ड्रोन दिसताच बोंबाबोंब करणारी शिउबाठा अखेर तोंडावर पडली


मुंबई : शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर परिसराजवळ ड्रोन उडत असल्याचे आढळले. या मुद्यावरुन शिउबाठा समर्थकांनी बोंबाबोंब करायला सुरुवात केली. पाळत ठेवण्याच्या हेतूने ड्रोनची व्यवस्था केली असल्याचा आरोप शिउबाठा समर्थकांनी केला. पण मुंबई पोलिसांच्या परवानगीने एमएमआरडीएने विशिष्ट कामासाठी ड्रोनची व्यवस्था केली असल्याची बातमी आली. ही बातमी येताच बोंबाबोंब करत असलेले शिउबाठा समर्थक तोंडावर पडले.



खेरवाडी, वांद्रे, वांद्रे - कुर्ला संकुल या भागांमध्ये ठिकठिकाणी एमएमआरडीए विविध प्रकल्पांवर काम करत आहे. या कामांशी संबंधित सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर सुरू आहे. एमएमआरडीएने ड्रोन वापरण्यासाठी मुंबई पोलिसांकडून रितसर परवानगी घेतली आहे. मिळालेल्या परवानगीनुसार एमएमआरडीए ड्रोनचा वापर करत आहे. पण हे ड्रोन बघून काही जणांनी राजकीयदृष्ट्या लाभ घेण्याच्या हेतूने बोंबाबोंब केली. त्यांचा हा हेतू अयशस्वी झाला कारण ड्रोन बाबतचे सत्य थोड्याच वेळात जगासमोर आले. मुंबई पोलीस दलाने ड्रोन एमएमआरडीएचे आहेत आणि परवानगी घेऊनच वापरले जात आहेत, असे जाहीररित्या सांगितले. यामुळे बोंबाबोंब करणाऱ्यांची पंचाईत झाली.



ड्रोन म्हणजे काय ?


मानवरहित विमानाला (Unmanned Aerial Vehicle or UAV) अनेकजण ड्रोन (Drone) या नावाने ओळखतात. हे एक उडणारे यंत्र आहे. ड्रोनचा वापर विविध कामांसाठी केला जातो. भारतात ड्रोनचा वापर प्रामुख्याने संरक्षण विभाग, निमलष्करी दले आणि पोलीस करतात. सरकारी विभाग सर्वेक्षण, पाहणी, मोजणी, नकाशा निर्मिती अशा विविध कामांसाठीही ड्रोनचा वापर करतात.


Comments
Add Comment

Aapli Chikitsa योजनेत विश्वासघात,तरीही महापालिकेने दाखवला विश्वास

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर केला जाणारा खर्च कमी व्हावा आणि रुग्णांना

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रावळी कॅम्प प्रसूतीगृह वगळता सर्व प्रसूतीगृहांमध्ये विद्युत पुरवठा

एसआरए इमारतींना आपत्कालीन जिना उभारणार

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत उभारलेल्या मुंबईतील तब्बल एक हजार सात मजली जुन्या इमारतींना आता बाहेरील

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू

मुंबईतल्या काँग्रेस आमदाराचे दोन मतदारयाद्यांमध्ये नाव, चोर कोण, दोष कुणाचा?

मुंबई: काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या मतदारयाद्यांमधील घोळांचा पाढा वाचायला