प्राइम व्हिडिओने ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनचा दमदार ट्रेलर केला सादर ; राज आणि डीके यांची लोकप्रिय गुप्तहेर मालिका येत्या २१ नोव्हेंबरला प्रदर्शित

मुंबई : भारतातील मनोरंजन व्यासपीठ प्राइम व्हिडिओने आज मुंबईत चाहत्यांसाठी आणि माध्यमांसाठी आयोजित एका कार्यक्रमात ‘द फॅमिली मॅन’ सीझन ३चा ट्रेलर लाँच केला.राज आणि डीके यांनी त्यांच्या D2R Films या बॅनरखाली निर्मित केलेली ही बहुचर्चित, गुप्तहेर मालिका पुन्हा एकदा परत येत आहे. यात मनोज बाजपेयी साकारत असलेला गुप्तहेर श्रीकांत तिवारी याची कथा या वेळी नव्या वळणावर असलेली बघायला मिळणार आहे.

?si=SriF85UHUYe8zEp0

नेहमीप्रमाणेच विनोदी संवाद, जबरदस्त अ‍ॅक्शन, थरारक पाठलाग आणि वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याची गुंतागुंत – या सर्व घटकांनी भरलेला हा नवीन सीझन चाहत्यांना पुन्हा एकदा खिळवून ठेवणार आहे.या सीझनचे लेखन राज, डीके आणि सुमन कुमार यांनी केले असून, संवाद सुमित अरोरा यांचे आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी राज आणि डीके यांच्यासोबत सुमन कुमार आणि तुषार सेठ यांनी सांभाळली आहे.या सीझनमध्ये मनोज बाजपेयींसोबत जयदीप अहलावत आणि निम्रत कौर हे नव्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. तसेच आधीच्या सीझनमधील प्रिय कलाकार पुन्हा एकत्र येणार आहेत — शारिब हाशमी (जे.के. तलपदे), प्रियमणी (सुचित्रा तिवारी), अश्लेशा ठाकूर (ध्रुती तिवारी), वेदांत सिन्हा (अथर्व तिवारी), श्रेय धन्वंतरी (झोया) आणि गुल पनाग (सलोनी).

‘द फॅमिली मॅन’ सीझन ३ प्राइम व्हिडिओवर २१ नोव्हेंबरपासून भारतासह जगभरातील २४० पेक्षा अधिक देश आणि प्रदेशांमध्ये पाहायला मिळणार आहे.

राज आणि डीके म्हणाले , “या सीझनमध्ये श्रीकांतचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे उलथून गेले आहे. तो आपल्या कुटुंबासह एका नव्या आणि भीषण संकटात सापडतो. रुक्मा आणि मीरा या भूमिकांसाठी जयदीप आणि निम्रत ही परिपूर्ण जोडी आहे. या सीझनमधून प्रेक्षकांना अधिक ताण, थरार आणि भावनिक संघर्ष अनुभवायला मिळेल.”मनोज बाजपेयी म्हणाले, “गेल्या चार वर्षांपासून चाहते मला विचारत होते — ‘श्रीकांत तिवारी केव्हा परत येणार?’ आणि अखेर त्याचे उत्तर मिळाले आहे! नवीन सीझन आधीपेक्षा मोठा, धाडसी आणि अधिक रोमांचक आहे. राज आणि डीके यांच्या दृष्टीकोनामुळे आणि प्राइम व्हिडिओच्या साथीनं ‘द फॅमिली मॅन’ आज देशातील सर्वाधिक प्रिय मालिकांपैकी एक बनली आहे. मला खात्री आहे की प्रेक्षक या सीझनलाही तितकंच प्रेम देतील.”जयदीप अहलावत म्हणाले, “‘द फॅमिली मॅन’सारख्या उत्कृष्ट मालिकेचा भाग होणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. राज आणि डीके यांच्यासोबत काम करणे ही एक आनंददायक अनुभूती आहे. माझी भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आश्चर्यचकित करेल.” निम्रत कौर म्हणाल्या, “मी ‘द फॅमिली मॅन’ची चाहती आहे आणि या सीझनमध्ये एक ताकदवान नवा पात्र म्हणून सामील होणे हे माझ्यासाठी स्वप्नवत अनुभव आहे. मनोज आणि जयदीप यांच्यासोबत काम करणे आव्हानात्मक पण अतिशय समाधानकारक होते. कथानकातील अप्रत्याशित वळणांमुळे प्रेक्षक हा सीझन एकाच वेळी बघून संपवतील, यात शंका नाही.”

‘द फॅमिली मॅन’ सीझन ३ – २१ नोव्हेंबरपासून फक्त प्राइम व्हिडिओवर!
Comments
Add Comment

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि

मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित

मुंबई : सलमान खान फिल्म्स संगीतने सर्वांच्या आवडीच्या ‘चांद देख लेना’ या गाण्याचा एक विशेष पडद्यामागील व्हिडीओ

'मराठी माणसाच्या असंख्य आठवणींचे गाठोडे म्हणजे भारतमाता'

मुंबई : लालबाग, परळ आणि गिरणगावातील असंख्य मराठी माणसाच्या आठवणींचे एक मोठे गाठोडे घेऊन भारतमाता सिनेमागृह उभे

Bigg Boss Marathi 6 : शेवटची कॅप्टनसी कोणाला मिळणार ? प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चेर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग