अभिनेता पुष्कर जोग दुबईला होणार स्थायिक! मुलीच्या भविष्यासाठी घेतला भारत सोडण्याचा निर्णय

मुंबई: दुबई हे सध्या अनेक भारतीयांच्या पर्यटनाचे आकर्षण ठरले आहे. त्यात भारतीय कलाकार केवळ सुट्ट्यांसाठी नव्हे, तर कायमस्वरूपीच्या वास्तव्यासाठी दुबईला शिफ्ट होतानाची संख्या वाढली आहे. ज्यात दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार, बॉलिवूड अभिनेता आर. माधवन, संजय दत्त, विवेक ओबेरॉय , अभिनेत्री मौनी रॉय यांचा समावेश आहे. यासोबतच आता मराठी अभिनेता पुष्कर जोगसुद्धा दुबईला स्थायिक होणार आहे.


पुष्करने याबाबत त्याच्या सोशल मीडीया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. सोशल मीडीयावरील पोस्टच्या कॅप्शनमध्ये पुष्करने, "आज मला माझा गोल्डन व्हिसा मिळाला… आता मी अधिकृतपणे यूएईचा रहिवासी झालो आहे. हे सगळं माझ्या मुलीसाठी, तिच्या आनंदासाठी आणि कल्याणासाठी आहे. तिच्या भविष्यासाठी, असे लिहले आहे.




गोल्डन व्हिसा म्हणजे काय?



गोल्डन व्हिसा हा एखाद्या देशाने रिअल इस्टेट, सरकारी बाँड किंवा स्थानिक व्यवसाय यासारख्या महत्त्वपूर्ण आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना दीर्घकालीन निवास परवानासाठी दिला जातो. या गुंतवणुकीच्या बदल्यात, व्हिसा धारक आणि त्यांच्या कुटुंबाला देशात राहण्याचा, काम करण्याचा आणि अभ्यास करण्याचा अधिकार मिळतो आणि नंतर ते नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र ठरू शकतात.



या नियमानुसार, पाहायला जाता, पुष्कर हा दुबईतील गिप्सी चायनिज या हॉटेलचा ब्रॅड अॅम्बेसिडर झाला आहे. याबद्दल त्याने हॉटेलची जाहिरात करत माहिती दिली आहे. पुष्करच्या या प्रोजेक्टमुळे त्याच्या मुलीला दुबईमध्ये अभ्यास करण्याचा आणि भविष्यात काम करण्याचा अधिकार मिळाला आहे.


बालकलाकार म्हणून नावारूपास आलेल्या पुष्करने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे एक वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. पुष्करने १९९२ पासून बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकीर्द सुरू केली. बालकलाकार म्हणून त्याने १० चित्रपट केले. या कारकिर्दीत त्याने २००० मध्ये राज्य सरकारचा 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार' म्हणून पुरस्कारही पटकावला. मात्र त्यानंतर त्याने शिक्षणासाठी ब्रेक घेतला. यानंतर २००७ मध्ये 'जबरदस्त' चित्रपटातून कमबॅक करत पुन्हा सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले.


Comments
Add Comment

प्राइम व्हिडिओने ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनचा दमदार ट्रेलर केला सादर ; राज आणि डीके यांची लोकप्रिय गुप्तहेर मालिका येत्या २१ नोव्हेंबरला प्रदर्शित

मुंबई : भारतातील मनोरंजन व्यासपीठ प्राइम व्हिडिओने आज मुंबईत चाहत्यांसाठी आणि माध्यमांसाठी आयोजित एका

रश्मीका आणि विजय देवरकोंडा लवकरच लग्नबंधनात अडकणार

मुंबई : छावा चित्रपटात राणी येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि सुपरस्टार विजय देवरकोंडा

Vicky Kaushal-Katrina Kaif : मुलगा झाला रे! 'विकी-कॅट'च्या घरी छोट्या 'छावा'ची दमदार एन्ट्री!

मुंबई : बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय जोडपे, कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि

यशोमान आपटे अन् रुमानी खरेचं व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण

२१ नोव्हेंबरला शुभारंभाचा प्रयोग मराठी व्यावसायिक रंगभूमीवर सध्या उत्तमोत्तम नाटके येत आहेत, या नाटकांना

प्रेमाच्या हळव्या भावनांना स्पर्श करणारं ‘सावरताना...’ गाणं प्रदर्शित

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘असंभव’ या चित्रपटाच्या रहस्यमय आणि उत्कंठावर्धक टिझरने, पोस्टरने

‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा!

काही दिवसांपूर्वी घोषित झालेल्या ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. आता