आपल्या दैनंदिन जीवनात अनेक लहान-मोठ्या वस्तूंचे अतुलनीय महत्त्व असते. स्वयंपाकघरातील भांड्यांपासून ते अगदी लहानशा पिनपर्यंत प्रत्येक वस्तूची गरज असते. यापैकीच एक सर्वात आवश्यक आणि महिलांच्या कपाटात कायम आढळून येणारी वस्तू म्हणजे सेफ्टी पिन. भारतात साडी नेसताना सेफ्टी पिनचा वापर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. साडीचा पदर किंवा निऱ्या व्यवस्थित आणि जागेवर ठेवण्यासाठी या पिनचा वापर अनिवार्य असतो, ज्यामुळे साडीची सुबक मांडणी कायम राहते. आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या फॅशनच्या युगात, दैनंदिन वस्तूही नव्या, आकर्षक आणि विशेषतः लक्झरी रूपात बाजारात येत आहेत. अशीच एक वस्तू सध्या फॅशन जगतात चर्चेचा विषय ठरली आहे. इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाने (Prada) लॉन्च केलेली सेफ्टी पिन! प्राडा हा त्यांच्या अद्वितीय आणि उच्च-गुणवत्तेच्या (Unique and High-Fashion) फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच त्यांनी '५ क्रोशे सेफ्टी पिन ब्रोच' (5 Crochet Safety Pin Brooch) नावाने एक उत्पादन बाजारात आणले आहे. या 'लक्झरी' सेफ्टी पिनची किंमत ऐकून सामान्य नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. एका साध्या पिनच्या स्वरूपातील या ब्रोचची किंमत तब्बल ६९,००० रुपये इतकी आहे! दैनंदिन वापरातील, अगदी स्वस्त दरात मिळणाऱ्या वस्तूची ही आश्चर्यकारक किंमत लक्झरी फॅशन ब्रँड्सच्या जगातील वेगळेपण दर्शवते. एका बाजूला सामान्य महिला साडीला सुरक्षित ठेवण्यासाठी काही रुपयांची सेफ्टी पिन वापरतात, तर दुसऱ्या बाजूला फॅशन प्रेमी ६९ हजारांची पिन एक 'ब्रोच' (Brooch) म्हणून वापरात आणतील, हे फॅशनचे एक अविश्वसनीय वास्तव आहे.
बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी मतदान होणार असून ...
५ रुपयांच्या सेफ्टी पिनसाठी आकारले $७७५ (₹६९,०००)
View this post on Instagram
दैनंदिन वापरात अगदी ५ ते १० रुपयांना सहज उपलब्ध होणारी 'सेफ्टी पिन' (Safety Pin) जेव्हा एका लक्झरी ब्रँडच्या नावाखाली बाजारात येते, तेव्हा तिची किंमत गगनाला भिडते, हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इटालियन फॅशन ब्रँड प्राडा (Prada) सध्या याच कारणामुळे जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. प्राडाने 'सेफ्टी पिन ब्रोच' (Safety Pin Brooch) नावाने एक उत्पादन बाजारात आणले आहे, ज्याची किंमत $७७५ म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास ₹६९,००० इतकी आहे! प्राडाने लाँच केलेला हा सेफ्टी पिन ब्रोच तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. हलका निळा, गुलाबी आणि नारंगी. या पिनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, ही पितळापासून (Brass) बनवलेली आहे. तिच्या डिझाईनमध्ये रंगीत क्रोशे कॉर्डचे (Crochet Cord) तपशील दिलेले आहेत आणि ब्रँडचा सिग्नेचर त्रिकोणी लोगो (Signature Logo) आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतो. या पिनची किंमत आणि तिचा सामान्य 'सेफ्टी पिन'चा आकार पाहता, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्राडाला चांगलेच धारेवर धरले आहे. नेटकऱ्यांनी प्राडाच्या या अवास्तव किमतीवर तीव्र टीका केली आहे. "माझ्या घरात असलेल्या वस्तूंनी मी हे ब्रोच खूपच स्वस्तात बनवू शकतो!" तर काहींनी या फॅशन डिझाईनवर आक्षेप घेतला, "मला वाटतंय की हे सर्वत्र विणकाम करणाऱ्या आणि क्रोशे करणाऱ्या कलाकारांचा अपमान आहे, कारण हे डिझाईन इतकं साधं आहे?" किमतीवर आश्चर्य व्यक्त करताना एका युजरने म्हटले, "मला वाटले की कदाचित पिन सोन्याची असेल... त्यामुळे ही किंमत स्पष्ट होऊ शकेल. पण, नाही, ती पितळ आहे! हे तर अवास्तव आहे!" या प्रकारच्या कमेंट्समुळे प्राडाची ही 'सेफ्टी पिन' सध्या फॅशन जगतात मजाक आणि चर्चेचा विषय बनली आहे.
११२ वर्षांचा इतिहास, जगभरात दबदबा! 'प्राडा'ने फॅशन जगतात कसे निर्माण केले मोठे साम्राज्य?
इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडा (Prada) आज जगभरात केवळ त्याच्या महागड्या उत्पादनांमुळेच नव्हे, तर त्याच्या समृद्ध वारसा आणि विशिष्ट फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असतो. प्राडा ब्रँडची स्थापना १९१३ मध्ये इटलीतील मिलान शहरात मारियो प्राडा (Mario Prada) यांनी केली होती. सुरुवातीला हा ब्रँड 'प्राडा ब्रदर्स' (Prada Brothers) म्हणून ओळखला जात असे. अनेक दशके हा ब्रँड चामड्याचे उत्कृष्ट सामान आणि लक्झरी वस्तू तयार करण्यासाठी ओळखला जात होता. ब्रँडच्या इतिहासाला सर्वात मोठे वळण मिळाले ते १९७८ मध्ये, जेव्हा मारियो प्राडा यांची नात मियुसिया प्राडा (Miuccia Prada) यांनी व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. मियुसिया यांच्या नेतृत्वाखाली प्राडाने केवळ लक्झरी सामानापुरते मर्यादित न राहता, विशिष्ट आणि हटके डिझाईन्सच्या कपड्यांच्या क्षेत्रात मोठे पाऊल टाकले. मियुसियांच्या कल्पक डिझाईन्समुळे प्राडाचे कपडे आणि वस्तू जगभरातील सेलिब्रिटींमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरल्या, ज्यामुळे ब्रँडला मोठी जागतिक मागणी मिळाली आणि तो जागतिक फॅशन किंग बनला. प्राडाने बाजारात आणलेल्या प्रत्येक वस्तूला मोठी मागणी असली तरी, त्यांच्या काही युनिक डिझाईन्समुळे अनेकदा वादही निर्माण झाले आहेत. काही वर्षांपूर्वी प्राडाने ट्रेनच्या फरशीच्या डिझाईनशी मिळतीजुळती एक बॅग फॅशन वीक मध्ये सादर केली होती, ज्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली. तसेच, भारतीय डिझाईनची आणि अस्सल महाराष्ट्राची ओळख असलेल्या कोल्हापुरी चप्पलची (Kolhapuri Chappal) डिझाईन त्यांनी फॅशन वीक मध्ये अतिशय महागड्या दरात आणल्यामुळे सांस्कृतिक अपमानाचा आणि डिझाईन चोरीचा अनोखा वाद रंगला होता. अशा वादग्रस्त आणि महागड्या वस्तू लाँच करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे प्राडा ब्रँड नेहमीच फॅशन जगतात चर्चा आणि वादाच्या केंद्रस्थानी राहतो.
प्राडा क्रोशे सेफ्टी पिन ब्रोचची वैशिष्ट्ये काय आहेत?
प्राडाने बाजारात आणलेल्या या 'क्रोशे सेफ्टी पिन ब्रोच'ला (Crochet Safety Pin Brooch) विशेष लक्झरी रूप देण्यात आले आहे, ज्यामुळे तिची किंमत प्रचंड वाढली आहे. या पिनचे डिझाईन नेटेड-थ्रेड (Knitted-Thread) म्हणजेच बारीक विणलेल्या धाग्यांचा वापर करून तयार करण्यात आले आहे. या विशिष्ट क्रोशे कामामुळे साध्या पिनला एक कलात्मक आणि अद्वितीय स्पर्श मिळतो. पिनला अधिक आकर्षक आणि लक्झरी ओळख देण्यासाठी रंगीत क्रोशे कॉर्डचे तपशील जोडण्यात आले आहेत. या पिनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिला लावण्यात आलेला प्राडा ब्रँडचा आकर्षक त्रिकोणी लोगो (Signature Triangular Logo). हा लोगोच या पिनला एक लक्झरी आयटम म्हणून सिद्ध करतो. या सर्व डिझाईन आणि ब्रँडिंगमुळे ही 'सेफ्टी पिन' हिंदुस्थानी चलनात तब्बल ६९ हजार रुपये या अविश्वसनीय किमतीत उपलब्ध आहे. प्राडा हा एक प्रतिष्ठित लक्झरी ब्रँड असल्यामुळे, त्यांच्या सर्वच वस्तूंची किंमत अत्यंत महाग असते. दैनंदिन वस्तू महागड्या दरात विकण्यामागे प्राडाची एक विशिष्ट रणनीती दिसून येते, प्राडा फक्त वस्तू विकत नाही, तर ते 'ब्रँड नेम' विकतात. त्यांच्या वस्तूची किंमत प्रामुख्याने डिझाइन, उत्कृष्ट कारागिरी आणि जागतिक स्तरावरच्या ब्रँड व्हॅल्यूवर (Brand Value) अवलंबून असते. वस्तूची गुणवत्ता आणि डिझाइनमध्ये असलेले नाविन्य हे देखील किमती वाढवण्यास कारणीभूत ठरते. यामुळेच, प्राडाच्या कलेक्शनमधील प्रत्येक वस्तू, अगदी एका साध्या सेफ्टी पिनचे रूपांतरणदेखील, डिझाईन आणि नावाच्या बळावर लक्झरी फॅशन ॲक्सेसरीमध्ये होते आणि त्या प्रचंड महागड्या दरात विकल्या जातात.






