महिलांच्या सक्षमीकरणातच हिंदू राष्ट्राचे सक्षमीकरण : मंत्री नितेश राणे

गणेशगुळे येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शिलालेखाचे अनावरण
राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसा


रत्नागिरी : महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला गेला असून राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान यांचे हे मोठे काम आहे, असे उद्गार मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी काढले. त्यांच्या हस्ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळस्थानी, म्हणजेच रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे शिलालेखाचे अनावरण रविवारी करण्यात आले.


राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान, रत्नागिरी यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला माजी सरपंच श्रावणी रांगणकर यांच्यासह कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आणि राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत सहकार्यवाहिका पद्मजा अभ्यंकर, रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरीच्या अध्यक्ष दीपा पाटकर, जिल्हा दक्षिण रत्नागिरी कार्यवाहिका मीरा भिडे आणि कोकण प्रांत सहकार्यवाहिका उमा दांडेकर यावेळी उपस्थित होत्या. समिति शाखेच्यावतीने ध्वजारोहण, घोष वादन, प्रार्थना, ध्वजावतरण, शिवस्तुती पठण, सेविकांची विविध प्रात्यक्षिके आदी कार्यक्रम झाले.


यावेळी बोलताना राणे म्हणाले अतिशय शिस्तबद्ध असलेला हा कार्यक्रम मनाला स्पर्श करणारा होता. या गावाला भेट देणाऱ्या लोकांसाठी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा हा शिलालेख त्यांच्या कार्याचा परिचय करून देईल. त्याशिवाय समितीचे अनेक उपक्रम चांगले आहेत. कोकणात स्त्रीशक्ती प्रबळ असताना ती भक्कम बनविण्याचे मोठे काम राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान या उपक्रमांच्या माध्यमातून करत आहे हे सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला, माता भगिनींचे योगदान मोठे आहे.


रत्नागिरी सिंधुदुर्गमधे एकूण लोकसंख्येमध्ये ६२ टक्के महिला आहेत. त्यांना सक्षम करणे आणि त्यातून कोकणचा विकास करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अलौकिक इतिहासाचे स्मरण करत असतानाच आजच्या काळात महिलांना सक्षम करणे म्हणजेच हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हाच संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे असे ना. राणे म्हणाले.


लव्ह जिहाद या अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नावर कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मुलींची सुरक्षितता किती महत्त्वाची आहे, त्यांना शारीरिक आणि मानसिक सक्षम करणे किती आवश्यक आहे हे लक्षात येते आणि त्याचवेळी आज ज्या पद्धतीने राष्ट्र सेविका समिती करत असलेल्या कामाचे महत्त्व वाढते. आज हिंदू समाज म्हणून एकत्र येण्याची गरज आहे हे ओळखणे गरजेचे आहे. अनेक सामाजिक प्रश्नांवर जनजागृतीची गरज आहे, आजूबाजूला असलेल्या कटू वास्तवाला सामोरे गेले पाहिजे असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

महाराष्ट्रात गारठा वाढला, काही भागांत पावसाची शक्यता!

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'दितवाह' चक्रीवादळाचा परिणाम देशभर जाणवू लागला असून, अनेक राज्यांमध्ये

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.

निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज

एकूण २५,००० बॅलेट युनिट आणि २०,००० कंट्रोल युनिट महानगरपालिकेच्या ताब्यात मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक; २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी

मुंबई : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत असून, मतदानासाठी

महाराष्ट्रात किती नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती अखेर आकडा समोर, निवडणूक आयोगाकडून सुधारीत कार्यक्रम जाहीर

मुंबई : महाराष्ट्रातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्णपणे स्थगित करण्याचा तर काही ठिकाणी नगर