मुंबईत एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना 'दे धक्का'


मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुंबईत एकनाथ शिंदेंनी मनसेला धक्का दिला आहे. मनसेचे माजी उपविभाग अध्यक्ष प्रीतम चेउलकर यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. प्रीतम चेउलकर यांनी अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंगेश कुडाळकर यांचं काम पाहून शिवसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रीतम चेउलकर यांनी सांगितले.


मनसेमध्ये जे काही सुरू आहे त्यातल्या अनेक गोष्टींविषयी तक्रारी केल्या. पण फरक पडला नाही. अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन राजीनामा दिला. पदाचा राजीनामा दीड महिन्यापूर्वी दिला होता. मनसे या पक्षाचा राजीनामा देऊन आता शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती प्रीतम चेउलकर यांनी दिली.


मनसेतून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे पक्षात मंगेश कुडाळकर यांनी स्वागत केले. एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवा आणि कामाला लागा असे निर्देश मंगेश कुडाळकर यांनी दिले. मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार आणि तो मराठीच होणार असं भाकीत शिवसेनेच्या मंगेश कुडाळकर यांनी केले.


Comments
Add Comment

रझाला हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...; शाहीन शाह आफ्रिदीला ठोठावला मोठा दंड

नवी दिल्ली: पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. या तिसऱ्या स्तरावरील स्पर्धेत

Narhari Zirwal : नरहरी झिरवळ व्हिडिओ प्रकरणात पहिली कारवाई; ट्रान्सजेंडरच्या भावावर मुंबईत गुन्हा दाखल, मोठी माहिती समोर

मुंबई : राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ एका नवीन वादात सापडले आहेत. त्यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या

नितीश यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; कोण होणार मुख्यमंत्री?

नवी दिल्ली: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी ते राज्यसभेवर

संयुक्त राष्ट्राचे राजनयिक मोहम्मद सफा यांनी दिला राजीनामा; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे, ज्यामुळे

मेट्रो वूमन, कोस्टल वूमन ते पहिल्या मुंबई महापालिका आयुक्त

मुंबई: सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांचे नाव उच्चारताच आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात ते म्हणजे मेट्रो व्हूमन.

CSKvsRR : वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने चेन्नई विरोधात राजस्थानचा ‘रॉयल’ विजय

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने नवा कर्णधार रियान परागच्या नेतृत्वात सोमवारी