पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव

पुणे : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा प्रकल्प असून यामुळे पुणे-बेंगलोर महामार्गावर असणारा वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.


पुणे ते बेंगलोर हा ग्रीनफिल्ड महामार्ग विकसीत करण्याचं एनएचएआयने ठरवलं आहे. यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आलाय. ६९९ किमीचा हा मार्ग असून महाराष्ट्रात त्याची लांबी २०६ किमी इतकी असणार आहे.


केंद्र सरकारने पुणे- बेंगलोर ग्रीनफिल्ड महामार्गाला मान्यता दिल्यानंतर हा सहापदरी मार्ग होऊ शकेल. मान्यता मिळाल्यानंतर हा पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.


पुणे-बेंगलोर महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गाच्या प्रकल्पाचा विचार सुरू आहे. यासाठी ४२ हजार कोटींचा अंदाजे खर्च अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली