मुंबई : छावा चित्रपटात राणी येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि सुपरस्टार विजय देवरकोंडा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक चाहत्यांची इच्छा होती की त्यांनी लग्न करावे, प्रेक्षकांकडून या जोडीला कायम भरभरून प्रेम मिळत गेले. काही दिवसांपूर्वी दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याचीही बातमी समोर आली होती. अश्यातच आता दोघांच्याही चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रश्मिका मंदाना आणि सुपरस्टार विजय देवरकोंडा २६ फेब्रुवारी २०२६ लग्न करणार आहेत. ते राजस्थानातील उदयपूर इथल्या एका आलिशान राजवाड्यात लग्न करणार आहेत. पण रश्मीका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्याकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार लग्नाची तयारी सुरू झाली आहे. दोघांच्या लग्नाच्या तारख्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कधी कुठे होणार लग्न ?
एका वृत्तानुसार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे २६ फेब्रुवारी २०२६ रोजी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार आहेत. रश्मिका आणि विजय राजस्थानातील उदयपूर येथे लग्न करण्याची योजना आखत आहेत. एका रिपोर्टनुसासर एका जवळच्या मित्राने त्यांच्या लग्नाचं प्लॅनिंग सांगितलं आहे. सर्व धार्मिक विधी करुन लग्न केले जाईल.
गेल्या महिन्यात विजय आणि रश्मिका यांचा साखरपुडा विजयच्या हैद्राबादच्या घरी झाला होता, अशी माहिती समोर आलेली आहे. या सोहळ्याला फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. 'थामा' च्या प्रमोशन दरम्यान रश्मिकाने हिंट दिलेली की दोघांनीही साखरपुडा केला आहे आणि खूप आनंदी आहेत. विजयच्या टीमनं देखील पुष्टी केली की, दोघेही साखरपुडा झाल्यामुळे आनंदात आहेत. आता लग्नाच्या तारखेचे वृत्त पण आले आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, रश्मिकाचा तिच्या पाळीव कुत्र्यासोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी रश्मिकाच्या हातात हिऱ्याची अंगठी दिसलेली. चाहत्यांनी दावा केला की, विजयनं तिला ही अंगठी भेट दिली होती. याशिवाय, जेव्हा विजय त्याच्या कुटुंबासह मंदिरात जाताना दिसला, तेव्हा त्याच्या हातात रश्मिकाच्या अंगठीसारखीच अंगठी दिसत होती.
दोघांची पहिली भेट
रश्मिका आणि विजय यांची पहिली भेट २०१८ मध्ये 'गीता गोविंदम' य चित्रपटाच्या सेटवर झाली होती. प्रेक्षकांच्या दोघांची केमिस्ट्री खूप आवडली. एका वर्षानंतर, ते पुनः 'डिअर कॉम्रेड' या चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आले. चाहत्यांना लवकरच त्यांची ऑनस्क्रीन जोडी आता खऱ्या आयुष्यातही पाहायला मिळेल.