BSE Stock Surge: निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यावर बीएसई शेअर ८% उसळला

प्रतिनिधी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फ्युचर अँड ऑप्शन्स (F&O) बद्दल केलेल्या वक्तव्यावर शेअर बाजाराने बीएसई (Bombay Stock Exchange BSE)शेअरला मोठा प्रतिसाद दिला आहे. सकाळी सत्र सुरूवातीला शेअर ४% व दुपारपर्यंत ८% पातळीवर उसळला आहे. विशेषतः कालच्या वक्तव्यानंतर शेअर बुलिश पँटर्नवर गेल्याचे स्पष्ट झाले. काल निर्मला सीतारामन यांनी एका कार्यक्रमात एफ अँड ओ वरील बंदीचा कुठलाही विचार नसल्याचे अथवा निर्बंध घालण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र याविषयी गुंतवणूकदारांमध्ये सजगता आवश्यक आहे असे म्हटले आहे.


डेरीएटीव गुंतवणूकीत गुंतवणूकदारांना रोखण्याचा विचार नाही असे सीतारामन म्हणाल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भाग घेताना डेरिएटीव प्रकारातील गुंतवणूकीत जोखीम लक्षात घेण्याची गरज असल्याचेही विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी केले. 'सजगता' अत्यंत महत्वाची असल्याचे निर्मला सीतारामन यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे सरकारने केलेल्या सकारात्मक विधानानंतर डेरिएटिव गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यामध्ये आज बाजारात मोठा प्रतिसाद बीएसई शेअरला मिळाला आहे. दुपारी १.५६ वाजेपर्यंत शेअर्समध्ये थेट ८% उसळत २६५१.८० पातळीवर पोहोचला आहे.


सेबीच्या ताज्या आकडेवारीनुसार,आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ९१% वैयक्तिक एफ अँड ओ व्यापाऱ्यांना निव्वळ तोटा झाला आहे. जो एकूण १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. अहवालात असे नुकसान अन्यथा जबाबदार गुंतवणूक आणि दीर्घकालीन भांडवल निर्मितीला कारणीभूत ठरू शकले असते असे अधोरेखित करण्यात आले आहे.हेजिंग, सट्टेबाजी आणि मध्यस्थीसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या या एफ अँड ओ साधनांमध्ये उच्च जोखीम असते. गुंतवणूकदारांना बाजाराची स्पष्ट समज आवश्यक असते. वाढत्या सट्टेबाजीला तोंड देण्यासाठी, बाजारात सेबीने यापूर्वी स्थिती मर्यादा आणि मार्जिन आवश्यकतांबद्दल कडक नियम लागू केले होते. आतापर्यंत बीएसई शेअरने बाजारात चांगली कामगिरी केली आहे.


उपलब्ध माहितीनुसार, गेल्या एक महिन्यापासून या शेअरने १४% परतावा दिला असून महिन्यातील आधारे २०% घसरण झाली आहे. तर या आर्थिक वर्षात शेअरने गुंतवणूकदारांना ६१% परतावा (Returns) दिले आहेत.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा