नाशिकमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गोदाआरती


नाशिक : भगवा कुर्ता परिधान करुन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गोदावरीची अर्थात महाराष्ट्रातल्या गंगेची आरती केली. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने या गोदाआरतीचे आयोजन केले होते. या प्रसंगी जय देवी सूरसरिते गोदावरी माता’ या सुरांनी परिसर दुमदुमून गेला आणि सियावर रामचंद्र की जय, फटाक्यांची आतषबाजी, टाळ्यांचा कडकडाट अशा भगव्या वातावरणाने आसमंत भरुन गेला.


आरतीनंतर मार्गदर्शन करताना मंत्री राणे म्हणाले की, “गोदा आरतीचे इतक्या भव्य स्वरूपात आयोजन पाहून कुंभमेळा आता होत असल्याचा भास होत आहे. आरतीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ही अभिमानाची बाब आहे.” भारतीय संस्कृती महान असून, ती टिकवण्यासाठी राजाश्रयाची गरज आहे“सनातन धर्म श्रेष्ठ आहे आणि तो लोकांच्या परिश्रम व श्रद्धेमुळे टिकून आहे. येत्या कुंभमेळ्यात नाशिकचे महाकुंभ आयोजन जगाला आश्चर्यचकित करेल, असा मला विश्वास आहे. “आरती ही केवळ विधी नसून ती श्रद्धा आणि संतज्ञानाचा संगम आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि नदीचे शुद्धीकरण हे आपले कर्तव्य आहे. जल, मंत्र आणि प्राणायाम यांमुळे मन व शरीराचे शुद्धीकरण होते. त्यामुळे चिंतामुक्त व्हावे असे आवाहनही राणे यांनी केले.


यावेळी समितीच्यावतीने मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात संपूर्ण राष्ट्राच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. महाआरतीपूर्वी झालेल्या सत्संगात ‘अंबे जगदंबे जय अंबे’, ‘भोले की जय जय’, ‘जय शिवशंकर हर हर शंकर’ यांसारख्या भजनांनी धार्मिक वातावरण अधिकच प्रसन्न झाले.यावेळी ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी,सुधाकर बडगुजर,सुरेश पाटील, व्यंकटेश मोरे,राजेंद्र फड, खोचे गुरुजी, जयंत गायधनी यांच्यासह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.





Comments
Add Comment

जमीन घोटाळ्याप्रकरणी शेख हसीनांना २१ वर्षांची शिक्षा!

मुलगा-मुलीलाही प्रत्येकी ५ वर्षांचा तुरुंगवास नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख

तिन्ही सैन्य दलासह अण्वस्त्रेही असीम मुनीर यांच्या हातात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पाकिस्तानमध्ये सेनेचे वर्चस्व किती आहे, हे यापूर्वीच जगाने बघितलेले आहे. देशाची

श्रीलंकेत ११ दिवसांपासून पावसाचे तांडव!

पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ३१ जणांचा बळी; १४ बेपत्ता नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून

सोमवार आणि मंगळवारी मुंबईत पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई (३) जलवाहिनीवर, अमर महल भूमिगत बोगद्याच्या (१ व २) शाफ्टला जोडणाऱ्या २५०० मिलीमीटर

Gauri Garje Case : अनंत गर्जेला २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Gauri Garje Case : महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे

‘घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का ? ’

नवी दिल्ली : देशभर सुरू असलेल्या मतदार यादी पुनिरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर