वंदे मातरम् इतिहास नाही; देशाच्या अस्तित्वाची ओळख


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘वंदे मातरम् हे शब्द आपल्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करतात. आपल्याला हे शब्द बळ देतात. हे गीत पिढ्यानपिढ्या भारतीयांच्या हृदयात उत्साह आणि देशभक्ती निर्माण करते. वंदे मातरम् केवळ एक गीत नव्हते, तर स्वातंत्र्यलढ्याचा आवाज होता. ज्यामुळे प्रत्येक क्रांतिकारी भारत माता की जय म्हणू लागला. याच भावनेने देशाला गुलामगिरीतून मुक्त होण्याची ताकद दिली. या गाण्याने प्रत्येक भारतीयाच्या मनात हा संकल्प जागृत केला की भारतमातेची मुले स्वतःचे भाग्य स्वतः बनवतील. वंदे मातरम् हा केवळ इतिहास नाही, तर तो भारताच्या अस्तित्वाची ओळख असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.


भारताचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिल्लीत ऐतिहासिक कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. यावेळी ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी एक स्मारक टपाल तिकीट आणि एक स्मारक नाणे प्रकाशित केले.


वंदे मातरम् स्वातंत्र्य चळवळीचा आवाज


वंदे मातरम्, हे शब्द एक मंत्र, एक ऊर्जा, एक स्वप्न, एक संकल्प आहेत. वंदे मातरम् हे शब्द भारतमातेची भक्ती आहेत, भारतमातेची आराधना आहेत. एवढेच नाही तर वंदे मातरम् हे शब्द आपल्याला इतिहासात परत घेऊन जातात आणि आपल्या वर्तमानाला नवा आत्मविश्वास आणि आपल्या भविष्याला प्रेरणा देतात. वंदे मातरम् हे शब्द म्हणजे असा कोणताही संकल्प नाही जो साध्य करता येत नाही, असे कोणतेही ध्येय नाही. जे आपण साध्य करू शकत नाही, म्हणजेच वंदे मातरम्’, ‘वंदे मातरम् स्वातंत्र्य चळवळीचा आवाज बनले होते. हे येणारे वर्ष देशाच्या एकतेचे, अखंडतेचे आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक बनेल. हा उत्सव भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आणि आजही आपल्याला प्रेरणा देणाऱ्या आत्म्याला पुनरुज्जीवीत करेल.’ असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.



Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा