आणि तुम्हा सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी मी मनापासून आभारी आहे. हा कॉस्ट्यूम माझ्या टॅलेंटेड बहिणीने, किरणने तयार आणि डिझाइन केला आहे. तुमचं सर्वांचं असंच प्रेम माझ्यावर राहू दे, आणखी सुंदर गाणी लवकरच घेऊन येईन.”

Comments
Add Comment

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर

‘रुबाब’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.