जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा- 'ताठ कणा'

मुंबई: 'माणसाला धैर्य त्याच्याच ताठ कण्यामुळे मिळते', हे वि.वा. शिरवाडकरांचे वाक्य डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले आहे. न्यूरोस्पाईन सर्जरीला एक नवी दिशा देऊन हजारो रुग्णांना उपचार व आपल्या मौलिक मार्गदर्शनाने 'ताठ कण्याने' जगायला शिकवणारे जगप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी मानवतेच्या तत्वाचा स्वीकार करत आजवर हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. लाखो रूग्णांना वेदनामुक्त करणारी एक विशेष सर्जरी शोधून काढताना त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या संशोधनावर शंका व्यक्त केली गेली. यावर संघर्ष आणि रूग्णांच्या मदतीने त्यांनी मात केली. त्यांच्या या जिद्दीवर आधारित 'ताठ कणा' हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.


'प्रज्ञा क्रिएशन्स'चे विजय मुडशिंगीकर व 'स्प्रिंग समर फिल्मस' चे करण रावत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले असून दिग्दर्शक गिरीश मोहिते आहेत. समर्पण, सेवा, प्रेम आणि प्रामाणिकपणा याची श्वास रोखून धरायला लावणारी, उत्कंठापूर्ण कथा दाखवणाऱ्या 'ताठ कणा' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मान्यवरांच्या उपस्थित नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक अशोक हांडे उपस्थित होते. चित्रपटाच्या यशासाठी त्यांनी यावेळी मनापासून शुभेच्छा दिल्या.


'माझ्या एका पेशंटला माझ्यावर चित्रपट करावासा वाटणे हे माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आहे. माझा प्रवास चित्रपटातून मांडण्यासाठी या संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीसाठी मी सगळ्यांचा ऋणी आहे’ अशी भावना डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी यावेळी व्यक्त केली. 'डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या प्रयत्नांमुळे वेदनेच्या संघर्षातून आमचं कुटुंब आणि आम्ही सुखरूप बाहेर पडलो. रामाणी यांच्या चिकाटीचा, संघर्षाचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर आणण्याचं माझ्या वडिलांचं स्वप्न आज पूर्ण होतयं, याचा आनंद आहे’ असं रोहन मुडशिंगीकर यावेळी म्हणाले.



‘हा चित्रपट उत्तम टीमवर्कचा एक आदर्श नमूना आहे. आमच्या सगळ्यांच्या पुण्याईने या चित्रपटाचा भाग होता आले’ अशा शब्दांत दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी आपला आनंद व्यक्त केला. डॉक्टरांची भूमिका करायला मिळाली ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे, याप्रसंगी बोलताना अभिनेता उमेश कामतने सांगितले. तर ‘डॉक्टरांचा एवढा प्रदीर्घ जीवनप्रवास मांडणं हे लिखाणाच्या दृष्टीने अवघड काम होतं. हे आव्हान डॉक्टरांच्या सहकार्यामुळेच पेलून दाखवू शखलो’ अशा शब्दांत लेखक श्रीकांत बोजेवार यांनी आपला आनंद व्यक्त केला.



'ताठ कणा' या चित्रपटात उमेश कामत, दीप्ती देवी, सायली संजीव, सुयोग गोऱ्हे, अजित भुरे, शैलेश दातार, अनुपमा ताकमोगे, रवी गोसाई, संजीव जोतांगिया आदी कलाकारांच्या भूमिका आहेत,


Comments
Add Comment

आयुष आणि अनुष्काची ‘जब्राट’ जोडी पडद्यावर

छोट्या पडद्यावरील मालिकेमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही

धुरंधर स्टार रणवीर सिंगचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी भरभरून कौतुक केले, जाणून घ्या त्यांना “ज्वालामुखी” का म्हटले

धुरंधर बॉक्स ऑफिसवर सातत्याने शानदार कामगिरी करत आहे आणि आता एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की रणवीर सिंगबाबत

लाडकी काव्या म्हणजेच ज्ञानदाची लगीनघाई सुरु; हातावर रंगली त्याच्या नावाची मेहंदी

मुंबई : लग्नाचा हंगाम जोरदार सुरु आहे. बरेच सेलिब्रिटी मंडळी या वर्षी विवाह बंधनात अडकली तर काही लवकरच लग्न करणार

दोनच चित्रपटांत १२०० कोटी; आदित्य धरचा थक्क करणारा प्रवास

मुंबई : ‘धुरंधर’ या चित्रपटाने आदित्य धर यांना बॉलीवूडमधील खरा धुरंधर ठरवले आहे. सध्या चर्चेत असलेल्या

पॅन-इंडिया सुपरस्टार प्रभास यांनी ‘द स्क्रिप्ट क्राफ्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’द्वारे जागतिक स्टोरीटेलिंगला दिले नवे व्यासपीठ!

बाहुबली, सालार आणि कल्कि 2898 ए.डी. सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे आणि ज्यांना अनेकदा जगातील महान

कांतारा चॅप्टर १’ ला तगडी टक्कर देत, ‘धुरंधर’ बनला २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

रणवीर सिंग स्टार "धुरंधर" या चित्रपटाने आपली कमाई सुरूच ठेवली आहे.चित्रपटाने १७ दिवसांत ५५५ कोटींचा आकडा ओलांडला