बुरखा घालून १४ वेळा मतदान करण्याला आक्षेप नाही ?

मंत्री नितेश राणे यांचा नाशिकमध्ये विरोधकांना सवाल


नाशिक  : विधानसभा निवडणुकीनंतरच विरोधकांकडून मतबंदीचा मुद्दा का उपस्थित केला जात आहे? लोकसभा निवडणुकीत १४ वेळा बुरखा घालून मतदान झाले, तेव्हा का विचारले नाही? बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिला होत्या का, हा प्रश्न कुणी विचारला का? मोहम्मद अली रोडवर किती बोगस मतदार आहेत, त्याबद्दल का बोलले जात नाही? दोन्ही ठाकरे बंधूंनी त्यावेळी या विषयावर का काही विचारले नाही, असा सवाल मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केला.मंत्री राणे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


नितेश राणे म्हणाले की, मत्स्य उत्पादन व व्यवसाय कसा सुरू आहे. कृषी दर्जा मिळाल्यानंतर विभागाचे कामकाज कसे सुरू आहे, याचा मी जिल्हानिहाय आढावा घेत आहे. त्या अानुषंगाने ही बैठक घेण्यात आली. पार्थ पवार कंपनीच्या जमीन प्रकरणाबाबत विचारले असता मंत्री राणे म्हणाले की, या प्रकरणाची अद्याप मला माहिती मिळालेली नाही. या संदर्भात भाजप नेते निर्णय घेतील.


प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांवरील टीकेबाबत बोलताना राणे म्हणाले की, आमच्या कीर्तनकारांवर वारंवार टीका केली जाऊ नये. मुस्लीम देशभक्तांबद्दल आम्हाला काहीच अडचण नाही; पण जिहादी विचारांचे ‘हिरवे साप’ आहेत, त्यांच्यावर आमचा आक्षेप आहे. मौलाना डुप्लिकेट विषय असतो, कारण ते पूर्वी हिंदूच होते, असा उल्लेख त्यांनी केला.



भांडुपचा देव आनंद लवकर टीव्हीसमोर यावा


संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल बोलताना मंत्री राणे म्हणाले की, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, ही आमची इच्छा आहे. आमची जुगलबंदी सुरू असते, त्यामुळे भांडुपचा देवानंद पुन्हा लवकर टीव्हीसमोर यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



कुंभमेळ्यात फक्त हिंदूंची दुकाने पाहिजेत


नाशिक, त्र्यंबकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात फक्त हिंदूंची दुकाने लागली पाहिजेत, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले. आम्ही मस्जिदबाहेर दुकान लावतो का? जर आमचे नियम मान्य नसतील, तर मग इथे राहू नका. कुंभमेळ्यात हिंदूंचीच दुकाने लागली पाहिजेत, ही मागणी नाही, तर हे झालेच पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Comments
Add Comment

Amit Shah : ' तुमचे हे पाप देशातील जनता कधीच माफ करणार नाही'

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात (इंदिरा भवन) स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान

Kiren Rijiju : "विरोधी नेत्यांना 'दिमागी नक्षलवादी' म्हटले नाही"

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातील 'दिमागी नक्षलवादी'

Nashik Firing : नाशिकमध्ये पानटपरीवर उभ्या असलेल्या तरुणावर गोळीबार

नाशिक : अध्यात्मिक शहर अशी ओळख मिरवणाऱ्या नाशिकमध्ये रविवारी गोळीबाराची घटना घडली. नाशिक रोडच्या गोसावी

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना