पाकिस्तानात 'Gen Z'चा भडका! युवा पिढी रस्त्यावर उतरल्याने शाहबाज शरीफ आणि मुनीर यांची धाकधूक वाढली

नेपाळ, मादागास्करनंतर आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये युवा पिढीचा रोष


इस्लामाबाद : नेपाळ आणि मादागास्करसारख्या देशांमध्ये 'जनरेशन झेड' (Gen Z)ने केलेल्या आंदोलनानंतर आता पाकिस्तानमध्येही Gen Zच्या रोषाचा भडका उडाला आहे. पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये सध्या हे आंदोलन सुरू असून, शाहबाज शरीफ सरकार आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांची चिंता वाढली आहे.


वाढलेले शैक्षणिक शुल्क, शिक्षण धोरणातील दोष आणि विद्यापीठांच्या परीक्षा व्यवस्थेतील मोठ्या घोळाविरुद्ध युवा पिढी संतापली असून तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे.


या आंदोलनाची ठिणगी मुजफ्फराबाद येथील एका विद्यापीठात पडली. विद्यार्थ्यांनी फीमध्ये झालेली मोठी वाढ आणि 'डिजिटल मूल्यांकन प्रणाली' (Digital Evaluation System) मधील गंभीर त्रुटींविरुद्ध आवाज उठवला. विद्यार्थ्यांचा मुख्य आरोप आहे की, परीक्षेचा निकाल तब्बल सहा महिन्यांनी लागला आणि यात अनेक विद्यार्थ्यांचे गुण खूपच कमी आले. तर काही विद्यार्थ्यांना त्यांनी ज्या विषयांची परीक्षा दिलीच नव्हती, त्यातही पास दाखवण्यात आले.


जेव्हा विद्यार्थ्यांनी या निकालाची फेरतपासणी (Re-evaluation) करण्याची मागणी केली, तेव्हा प्रशासनाने प्रत्येक विषयासाठी तब्बल १५०० रुपये शुल्क आकारले. या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या सगळ्या गोंधळातच विद्यापीठातील विद्यार्थी संघटना आणि राजकीय घडामोडींवर बंदी घालण्यात आल्याने युवा पिढीतील असंतोष आणखी वाढला.


त्यातच आठवड्याच्या सुरुवातीला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गोळीबार झाल्याची बातमी आली आणि आंदोलन अधिक चिघळले. स्थानिक माध्यम 'कश्मीर डिजिटल'नुसार, राजा मामून फहद नावाच्या व्यक्तीने पोलिसांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. धक्कादायक म्हणजे, प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी हल्लेखोराला थांबवण्याचा कोणताही गंभीर प्रयत्न केला नाही आणि तो घटनास्थळावरून पळून गेला.


या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण POK मधील विद्यार्थी, नागरिक संघटना आणि शिक्षकांनी एकत्र येऊन सरकार आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या विरोधात जोरदार निदर्शने सुरू केली आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन POKच्या बाहेर पसरू नये यासाठी प्रयत्न करत आहे. जर परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर आंदोलनाची ही लाट पाकिस्तानच्या इतर भागांमध्येही पसरू शकते, अशी भीती सरकारला वाटत आहे. POK मध्ये हे या वर्षातील दुसरे मोठे आंदोलन आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वीच महागाई, वीज दर आणि कर सवलतींविरुद्ध लोकांनी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले होते, ज्यामुळे सरकार आधीच धास्तावलेले आहे.

Comments
Add Comment

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त