असीम मुनीर यांना विशेष अधिकार देण्यावरून पाकिस्तानात विरोधकांचे देशव्यापी आंदोलन

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये २७ व्या संविधान सुधारणा विधेयकामुळे तणाव निर्माण झाला आहे. संविधान सुधारण्यानंतर लष्कर प्रमुख असिम मुनीर यांच्याकडे फक्त थलसेनाच नाही तर हवाईसेना आणि नौदलावरही नियंत्रण मिळणार आहे. या कारणास्तव विरोधक पक्षांनी या सुधारणा विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केला आहे.


पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ आणि इतर विरोधक पक्षांचे गठबंधन तहरीक-ए-तहफ्फुज-ए-इन-ए-पाकिस्तान यांनी या संविधान सुधारणा विरोधात देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मजलिस वहदत-ए-मुस्लिमीनचे प्रमुख अल्लामा राजा नासिर अब्बास यांनी सांगितले, “या संविधान सुधारणेद्वारे देशाच्या लोकशाही संस्थांना ठप्प केले जाईल आणि संपूर्ण देशाने याच्या विरोधात उभे राहणे आवश्यक आहे.” अन्य विरोधक नेत्यानेही म्हटले की ही सुधारणा संविधानाचा पाया ढासळवेल.


दरम्यान, या संविधान सुधारणेद्वारे पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांची सत्ता वाढणार आहे. या सुधारणा अंतर्गत संविधानाच्या अनुच्छेद २४३ मध्ये बदल प्रस्तावित आहेत. या बदलानुसार, जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष पद समाप्त करून त्याऐवजी चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेसचे पद निर्माण केले जाते.


संविधान सुधारणेसाठी अन्य प्रस्तावांनुसार एक संघीय संवैधानिक न्यायालयही स्थापन केले जाणार आहे आणि हायकोर्टच्या न्यायाधीशांची नियुक्ती प्रक्रियेतही बदल केला जाणार आहे. विरोधकांचा दावा आहे की संघीय संवैधानिक न्यायालयाची स्थापना सुप्रीम कोर्टच्या शक्ती कमी करण्याच्या उद्देशाने केली जात आहे.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे