प्रतिनिधी: ब्रिटिश ऑटोमोटिव्ह ब्रँड मिनी (MINI) कंपनीकडून भारतात ऑल-इलेक्ट्रिक कंट्रीमन SE All4 ही चारचाकी लाँच केली गेली आहे. कंपनीच्या माहितीनुसार,कारची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे. माहितीनुसार ६६९०००० रुपये (एक्स-शोरूम) किंमत असलेली ही कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयुव्ही (SU) संपूर्णपणे बिल्टअप युनिट (CBU) म्हणून उपलब्ध आहे आणि शुक्रवारपासून सर्व MINI इंडिया अधिकृत डीलरशिपवर बुक करता येईल असे सांगितले आहे.या कारला कंट्रीमन SE All4 मध्ये ६६.४५ kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरीद्वारे चालणारी ऑल-व्हील ड्राइव्ह आहे. ४४० किमी पर्यंत WLTP रेंज देते असा दावा कंपनीने केलि आहे. फिचर्सबाबत बघितल्यास १३० kW वर DC फास्ट चार्जिंग बॅटरी अंदाजे २९ मिनिटांत १० ते ८०% चार्ज करते. याउलट, २२ kW AC चार्जिंग सुमारे ३ तास ४५ मिनिटांत पूर्ण चार्ज होते.
कंपनीने दावा केला आहे की,ही कार ३१३ एचपी आणि ४९४ एनएम टॉर्क देते, ५.६ सेकंदात ०-१०० किमी/ताशी वेग मिळवते आणि १८० किमी/ताशी कमाल वेग गाठते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 'वॉरंटी आणि सपोर्टमध्ये दोन वर्षांची अमर्यादित-किलोमीटर वॉरंटी, आठ वर्षांची किंवा १६०००० किलोमीटरची हाय-व्होल्टेज बॅटरी वॉरंटी आणि पाच वर्षांची २४/७ रोडसाईड असिस्टन्स समाविष्ट आहे. कार दोन वर्षांची इंडस्ट्री मानक (Industry Standard) अमर्यादित- किलोमीटर वॉरंटीसह येते याशिवाय कंपनी हाय व्होल्टेज बॅटरी ८ वर्षांची किंवा १६०००० किलोमीटरची वॉरंटीद्वारे संरक्षित केलेली आहे.' असे कंपनीने लाँच दरम्यान कार फिचर्सबाबत स्पष्ट केले.
कारमधील अनेक मोडमध्ये 'रेस-प्रेरित (Race Mode) 'गो-कार्ट मोड' ते ऊर्जा-बचत करणारा 'ग्रीन मोड' किंवा सजीव 'व्हिव्हिड मोड' यांचा समावेश आहे, असे कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. स्टँडर्ड ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम ही उत्पादनाची जमेची बाजू आहे त्यामुळे आव्हानात्मक परिस्थितीतही स्पोर्टी एसयूव्हीला पुरेशी पकड आणि ट्रॅक्शन प्रदान करते, असा दावा त्यात करण्यात आला आहे.
कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरासह क्रूझ कंट्रोल आणि पार्किंग असिस्टंट प्लस सारख्या प्रगत असिस्टन्स सिस्टम आहेत आणि कम्फर्ट अँक्सेससह, कार १.५ मीटरपेक्षा कमी अंतरावर चावी ओळखल्याने स्वयंचलितपणे लॉक/अनलॉक होते, असे कंपनीने माध्यमांनाम्हटले आहे. कंपनीने असेही म्हटले आहे. MINI Countryman SE All4 मध्ये ऑटो स्टार्ट/स्टॉप फंक्शन, ब्रेक एनर्जी रिक्युपेरेशन, अँक्टिव्ह कूलिंग एअर डक्ट्स आणि इलेक्ट्रोमेकॅनिकल पॉवर स्टीअरिंग सारखी वैशिष्ट्ये आहेत असेही कंपनीने यावेळी प्रस्तुत केले.