पुणे : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा गाजलेला चित्रपट 'दृश्यम' (Drishyam) पाहून पुण्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी समीर याने 'दृश्यम' चित्रपट तब्बल चार वेळा पाहिला आणि त्यातील कथेप्रमाणेच आपल्या पत्नीला संपवण्याचा कट रचला. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी समीरने गुन्हा लपवण्यासाठी चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच पाऊले उचलली. त्याने भाड्याने घेतलेल्या एका गोडाऊनमध्ये पत्नी अंजलीचा मृतदेह भट्टीत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मृतदेह पूर्णपणे जाळल्यानंतर त्याने ती राख गोडाऊनच्या जवळून वाहणाऱ्या नदीत फेकून दिली. आरोपीने सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असला तरी, पुणे पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावत आरोपी समीरच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या कसून तपासामुळे हा क्रूर गुन्हा अखेर उघडकीस आला. आता या हाय-प्रोफाइल खून प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येत असून, आरोपीने खून नेमका कशासाठी केला, याचा तपास पोलीस करत आहेत.
'दृश्यम' स्टाईल हत्येनंतर नवा ड्रामा
पुण्यातील 'दृश्यम' स्टाईल खून प्रकरणातील आरोपी समीरने केवळ आपल्या पत्नीची हत्या करून मृतदेह नष्ट केला नाही, तर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःला वाचवण्यासाठी एक धक्कादायक 'डिजिटल कट' रचल्याचे समोर आले आहे. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपी समीरचे स्वतःचे एका मुलीसोबत विवाहबाह्य संबंध होते. मात्र, हे सत्य लपवण्यासाठी आणि खुनाचे कारण वेगळे दाखवण्यासाठी त्याने एक अत्यंत कुटिल डाव टाकला. समीरने मृत पत्नी अंजलीचेच एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर असल्याचं भासवण्याचा प्रयत्न सुरू केला. आरोपी समीरने हत्या केल्यानंतर अंजलीविरुद्ध कोणताही थेट पुरावा ठेवला नव्हता. उलट, त्याने पोलिसांना वेगळ्याच दिशेने गुंतवून ठेवण्यासाठी अंजलीविरुद्ध एक डिजिटल पुरावा रचण्यास सुरुवात केली. खून करून पुरावे नष्ट करणे आणि त्यानंतर खोटे डिजिटल पुरावे रचून खुनाचे कारण वेगळे दाखवण्याचा हा प्रकार अतिशय नियोजनबद्ध होता. मात्र, पोलिसांनी समीरचा हा कट वेळीच उधळून लावला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
अहमदाबाद : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट उधळून लावत, चिनी एमबीबीएस पदवी असलेल्या एका डॉक्टरसह तीन जणांना ...
'आय लव्ह यू' मेसेजचा डिजिटल कट
समीरला आपल्या पत्नी अंजलीच्या चारित्र्यावर संशय आहे, असे पोलिसांना भासवून त्यांची दिशाभूल करायची होती. यासाठी त्याने एक अत्यंत धक्कादायक गोष्ट केली. त्याने स्वतः पत्नीच्या मोबाईलवरून मित्राला 'आय लव्ह यू'चा मेसेज पाठवला. त्यानंतर मित्राच्या मोबाईलमधून त्या 'आय लव्ह यू' मेसेजला रिप्लायही केला.
अशा प्रकारे, पत्नी अंजलीचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि म्हणूनच तिच्या चारित्र्यावर संशय होता, असा खोटा डिजिटल पुरावा समीरने मोठ्या चलाखीने तयार केला. समीरने पुरावे नष्ट केले असले आणि हा डिजिटल कट रचला असला तरी, पोलिसांचा अनुभव दांडगा असतो. तपासादरम्यान आरोपी समीरचे बोलणे आणि एकूण वागणे पोलिसांना खटकले. त्यामुळे पोलिसांचा संशयाची सुई पुन्हा समीरकडेच वळली. समीरने रचलेला हा कट आणि त्याचा खुनामागील हेतू उघडकीस आणण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.
'दृश्यम' चित्रपट ४ वेळा पाहिला अन्...
पुण्यातील 'दृश्यम' स्टाईल खून प्रकरणाचा गुंता अखेर सुटला आहे. पत्नी अंजलीची निर्घृण हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीने, 'दृश्यम' चित्रपट चार वेळा पाहिल्याची कबुली देत आपला गुन्हा मान्य केला आहे. गुन्हा लपवण्यासाठी समीरने पत्नीच्या चारित्र्यावर संशय येईल अशा प्रकारे डिजिटल पुरावे रचले होते. मात्र, पोलिसांच्या तपासादरम्यान समीरच्या जबाबांमध्ये आणि तांत्रिक पुराव्यांमध्ये मोठी तफावत आढळली. या तफावतीमुळेच पोलिसांनी त्याला अधिक चौकशीसाठी बोलावले. कसून चौकशी केल्यावर आरोपी समीरने अखेर पोलिसांसमोर हार मानली. त्याने कबूल केले की, त्यानेच 'दृश्यम' हा चित्रपट चार वेळा पाहिला आणि त्यातील कथेनुसार अंजलीच्या हत्येची संपूर्ण योजना आखली होती. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात आरोपी समीरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.