उबाठाच्या ताब्यातील गड भाजपा करणार काबिज

भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या विशेष बैठका आणि सभा


नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांसोबत पदाधिकाऱ्यांना लावले कामाला


मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मुंबईवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला असून त्याचाच एक भाग म्हणून उबाठाच्या ताब्यात असलेल्या गडांवर भाजपाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे उबाठाचे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये भाजपाने बैठका तसेच सभा आयोजित करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिक सक्रीय करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेकडे असलेल्या प्रभागांच्या जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यादृष्टीकोनातूनच भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांच्यासमवेत उबाठाच्या माजी नगरसेकांच्या प्रभागांमध्ये बैठका, सभा घेवून त्यांच्यातील गड काबिज करण्याची जय्यत तयारी करत आहे. या माध्यमातून भाजपाने आपल्या नगरसेवकांची संख्या अधिक वाढवण्याचा निर्धार केला आहे.

मुंबईत सन २०१७च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालिन शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे लढली आणि या निवडणुकीत भाजपाचे ८२ नगरसेवक तर शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते. परंतु आता शिवसेनेची दोन छकले पडलेली असून एकनाथ शिंदे मुख्यनेता असलेल्या शिवसेनेकडे आता यातील ४९ नगरसेवक आहेत, तर उबाठा शिवसेनेकडे ५१ नगरसेवक आहे. याशिवाय शिवसेनेकडे आता काँग्रेस आणि मनसेचेही नगरसेवक आहेत. सन २०१७च्या निवडणुकीत भाजपा स्वतंत्र लढून ८२ नगरसेवक निवडून आणू शकले. परंतु आता उबाठाकडे आता अजुनही ५० आसपास माजी नगरसेवक असल्याने त्यांच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये भाजपाने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

उत्तर मध्य जिल्हा तथा लोकसभा मतदार संघातील कलिना आणि वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रात भाजपाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. आजवर या दोन्ही मतदार संघात तत्कालिन शिवसेनेलाच जागा जात असल्याने भाजपाला याठिकाणी नशिब आजमवता आलेले नाही. परंतु कलिना व वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक ८८मध्ये भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक तसेच सभा घेतली. या प्रभागात उबाठा शिवसेनेचे सदा परब हे निवडून आले होते. परंतु या मतदार संघात भाजपाने आतापासूनच आपली दावेदारी सांगून उबाठाकडून आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. विलेपार्ले, कलिना आणि वांद्रे पूर्व अशा तीन विधानसभा मतदार संघामध्ये हा प्रभाग मोडला जातो. तर यापूर्वी वांद्रे पूर्व विधानसभेतील प्रभाग ९३मध्येही अशाचप्रकारे भाजपा मुंबई अध्यक्षांनी बैठक तथा सभा घेतली होती. या प्रभागात उबाठाच्या रोहिणी कांबळे निवडून आल्या होत्या.

कलिना विधानसभेत उबाठा आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक तर काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत. त्यामुळे कलिना आणि वांद्रे विधानसभा मतदार संघात भाजपाचे अधिक लक्ष आहे. याबरोबरच शहरातील वरळी आणि शिवडी विधानसभा तसेच दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला पूर्व,विलेपार्ले, विक्रोळी, मानखुर्द शिवाजीनगर, घाटकोपर पश्चिम,मागाठाणे या मतदार संघातील उबाठाच्या प्रभागांमध्ये जिथे भाजपाचे उमेदवार मागील निवडणुकीत तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अधिक मतदान झाले किंवा जिथे शिवसेनेचा सक्षम उमेदवार नाही अशा प्रभागांमध्ये भाजपाने आतापासूनच फिल्डींग लावून विद्यमान नगरसेवकांची संख्या राखतानाच उबाठाच्या नगरसेवकांच्या जागा जिंकून आपली संख्या वाढवण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे.
Comments
Add Comment

कर्नाटकमधील मच्छीमारांची महाराष्ट्रात घुसखोरी, सरकारी यंत्रणेची लगेच कारवाई

देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने

'हे' आहे देशातील पहिले शाकाहारी शहर! जाणून घ्या सविस्तर

गुजरात: कोरोना काळानंतर जगात मासांहार करणाऱ्यांपेक्षा शाकाहारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. शाकाहारी जेवण

शिउबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख भाजपच्या वाटेवर

डोंबिवली : शिउबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख आणि डोंबिवलीतील प्रभावी नेते दीपेश म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाची

Aapli Chikitsa योजनेत विश्वासघात,तरीही महापालिकेने दाखवला विश्वास

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर केला जाणारा खर्च कमी व्हावा आणि रुग्णांना

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रावळी कॅम्प प्रसूतीगृह वगळता सर्व प्रसूतीगृहांमध्ये विद्युत पुरवठा

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता, टीम इंडिया पुढील मालिका कुठे खेळणार ?

कोलकाता : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता झाली. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका