टेस्लाचे सीईओ मस्क यांचा पगार जाणार ट्रिलियनच्या घरात ! कंपनी इतिहासातलं सीईओसाठीचे सर्वात मोठं पॅकेज

अमेरिका: स्पेसएक्स आणि टेस्ला सारख्या मोठ्या कंपन्यांचे मालक व जगभरात श्रीमंतीचा रुबाब दाखवणारे एलन मस्क लवकरच इतिहास रचणार आहेत. कारण टेस्लाच्या जवळपास ७५ % शेअरहोल्डर्सनी मस्कसाठी मोठ्या पगार पॅकेजला हिरवा कंदील दाखवला आहे. या पॅकेजमुळे टेस्ला सीईओ एलन मस्क लवकरच जगातील पहिले-वहिले ट्रिलियनेअर बनणार आहेत. तसेच टेस्ला इंकच्या भागधारकांनी विक्रमी पगार पॅकेज मंजूर केले आहे.


टेस्ला बोर्डाने कामगिरीवर आधारित प्रोत्साहन रचना तयार केली आहे ज्यामुळे कंपनीने काही आर्थिक उद्दिष्टे साध्य केल्यास मस्कला अब्जावधी डॉलर्सचे शेअर्स मिळतील. या बोनस पॅकेजमुळे मस्कची वैयक्तिक संपत्ती १ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त होऊ शकते. कोणत्याही कंपनीच्या इतिहासात सीईओला मिळालेले हे सर्वात महागडे पॅकेज असून मस्कचे पेमेंट सिंगापूर, यूएई, स्वित्झर्लंड, स्वीडन, नॉर्वे, हाँगकाँग, कतार आणि न्यूझीलंड सारख्या समृद्ध देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त असेल.



या पॅकेजचा प्राथमिक उद्देश मस्क यांना टेस्लामध्ये दीर्घकाळ ॲक्टिव्ह ठेवायचा असून अलिकडेच मस्क यांनी टेस्ला गुंतवणूकदारांना वेतन पॅकेज प्रस्तावाला मान्यता न दिल्यास कंपनी सोडण्याची धमकी दिली होती. कंपनी एआय, रोबोटिक्स आणि स्वायत्त तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात मोठे प्रकल्प राबवत असल्याने मस्क टेस्लासाठी महत्त्वाचे असल्याचेही बोर्ड सदस्यांनी सांगितले.


मस्कचे वेतन १२ भागात विभागले गेले आहे. पुढील दहा वर्षांत टेस्ला विशिष्ट आर्थिक आणि ऑपरेशनल लक्ष्य पूर्ण करेल तेव्हा प्रत्येक भाग अनलॉक केला जाईल. सर्व लक्ष्ये पूर्ण झाल्यावर मस्कला ४२३ दशलक्षपेक्षा जास्त शेअर्स मिळतील. ज्यामुळे कंपनीतील हिस्सा १३ % वरून २५ % पर्यंत वाढेल. यामुळ मस्कचे टेस्लावरील नियंत्रण वाढणार आहे.
Comments
Add Comment

कल्याणमधील रिंगरोड प्रकल्प लवकर होणार पूर्ण! आयुक्तांचे आश्वासन

कल्याण: शहरातील वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून कल्याणमध्ये रिंगरोड तयार करण्यात येत आहे. या प्रस्तावित रिंगरोडचे

रश्मीका आणि विजय देवरकोंडा लवकरच लग्नबंधनात अडकणार

मुंबई : छावा चित्रपटात राणी येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि सुपरस्टार विजय देवरकोंडा

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत

मुंबई : आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर

भीम यूपीआयद्वारे 'मुंबई वन' तिकिटांवर २० टक्के सवलत

एमएमआरडीएकडून ३१ डिसेंबरपर्यंत ऑफर मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्यांच्या

आज मध्यरात्री कल्याण-बदलापूर दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर शुक्रवारी मध्यरात्री कल्याण आणि बदलापूर दरम्यान चार ठिकाणी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

पाण्याची गळती आणि दुषित पाणी समस्येवर लक्ष द्या, आयुक्तांचे जल अभियंता विभागाला निर्देश

मुंबई : मुंबई उत्तर मुंबईतील पाण्याच्या समस्येबाबत महापालिका आयुक्तांसोबतच लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या