AIF Investment SEBI: पर्यायी गुंतवणूक निधी गुंतवणूकीबाबत सेबीचे लोकांना 'हे' आवाहन सेबीकडून नवे परिपत्रक जाहीर

गुंतवणूकदारांच्या अधिकारांबाबत SEBI ने मसुदा परिपत्रक प्रसिद्ध केले


प्रतिनिधी:एआयएफ (पर्यायी गुंतवणूक निधी Alternative Investment Fund AIF) बाबत सेबीने नवे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. बाजार नियामक सेबीने एक मसुदा परिपत्रक प्रसिद्ध करत पर्यायी गुंतवणूक निधी (AIFs) मध्ये गुंतवणूकदारांचे प्रो-रेटा आणि पॅरी-पासू अधिकार राखण्याच्या प्रक्रियेबाबत जनजागृती केली आहे. याबाबत गुंतवणूकदारांच्या अधिकारावर भाष्य करत अधिकाराचा विनिमय व वापर करण्याचे सेबीने सुचवले. यासाठी सेबीने जनतेच्या काही सूचना असल्यास ते सेबीकडे कळवण्याचे आवाहनही केले आहेत. आपली प्रतिक्रिया अथवा अभिप्राय कळवण्यासाठी शेवटची तारीख २८ नोव्हेंबर असेल.


प्रो-रेटा म्हणजे सामान्यतः गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात नफा किंवा परतावा वाटतात तर पॅरी-पासू म्हणजे सर्व गुंतवणूकदारांना समान वागणूक दिली जाते कोणालाही विशेष प्राधान्य दिले जात नाही. या आपल्या अधिकाराचा वापर गुंतवणूकदारांनी करावा यासाठीही जनजागृती सेबीने केली आहे.


सेबीने त्याच्या मसुद्यात प्रस्तावित केले आहे की बंद अथवा समाप्त एआयएफ योजनांसाठी गुंतवणूकदारांचे हक्क गुंतवणूकीच्या रकमेचे वितरण करताना त्यांच्या एकूण वचनबद्धतेवर किंवा काढलेल्या वचनबद्धतेवर आधारित असावेत. एआयएफच्या योजनेतील गुंतवणूकदारांना असलेल्या गुंतवणुकीतील त्यांच्या योगदानाच्या प्रमाणात गुंतवणुकीच्या रकमेचे वितरण करण्याचे अधिकार असतील किंवा, योजनेच्या पीपीएम (Project Portfolio Mangement PPM ) मध्ये गुंतवणूकदारांना स्पष्टपणे उघड केल्याप्रमाणे वेळेच्या आधारित प्रो-रेटा आधारावर अशा गुंतवणुकीतील त्यांच्या योगदानाच्या प्रमाणात हा परतावा असला पाहिजे असे सेबीने सुचवले आहे.


सेबीने पुढे म्हटले आहे की योजनांनी प्रो-रेटा अधिकार कसे मोजले जातात हे स्पष्टपणे उघड करावे आणि त्यांच्या कार्यकाळात ही पद्धत बदलू नये. विशिष्ट गुंतवणुकीतून वगळण्यात आलेल्या गुंतवणूकदारांना त्यांची न वापरलेली वचनबद्धता इतरत्र वापरता येणार नाही.या पद्धतीमुळे कोणत्याही गुंतवणूकदाराला गुंतवणूकदार कंपनीमध्ये निर्धारित एकाग्रता मर्यादेपेक्षा जास्त हिस्सा ठेवण्यापासून रोखले पाहिजे.जर त्यांचे पालन केले तर विद्यमान एआयएफ योजना त्यांच्या सध्याच्या पद्धतीनुसार सुरू ठेवू शकतात, परंतु भिन्न प्रणाली वापरणाऱ्यांनी भविष्यातील गुंतवणुकीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वांशी जुळवून घेतले पाहिजे.


ओपन-एंडेड कॅटेगरी III AIF, जिथे गुंतवणूकदार मुक्तपणे प्रवेश करू शकतात किंवा बाहेर पडू शकतात, त्यांना प्रो-रेटा ड्रॉडाउन लागू करण्याची आवश्यकता असू शकत नाही परंतु त्यांनी ठेवलेल्या युनिट्सच्या प्रमाणात उत्पन्न वितरित केले पाहिजे असे सेबीने म्हटले. तथापि, जर अशा योजना अनलिस्टेड सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करत असतील तर मात्र त्यांनी क्लोज-एंडेड योजनांसारखेच नियम पाळले पाहिजेत, असे सेबीने म्हटले आहे.


१३ डिसेंबर २०२४ पूर्वी केलेल्या गुंतवणुकीसाठी, वितरण गुंतवणूकदारांना आधीच उघड केलेल्या विद्यमान अटींचे पालन करेल.परिपत्रकात असेही स्पष्ट केले आहे की गुंतवणूकदारांनी निधी व्यवस्थापकांसह सामायिक केलेले परतावे किंवा नफा जसे की कॅरीड इंटरेस्ट हे प्रो-रेटा आवश्यकतेपासून मुक्त आहेत.तसेच सेबीने AIF व्यवस्थापकांना प्रो-रेटा अधिकारांचे पालन दर्शविणारे योग्य रेकॉर्ड राखण्याचे निर्देश दिले आहेत आणि विश्वस्तांनी हे सुनिश्चित करावे की अनुपालन अहवाल (Regulatory Report) या तरतुदींचे पालन केले पाहिजे.


नोव्हेंबर २०२४ मध्ये एआयएफ (पर्यायी गुंतवणूक नियमावली) नियमांमध्ये सुधारणा आणि त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानंतर ही सूचना दिली गेली आहे. सेबीने २८ नोव्हेंबरपर्यंत सार्वजनिक अभिप्राय मागवले त्यानंतर सेबी आवश्यक ते पुनरावलोकन करणार आहे.

Comments
Add Comment

पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू

मोठी बातमी: लाखो लोकांसाठी सेबीकडून मोठी सूचना ! खबरदार...डिजिटल सोन्यात गुंतवणूक करताना 'ही' काळजी घ्या

मोहित सोमण:सेबीने एक मोठी घोषणा केली आहे. सेबीने केवळ आणि केवळ सेबी अधिकृत सोने गुंतवणूकीत पैसे गुंतवण्याचा

ब्रिटिश कंपनी मिनीकडून ऑल इलेक्ट्रिक कंट्रिमन एस ई ऑल ४ कॉम्पॅक्ट एसयुव्ही भारतात लॉन्च

प्रतिनिधी: ब्रिटिश ऑटोमोटिव्ह ब्रँड मिनी (MINI) कंपनीकडून भारतात ऑल-इलेक्ट्रिक कंट्रीमन SE All4 ही चारचाकी लाँच केली

HKSTP EPIC 2025: केवळ युए युके नाही तर सिंगापूर आणि कॅनडामधील हजारो स्टार्टअप भारतात गुंतवणूकीसाठी इच्छूक!

प्रतिनिधी: वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, सिंगापूर आणि कॅनडामधील अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्टअप्सनी

Viral Video : धावत्या बसमध्ये तरुणीचा विनयभंग! आधी मांडीवरून हात फिरवला, मग टीशर्टमध्ये हात घातला अन्...संतापजनक व्हिडिओ व्हायरल

केरळ : महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक आणि संतापजनक घटना केरळ