सासू-सुनेच्या नात्याची नव्या पिढीची गोष्ट

झी स्टुडिओज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच नवनवीन आशय असलेले दर्जेदार चित्रपट घेऊन येते. आताही झी स्टुडियोज व केदार शिंदे असाच एक कमाल चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. महिलांच्या मनातल्या भावना, त्यांच्या नात्यांमधला विनोद आणि संवेदना पडद्यावर आणण्यात हातखंडा असलेले केदार शिंदे आता ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे यांची कन्या सना शिंदे पहिल्यांदाच निर्मितीची धुरा सांभाळत आहे.


पोस्टरमध्ये सासू-सुनेची जोडी पाठमोरी दिसत आहे. आता सासू-सूनेच्या भूमिकेत कोण दिसेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. प्रत्येक घरात, कुटुंबात घडणारी सासू-सुनेच्या नात्याची मजेशीर केमिस्ट्री, हलकीशी चतुराई, जिव्हाळा आणि न संपणारी टोलेबाजी याचे गोड-तिखट चित्रण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, “प्रत्येक घरात सासू-सुनेचं नातं वेगळ्या रंगात दिसतं. कधी हसू, कधी नोकझोक, कधी भांडण तर कधी काळजी आणि प्रेम. प्रत्येकाच्या कुटुंबातील ही दोन वेगळी व्यक्तिमत्त्वं, दोन विचार आणि दोन घरं सांभाळणाऱ्या स्त्रियांचं सामर्थ्य या चित्रपटात पाहायला मिळेल. तसेच हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे, कारण या चित्रपटाच्या निमित्ताने सनाने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे आणि ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”


झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “केदार शिंदे हे अत्यंत संवेदनशील दिग्दर्शक आहेत. त्यांनी प्रेक्षकांना नेहमीच दर्जेदार चित्रपट दिले आहेत. या चित्रपटातही असाच काहीसा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ ही आजच्या पिढीच्या सासू-सुनेची गोष्ट आहे. घरातील प्रत्येक सूनबाई आणि सासुबाईंना ही कथा नक्कीच भावेल आणि त्यांची वाटेल.”


झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासुबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सना शिंदे, उमेश कुमार बन्सल यांची निर्मिती आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक व ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण व संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. येत्या १६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Comments
Add Comment

रश्मीका आणि विजय देवरकोंडा लवकरच लग्नबंधनात अडकणार

मुंबई : छावा चित्रपटात राणी येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि सुपरस्टार विजय देवरकोंडा

Vicky Kaushal-Katrina Kaif : मुलगा झाला रे! 'विकी-कॅट'च्या घरी छोट्या 'छावा'ची दमदार एन्ट्री!

मुंबई : बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय जोडपे, कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि

यशोमान आपटे अन् रुमानी खरेचं व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण

२१ नोव्हेंबरला शुभारंभाचा प्रयोग मराठी व्यावसायिक रंगभूमीवर सध्या उत्तमोत्तम नाटके येत आहेत, या नाटकांना

प्रेमाच्या हळव्या भावनांना स्पर्श करणारं ‘सावरताना...’ गाणं प्रदर्शित

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘असंभव’ या चित्रपटाच्या रहस्यमय आणि उत्कंठावर्धक टिझरने, पोस्टरने

‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा!

काही दिवसांपूर्वी घोषित झालेल्या ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. आता

मराठी चित्रपटात झळकणार सलमान आणि संजूबाबा; कोणती भूमिका करणार, पहा...

मुंबई : बॉलीवूड क्षेत्र गाजवणारा सलमान खान आता लवकरच मराठी सिनेमांमध्येही दिसणार आहे. सलमान खानच्या मराठी